पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/377

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

- ( ३७८) प्रांतांत मंगलोरपासून कुमारीपर्यंत आणि तिनेवल्ही जिल्ह्यांत सुरू आहे. ह्याचे वर्ष सौर आहे. मलबारच्या उत्तर भागांत कन्नी (कन्या) मासापासून आणि दक्षिण भागांत व तिनेवल्ली प्रांतांत चिंगम (सिंह) मासापासून याचे वर्ष सुरु होते. मलबार प्रांतांत याच्या महिन्यांची नांवें मेष, वृषभ इत्यादि राशींच्या नांवांचे अपभ्रंश आहेत. १००० वर्षांनी ह्याचें एक चक्र होते, आणि सांप्रतचे चक्र चौथे आहे असें ह्मणतात. परंतु हल्ली याची वर्षगणना १००० हून जास्ती प्रचारांत आहे. शकवर्ष १८१८ याच्या आरंभी कोल्लमवर्ष १०७२ आहे. शकवर्ष ७४७ या वर्षी कोल्लमवर्ष पहिले होते. याच्या पूर्वी कोल्लमकाल प्रचारांत होता असे दिसत नाही. कोल्लमवर्षांत ७४६।४७ मिळवून शकवर्ष येते आणि ८२४।२५ मिळवून इसवी सन येतो. नेवारकाल-नेपाळांत हा काल शक १६९० पर्यंत सुरू होता. याचे वर्ष कार्तिकादि आहे; आणि मास अमान्त आहेत. संस्कृत ग्रंथांत आणि ताम्रपटादि लेखांत ह्याला नेपालकाल ह्मणतात. याच्या वर्षांत ८००1८०१ मिळवून शक वर्ष येते; ८७८१७९ मिळवून इ. स. सनाचे वर्ष येते; आणि ९३५ मिळवून कार्तिकादि चिक्रम संवत् येतो. चालुक्यकाल-चालुक्य राजा विक्रमादित्य याने शक ९९८ च्या सुमारास हा सुरू केला. विजलकलचुरियाने शक १०८४ मध्ये पूर्वेकडील चालुक्यांचा पराभव केला, तेव्हांपासून हा काल बंद पडला असे दिसते. यांतील मासपक्षांची पद्धति महाराष्ट्रांतील पद्धतीप्रमाणे आहे. याच्या वर्षाचा आरंभ केव्हां होत असे हे मात्र निश्चितपणे समजले नाही. चालुक्य वर्षांत ९९७१९८ मिळवून शकवर्ष येते आणि १०७५।७६ मिळवून इसवी सन येतो. सिंहसंवत -हा संवत काठेवाड आणि गुजराथ या प्रांतांत सुरू होता. सिंह संवत् ३२, ९३, ९६, ५१, यांतील लेख सापडले आहेत.* त्यांवरून माझें असें अनुमान आहे की, त्याचे वर्ष चांद्रसौर आहे; त्याचा अंक वर्तमान असतो; महिने अमांत आहेत; (फक्त एका उदाहरणांत पूर्णिमांत आहेत.)वर्ष बहुधा आषाढादि आहे; चैत्रादि अथवा कार्तिकादि खचित नाही. सिंह संवतांत १०३५/३६ मिळवून शकवर्ष येते, १११३।१४ मिळवून इसवी सन येतो आणि ११७० मिळवून आषाढादि विक्रम संवत येतो. लक्ष्मणसेनकाल-हा काल तिरहूत आणि मिथिला या प्रांतांत विक्रमकाल ल्यम.शककाल यांबरोबर प्रचारांत आहेत. याच्या आरंभकालाविषयी मतभेद आहे. अनियमिते (इ. स. १७९६) च्या मते याचे पहिले वर्ष इ. स. ११०५त होते; आरंभ आई. स. १८१०) च्या मतें तें इ. स. ११०५ किंवा ११०६ मध्ये होते. इ. ध्ये इंग्लिश समून १८८० पर्यंतच्या तिरहुत प्रांतांतील पंचांगांवरून दिसते की ते इ. आणि पुढे इ०वा 11०९ मध्ये होते. बुकनन ह्मणतो की वर्षाचा आरंभ आषाढांतीइलाज्याच्या कासरे दिवशी ह्मणजे पूर्णिमान्त श्रावण कृष्ण प्रतिपदेस होतो. परंतु वारन लिग (कालसंकलित, Tauary Vol. XVIII, XIX,