पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/375

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

( ३७६) संक्रांतीला जो महिना सुरू होतो त्याला वैशाख म्हणतात (यालाच तामिळ प्रांतांत चैत्र ह्मणतात.) बंगाली सन १३०० ह्मणजे शकवर्ष १८१५, इ. स. १८९३।९४ होय. बंगाली सनांत ५१५ मिळविले म्हणजे शकवर्ष निवतें; ५९३३९४ मिळविले म्हणजे इसवी सन निघतो. विलायती सन-हा सन बंगालच्या काही भागांत आणि मुख्यतः ओरिसा प्रांतांत चालतो. याचे वर्ष सौर आहे. परंतु महिन्यांची नांवें चांद्रच आहेत. वर्षाचा आरंभ कन्यासंक्रांतीच्या दिवशी होतो. महिन्याचा आरंभ बंगाल्यांत संक्रांतीच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी होतो; परंतु विलायती सनाच्या महिन्याचा आरंभ संक्रांतीच्या दिवशीच होतो.* विलायती सनाच्या वर्षांत ५१४।१५ मिळविले ह्मणजे शकवर्ष निघते; ५९२।३ मिळविले ह्मणजे इसवी सन निघतो. अमली सन-ओढिया प्रांताचा राजा इंद्रद्युम्न याच्या जन्मतिथीपासून ह्मणजे भाद्रपद शुक्ल १२ पासून अमली वर्ष सुरू होते, आणि संक्रमणकाळी महिना सुरू होतो, असें या सनाचे वर्णन गिरीश चंद्र याच्या Chronological Tables या पुस्तकांत आहे. यावरून दिसून येते की याचे महिने सौर आहेत, परंतु वर्ष चांदसौर आहे. याचे महिनेही चांद्र असतील असा संभव दिसतो. कन्या संक्राति भाद्रपद महिन्यांत द्वादशीपूर्वी किंवा नंतर केव्हाही होऊ शकेल. एवढी गोष्ट खेरीज करून विलायती आणि अमली सनाचा आरंभकाल आणि वर्षाचा अंक ही एकच आहेत. फसली सन-हे पिकाच्या हंगामाचें वर्ष अकबर याने सुरू केले. प्रथम हिजरी सनाचाच वर्षांक यास लाविला. परंतु हिजरी वर्ष केघळ चांद्र (३५४ दिवसांचे) आहे; व फसली हैं सौर आहे; यामुळे पुढे वर्षाच्या अंकांत फरक पडत चालला. हिजरी सन ९६३, इसवी सन १५५६, या वर्षी म्हणजे अकबर राज्यावर बसला त्या वर्षी उत्तर हिंदुस्थानांत फसली सन सुरू झाला आणि दक्षिण हिंदुस्थानांत शहाजहान बादशहाने इ. स. १६३६ ह्मणजे हिजरी सन १०४६ या वर्षी तो सुरू केला. प्रथम त्यास वर्षांक हिजरी सनाचा झणजे १०४६ लागला. आणि त्या वेळी उत्तरेकडील फसली सन १०४४ होता. यामुळे दक्षिणेकडील फसली वर्षाचा अंक उत्तरच्या अंकापेक्षा जास्त झाला. (हिजरी वर्ष केवळ चांद्र, ह्मणून असें झालें.) वर्षारंभ दोहोंकडे भिन्न धरल्यामु. आणखी काही महिन्यांचे अंतर पडले. हे वर्ष केवळ सरकारी असल्यामुळे आणि याचा धर्माशी संबंध नसल्यामुळे ह्याचा वारंभ अनियमित झाला असे दिसते. मद्रास इलाख्यांत प्रथम ह्या वषाचा आरंभ आडी (कर्क) महिन्याच्या पहिल्या दिवशी होत असे. इ० स० १८०० मध्ये इंग्लिश सरकाराने जुलईच्या तेराव्या तारखेस फसली वर्षाचा आरंभ ठरविला: आणि पुढे इ. स. १८५५ मध्यं तो जुलईच्या पहिल्या तारखेस ठरविला. मुंबई इलारण्याच्या काही भागांत सूर्य मृगनक्षत्री जातो त्या दिवशी (हल्ली जूनच्या • वारन लिहितो की विलायती सनाच्या वर्षाचा आरंभ चैत्र कृष्ण १ रोजी होतो. (कालसंकलित, Tables p. IX. इ. स. १८२५). क्वचित् तशी वहिवाट असेल.