पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/374

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(३७५) आहेत. चेदिवर्षांत १६९।७० मिळविले झणजे शकवर्ष येते; २४१४८ मिळविले ह्मणजे इसवी सनाचे वर्ष येते. पश्चिम हिंदुस्थानांतले आणि मध्य हिंदुस्थानांतले कलचुरी राजे ह्या कालाचा उपयोग करीत असत. आणि त्यांच्यापूर्वी देखील हिंदुस्थानच्या त्या भागांत हा काल चालत असे असे दिसते. मला वाटते की पूर्णि मान्न आश्विन कृष्ण झणजे अमान्त भाद्रपद कृष्ण हा चेदिवर्षारंभ असावा. गुप्तकाल - हा काल सांप्रत प्रचारांत नाही. याचे सविस्तर विवेचन डाक्तर कीटयाने केले आहे.* गुप्त वर्ष १६३ पासून ३८६ या कालांतले ताम्रपटादि लेख पाहून त्याने असें अनुमान केले आहे की, याचे वर्ष वर्तमान आहे; तें चैत्रादि आहे; आणि मास पौर्णिमान्त आहेत. शक वर्ष २४२ चैत्र शुक्ल प्रतिपदा हा गुप्त कालाचा आरंभ होय. गुप्त वर्षांत २४१ मिळविले झणजे शकवर्ष येते; ३१९।२० मिळविले झणजे इसवी सन येतो. मध्य हिंदुस्थानांत आणि नेपाळांत हा काल प्रचारांत होता. गुप्त नांवाचे राजे याचा उपयोग करीत असत बलभिकाल-गुप्त या नांवाच्या ठिकाणी वलभी हें नांव येऊन तोच काल पढें चालला त्याच्या चौथ्या शतकांत तो काठेवाड प्रांतांत सुरू झाला, आणि त्या वेळी त्याच्या वर्षाचा आरंभ चैत्रांत होता तो पूर्वीच्या कार्तिक शुक्ल प्रतिपदेस झणजे ५ महिने मागे गेला. त्याचे वर्ष वर्तमान आहे; तें कार्तिकादि आहे. महिने पौर्णिमान्त आणि अमान्त दोन्ही आहेत. वलभी वर्षांत २४०।४१ मिळविले म्हणजे शकवर्ष येते; आणि ३1८1१९ मिळविले झणजे इसवी सन येतो. गुप्तसंवत अथवा वलभिसंवत ८२ पासून ९४५ पर्यंत काळांतले ताम्रपटादि लेख सांपडले आहेत. हिजरीसन - हा मूळचा अरबस्थानांतला होय. मुसलमानांच्या अमलापासून तो ह्या देशांत आला. हिजरा ह्मणजे पळणे. मुसलमानांचा पैगंबर महंमद हा इ० स० ६२२ ता. १५ जुलई शक ५४४ श्रावण शुक्ल । गुरुवार रात्री (मुसलमानी शुक्रवारच्या रात्री) मक्केहून मदिनेस पळून गेला. ह्मणून ह्या सनास हिजरी म्हणतात. आणि त्या पळण्याची वेळ ही ह्या सनाची आरंभवेळा धरिली आहे. ह्या सनाचे महिने मोहरम इत्यादि चांद्र आहेत. आणि अधिक मास मुळीच धरित नाहीत, यामुळे वर्ष केवळ चांद्र मणजे ३५४ किंवा ३५५ दिवसांचे आहे. आणि यामुळे दर ३२ किंवा ३३ सौर वर्षांत या सनाच्या वर्षाचा अंक कोणत्याही सौर कालाच्या वर्षाच्या अंकापेक्षा वाढतो. शुक्ल प्रतिपदा किंवा द्वितीया या तिथीस चंद्रदर्शन झाल्यापासून महिना सुरू होतो. महिन्याचा पहिला दिवस, दुसरा दिवस असें म्हणण्याऐवजी पहिला चंद्र, दुसरा चंद्र असें म्हणतात. असे चंद्र ( दिवस किंवा तारखा ) महिन्यांत २९ किंवा ३० होतात. वाराचा आणि तारखेचा आरंभ सूर्यास्ती होतो. यामुळे आमची गुरुवारची रात्र ती मुसलमानी शुक्रवारची रात्र होय. दिवसास वाराचें नांव दोघांचे एकच असते. बंगाली सन- हा बंगाल्यांत प्रचारांत आहे. त्याचे वर्ष सौर आहे; त्याचा आरंभ मेषसंक्रांतीस होतो. माहिन्यांची नांवें चैत्र, वैशाख अशी चांद्रच आहेत. मेष

  • Corpus Inscrip. Ind, Vol. III, Gnpti Inecriptions. Indian Antiquary, Vol. xx. p. 376 ff.