पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/373

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

चर्यामुळे नर्मदोत्तर भागी हळूहळू ते चैत्रादि झाले असे दिसते. या काळाच्या चवदाव्या शतकापर्यंत तर एकच प्रदेशांत कार्तिकादि आणि चैत्रादि असे दोन्ही प्रकारचें वर्ष चालत असे; त्यांत मुख्यतः कार्तिकादि चालत असे. (३) कार्तिकादि वर्षांचे मास पूर्णिमान्त आणि अमान्त दोन्ही आढळतात; चैत्रादि वर्षाचे मास प्रायः पूर्णिमान्त आढळतात, परंतु याविषयी अमुकच नियम होता असे दिसत नाही. इ० स० ४५० पासून ८५० पर्यंत या कालाला मालवकाल ह्मणत असत. विकम शब्दाचा उपयोग ज्यांत आढळतो असा पहिला लेख विक्रम संवत ८९८ यांतला सांपडतो. परंतु त्यांत तरी विक्रम हा शब्द विक्रम राजास अनुलक्षून योजिला आहे असे स्पष्ट नाही. तसा स्पष्ट उल्लेख अगदी प्राचीन म्हटला ह्मणजे विक्रम संवत १०५० च्या एका काव्यांत आहे. सांप्रत विक्रमकाल या अर्थी विक्रम संवत किंवा नुसते संवत असे म्हणतात. संवत हा शब्द वस्तुतः संवत्सर शब्दाचा अपभ्रंश आहे; आणि शकसंवत, सिंहसंवत, वलभीसंवत असे प्रयोग पुष्कळ आढळतात. मद्रासेकडच्या कांहीं पंचांगांत शकवर्षाप्रमाणे विक्रमाचेही वर्तमानवर्ष देतात. उदाहरण इकडे ज्या वर्षाला शक १८१८ म्हणतात त्याला तिकडे पंचांगांत शक १८१९, विक्रम संवत १९५४ म्हणतात. शकांत १३४।१३५ मिळवून कार्तिकादि विक्रमवर्ष निघतें; आणि १३५ मिळवून चैत्रादि विक्रमवर्ष निघते. रिवस्ती सन ( इसवी सन ।-इंग्रजी राज्य झाल्यापासून हा सन या देशांत प्रचारांत आला आहे. या सनाचे वर्ष सायन सौर आहे. त्याचा आरंभ जानुआरीच्या पहिल्या तारखेस होतो. सांप्रत जानुआरी महिन्याचा आरंभ अमान पौषांत अथवा माघांत होतो. परंतु इसवी सन १७५२ मध्ये इंग्लंडांत न्यू स्टाईल सुरू झाली, त्यापूर्वी जानुआरीचा आरंभ पौषांत अथवा माघांत होत असे. शकांत ७८ किंवा ७९ मिळविले झणजे ख्रिस्ती वर्ष निघते. शककाल-ज्योतिषकरणग्रंथांत हाच काल घेतात. ज्योतिष्यांनी ह्यास आश्रय दिल्यामुळेच हा इतकी वर्षे टिकला. नाही तर गुप्तकाल, शिवाजीचा राज्याभिषेक शक, इत्यादि अनेक कालांप्रमाणे कधींच लयास गेला असता. सांगत टिनेवल्ली आणि मलबारचा काही भाग हे प्रदेश खेरीजकरून सगळ्या दक्षिण हिंदुस्थानांत व्यवहारांत हाच काल मुख्यत्वे आहे. हिंदुस्थानच्या इतर भागांत स्थानिक कालाबरोबर हा काल चालतो. ह्याचे वर्ष चांद्र आणि सौर आहे. तामिळ आणि या बंगाल प्रांतांत सौर वर्ष चालते आणि इतर प्रांतांत चांद्र वर्ष चालते. त्यांत चांद्र वर्ष चैत्रादि आहे आणि सौर वर्ष मेषादि आहे. नर्मदोत्तर भागी ह्याचे महिने पौर्णिमान्त आहेत आणि दक्षिणभागी अमान्त आहेत. -चेदिकाल अथवा कलचुरिकाल-हा काल सांप्रत प्रचारात नाही. चेदिवर्ष ७९३ पासून ९३४ पर्यंत कालांतले १० ताम्रपटादि लेख पाहून प्रोफे० की लहान याने असे अनुमान काढिले आहे की, चैत्रादि विक्रम संवत ३०५। शकसंवत १७०, इ० स०२४८४९) आश्विन शुक्ल प्रतिपदा हा चेदिकालाचा आरंभ होय; त्याचे वर्ष आश्विनादि आहे ते वर्तमान आहे; आणि त्याचे महिने पौर्णिमान्त