पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/372

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(३७१) लावण्याची पद्धति आहे तीच घेतली आहे. कोठे कोठे वर्तमान आणि गत या संज्ञा योजिल्या आहेत. परंतु त्या एकाच वर्षास दोन अंक लागले असता त्यात भेद रहावा ह्मणून योजिल्या आहेत. आतां निरनिराळ्या कालांचा विचार करूं. कलिकाल-कालगणनेत कलियुगाचा उपयोग ज्योतिष ग्रंथांत आणि पंचागांत करितात. या कालाची वर्षे चैत्रादि आणि मेषादि अशी दोनही प्रचारांत आहेत. पंचांगांत कधी याचें वर्तमान वर्ष, कधीं गतवर्ष, आणि कधी दोन्ही देतात. ताम्रपटादि लेखांत याचा उपयोग फारसा आढळत नाही. सांप्रत व्यवहारांत हे वर्ष कोठेही नाही. मद्रास इलाख्यांत मात्र काही पंचांगांत फक्त कलिवर्ष दिलेले आढळते. शकांत ३१७९ मिळवून गतकलिवर्ष निघतें, सप्तर्षिकाल-सांप्रत हा काल काश्मीरांत आणि त्याच्या आसपास प्रचारांत आहे. बेरुणीच्या वेळी (शक ९५२) हा काल काश्मीरांत, मुलतानांत आणि काही इतर प्रांतांतही चालू होता असे दिसते. राजतरंगिणी ग्रंथांत सगळा इतिहास ह्याच कालाच्या वर्षांनी सांगितला आहे. कधी कधी या कासा लौकिक काल। अथवा 'शास्त्रकाल । ह्मणतात. सप्तऋषींना गति आहे, ते शंभर वर्षांत एक नक्षत्र आकमितात, आणि २७०० वर्षांत भचक फिरतात. या समजुतीवर ही कालगणना प्रचारांत आली. यामुळे या कालगणनेत २७०० वर्षांचे चक्र मानितात. परंतु प्रचारांत शतकाचा अंक बहुतकरून सोडून देतात. ह्मणजे १०० वर्षे भरल्यावर पुनः पहिले वर्ष, दुसरे वर्ष असें मोजू लागतात. काशीरांतील ज्योतिष्यांच्या मताप्रमाणे वर्तमान कलिवर्ष २७ चैत्र शुक्ल १ या दिवशी सप्तर्षिकालाचा आरंभ झाला. शतकें टाकून दिली तर सप्तर्षिवर्षांत ४६ मिळविले झणजे चालू पद्धतीचे शकवर्ष निघते; आणि २४-२५ मिळविले ह्मणजे इ० स० चे वर्ष निघतें. सप्तर्षिवर्ष चैत्रादि आहे. डाक्तर *कीलहान यास असें आढळून आले आहे की याची वर्षे वर्तमान आणि महिने पूर्णिमान्त असतात. विक्रम काल-सांप्रत हा काळ गुजराथेत आणि बंगाल प्रांत खेरीजकरून सगळ्या उत्तर हिंदुस्थानांत प्रचारांत आहे. या प्रांतांतले लोक इतर प्रांतांत गेले आहेत, ते तिकडेही या कालाचा उपयोग करितात. नर्मदेच्या उत्तरेस याचे वर्ष चैत्रादि आहे (संवताचा आरंभ चैत्रांत होतो), आणि महिने पूर्णिमान्त आहेत. परंतु गुजराथेंत वर्ष कार्तिकादि आहे आणि मास अमान्त आहेत. काटेवाड आणि गुजराथ यांच्या काही भागांत विक्रमवर्ष आषाढादि आहे आणि मास अमान्त आहेत. प्रोफे. कीलहान याने विक्रमसंवत ८९८ पासून १८७७ पर्यंतच्या १५० प्राचीन लेखांचा विचार करून त्यावरून पुढील ३ अनुमाने कादिली आहेतः (१) सामान्यतः या कालाचें गतवर्ष प्रचारांत आहे. कचित् वर्तमानवर्ष प्रचारोत आहे.(२) विक्रम वर्ष आरंभी कार्तिकादि होते, परंतु शकवर्षाच्या साह• Indian Ant query, XX, P. 149 Ir. + पूर्णिमान्त आणि अमान्त या पद्धतींचा विचार पुढे केला आहे. + Indian Antiquary, XX. P. 898 IT. परंतु गत आणि वर्तमान यांविषयीं वरील मजकूर पहा.