पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/371

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(३७२) ग्रहस्थिति दिली आहे, ती ८२० याबद्दल सांप्रतच्या पद्धतीने ८१९ धरून जुळते. तेव्हां त्या पुराणाचा रचनाकाल शकवर्ष ८१९ की २० ही शंका येते. आपल्या प्रांतांत व या देशांतल्या बहुतेक प्रांतांत ज्या शकवर्षास शकाचे १८१८ वें वर्ष म. टले आहे त्यास तामिळ, तेलंगी आणि म्हैसुरांतील कानडी लिपीत छापलेल्या काही पंचांगांत १८१९ वें वर्ष झटले आहे. या भेदाचे कारण असे दिसते. सिद्धांतथांत कलियुगाच्या आरंभीचे ग्रह दिलेले असतात ते कलिवर्ष पहिले याच्या आरंभीचे होत. कलिवर्ष ११वे याच्या आरंभीचे ग्रह काढणे झाल्यास कलियुगाच्या आरंभापासून तेथपर्यंत गावर्षे १० झाली, ह्मणून १० वर्षांची गति युगारंभीच्या स्थितीत मिळविली पाहिजे. अशा प्रकारच्या गणितांत ११ च्या जागी १० ही संख्या घ्यावी लागते. याप्रमाणेच वर सांगितलेली पुराणरचनेची ८१९ व ८२० ही वर्षे असावी असें मनांत येते. ह्मणजे ८२० हे वर्तमानवर्ष व ८१९ हे गतवर्ष असे वाटते. ताम्रपटादि लेखांत अशी उदाहरणे काही आढळतात. शकाच्या ज्या वर्षास या प्रांतांत १८ ह्मणतात, त्यास मद्रासइलाख्यांतील कांहीं पंचांगांत १८१९ ह्मणतात असें वर सांगितले. परंतु गत आणि वर्तमान हा भेद तिकडे वस्तुतः लोकांस माहित आहे की नाही व तो प्रचारांत आहे की नाही या षयी मला संशय आहे. हल्ली तंजावर प्रांतातील अण्णा अयंगार याने केलेली तामीळ लिपीत छापलेली पंचांगें मद्रास इलाख्यांतील तामीळ प्रांतांत चालतात. असली बन्याच वर्षांची पंचांगें मजपाशी आहेत. त्यांत गेल्या सर्वजित् नामक संवत्सराच्या त्या पंचांगांत शकवर्ष १८०९ लिहिले आहे. आणि त्याच्याच पुढच्या सर्वधारी संवत्सराच्या त्याच कर्त्याच्या पंचांगांत शकवर्ष १८११ दिले आहे. या वर्षांस इतर प्रांतांत अनुक्रमें १८०९ आणि १८१० ह्मणतात. यावरून पंचांगकारासच गत आणि वर्तमान हा भेद माहित नाही असे दिसते; मग इतरांस कोठन ! मी तिकडे चौकशी केली, त्यांत मद्रास एथील प्रसिद्ध नटेशशाखी आणि तंजावर प्रांतांतील तिरुवादि येथील प्रसिद्ध विद्वान् सुंदरेश्वर औती आणि व्यंकटेश्वर दीक्षित यांजकडून माहिती लिहून आली तिजवरून दिसते की, वर ज्यास वर्तमान वर्ष झटले आहे ते तिकडे हल्ली मुळींच प्रचारांत नाही. तेव्हां गत आणि वर्तमान हा भेद काल्पनिकच असावा व एकाच वर्षास चुकीमुळे निरनिराळे दोन अंक कधी कोणी लाविले असावे असें ह्मणण्यास जागा आहे. तो भेद खरोखरच असला तर कलिकाल आणि शक काल हे दोन काल ज्योतिष गणितग्रंथांत प्रचारांत आहेत, त्यांसंबंधे मात्र होण्याचा संभव आहे. त्यांतही कलिवर्षांस तो भेद स्पष्टपणे लावतां येतो. विक्रम इत्यादिक काल ज्योतिषगणितांत प्रचारत नाहीत, त्यांसंबंधे हा भेद होण्याचे कारण दिसत नाही. त्यांतल्याही एकाच वर्षास कधी कधी निरनिराळे दोन अंक लाविल्याची उदाहरणे सांपडतात. परंतु तो चुकीचा परिणाम असावा. सारांश अनेक दृष्टींनी विचार करून माझें असें मत झाले आहे की वर्तमान व गत हा भेद वस्तुतः नाही. सर्व वर्षे वर्तमानच होत. उदाहरण शक १८१८ दुर्मुख संवत्सर हे सांप्रतचें (हा लेख लिहित आहे या वेळचे) वर्ष वर्तमानच होय. पुढील विचारांत निरनिराळ्या कालांच्या वर्षांचे अंक देऊन तुलना केली आहे तेथे सांप्रत बहुतेक हिंदुस्थानांत वर्षाला जो अंक