पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/370

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रकरण २. पंचांग. पंचांगाच्या पांच अंगांचें गणित स्पष्टाधिकारांतच असते. ह्मणून पंचांगविचार याच अधिकारात करितों. त्यांत शककाल, वर्षारंभ, संवत्सर, पूर्णिमांत अमांत मान. इत्यादि कांही गोष्टी पंचांगाच्या अंगभूतच आहेत; त्यांचा विचार प्रथम करून मग पंचांगाची पांच अंगें, निरनिराळ्या प्रकारची पंचांगें, इत्यादि गोष्टींचा विचार करूं. ज्योतिष गणितांत ग्रहस्थिति सांगण्यास आरंभकाल कोणता तरी पाहिजे. त्याप्रमाणे महायुगारंभ किंवा कोणत्या तरी युगाचा आरंभ आणि मुख्यतः कलियुगारंभ हा गणितारंभकाल सिद्धांतग्रंथांत असतो. आणि करणग्रंथांत शककालाचें कोणते तरी वर्ष आरंभास घेतलें असतें. एक दोन ज्योतिष ग्रंथांत शकाबरोबर विक्रमसंवत् घेतलेला आढळतो. रामविनोदकरणांत शककालाबरोबर अकबर-काल दिला आहे आणि फत्तेशाहप्रकाश यांत शकाबरोबर फत्तेशाह काल दिला आहे. वार्षिक तंत्र (पृ २९) हा वस्तुतः करणग्रंथ असून त्यांत कलियुगारंभापासून गणित आहे. आणि तदनुसार कर्त्याने त्यास तंत्र नांव दिले आहे. तरी त्यांत शककालाचा संबंध आलाच आहे. आपल्या पंचांगांत आरंभी संवत्सरफलविचारांत युधिष्ठिर, विक्रम, शालिवानिरनिराळ्या काला- हन इत्यादि सहा शककर्ते कलियुगांतले सांगितलेले असचा विचार. तात. त्यांतले युधिष्ठिर इत्यादिक तीन होऊन गेले आणि बाकीचे व्हावयाचे आहेत. शक हा शब्द वस्तुतः कोणा एका जातीच्या लोकांचा वाचक आहे. विक्रमाने शक राजांचा पराभव केला, तेव्हांपासून शक या नांवानें कालगणना सुरू झाली असें भटोत्पल इत्यादिकांनी लिहिले आहे. परंतु हे सयुक्तिक दिसत नाही. शक जातीच्याच राजांनी आपल्या नावानेच कालगणना सुरू केली असावी. शक हा शब्द मूळचा विशेष जातीचा असून युधिष्ठिरशक, विक्रमशक इत्यादि शब्दांत तो काल या अर्थाचा झणजे इंग्रजीतील Bra (इरा) या अर्थाचा व आरबी भाषेतील सन या अर्थाचा वाचक झाला आहे. सन या सामान्य अर्थी काल या संस्कृत शब्दाचा प्रयोग प्राचीन ताम्रपटादि लेखांत आढळतो. उदाहरण शकनृपकाल, विक्रमकाल, गुप्तकाल (गुप्त नांवाच्या राजांच्या नावाने सुरू झालेला काल), असे प्रयोग येतात. ह्मणून पुढील विवेचनांत काल हा शब्द वर सांगितलेल्या (सन या) अर्थी योजिला आहे. विक्रमकाल, शककाल इत्यादि अनेक काल या देशांत प्रचारांत होते व आहेत. त्यांचे थोडेसे वर्णन करितों. वर सांगितलेले विवेचन करण्यापूर्वी गतवर्ष आणि वर्तमानवर्ष असा एक भेद आहे त्याविषयी थोडेसें सांगतों ब्रह्मगुप्ताच्या वर्ण॥णवत- नांत (पृ० २२५) उत्तर पुराणाचा रचनाकाल सांगिमानवषे. तला आहे तो शक ८२० हा आहे. परंतु त्या वेळची गतव