पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/369

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

त्यामुळे ज्याधै सूक्ष्म होत नाहीत हे खरे. परंतु ब्रह्मगुप्ताने व्यास आणि परिधि यांचे जें गुणोत्तर मानले आहे (१ : Vi), त्यावरून किंवा इतर रीतीने त्याने घेतलेल्या ३२७० व्यासार्धास मेळ पडतो, असे मला वाटत नाही. ज्यासाधनाचे निरनिराळे प्रकार आणि ज्योत्पत्ति यांचे विवेचन भास्कराचायांने पुष्कळ केले आहे. सिद्धांततत्वविवेककारानेही याबद्दल पुष्कळ विचार केला आहे. त्याबद्दल एथे विस्तार करण्याचं कारण नाही. आमच्या ग्रंथांतल्या ज्योत्पत्तीविषयी प्लेफेअर नामक एक युरोपियन (इ. स. १७८२) ह्मणतो" की "हिंदु ज्योतिष्यांच्या ज्यासाधनाच्यां रीतीमध्ये पुढील प्रमेय गर्भित आहे. गणितप्रमाणांत असणाऱ्या तीन धनुष्यांपैकी आयंतांच्या भुजज्यांची बेरीज आणि मधल्याच्या भुजज्येची दुप्पट यांचे गुणोत्तर, त्या धनुष्यांच्या अंतराची कोटिज्या आणि त्रिज्या यांच्या गुणोत्तराबरोबर असते. हे प्रमेय युरोपियन गणकांस १७ व्या शतकाच्या आरंभापर्यंत माहीत होते, असें दिसत नाही. ही गोष्ट आमच्या लोकांस भूषणास्पद आहे. तसेच ग्रीक लोकांस ज्या मात्र माहित होत्या; ज्या(चा उपयोग करण्याचे माहीत नव्हते.आरव ज्योतिष्यांसही ते इ.स. च्या ९ व्या शतकापर्यंत माहीत नव्हते.आमच्या ज्योतिष्यांस ते शक ४२१ पासून माहीत आहे हे प्रथमार्यभटवर्णनांत सांगितलेंच आहे. स्पर्शरेषा, छेदनरेषा, यांची कल्पना मात्र आमच्या लोकांस झाली नाही. तथापि केवळ भुजज्यांनी निर्वाह होतो. ग्रह वक्री मार्गी केव्हां होतात, उदयास्त केव्हां पावतात, या व दुसन्याही काही किरकोळ गोष्टी स्पष्टाधिकारांत असतात. त्यांविषयीं एथे विस्तार इतर गोष्टा करण्याचे कारण नाहा.. सूर्याची परमक्रांति आमच्या ग्रंथांत २४ मानतात. शकापूर्वी २४०० वर्षे या कालाच्या सुमारास क्रांतिवृत्ताचे तिर्यकत्व इतके होते. ते उत्तक्रांतिः रोतर कमी होत आहे. शक १८१८ च्या आरंभीं तें २३।२७।१० आहे. ह्मणजे सांप्रत आमच्या ग्रंथांवरून येणारी परम क्रांति ३२ कला ५० बि. चुकीची आहे. शक ४०० च्या सुमारास तिर्यकत्व सुमारे २३।३९ होतें. टालमीच्या ग्रंथांत ( सिंटाक्सिस भाग 1) तिर्यकत्व २३१५० व २३।५२।३० यांच्या दरम्यान आहे, व हे त्याने हिपार्कसच्या ग्रंथांतलें घेतलें असें प्रो. व्हिटनीचें मत दिसते. हे तिर्यकत्व आमच्या ग्रंथांशी मिळत नाही. यावरून हिपार्कस व टालमी यांच्या ग्रंथांवरून ते आमच्या लोकांनी घेतले नाहीं असें सिद्ध होते. अथत ने स्वतंत्रपणे त्यांनी काढले; व ते शकाच्यापूर्वी केव्हां तरी काढले असले पाहिजे. यंत्रराज ग्रंथांत क्रांतिवत्ततिर्यकत्व २३।३५ मानले आहे. (तितकें तें वस्तुतः शक ९०० च्या सुमारे होते) परंतु पुढील इतर कोणी ग्रंथकारांनी हें स्वीकारलें नाहीं किंवा स्वतःही काढले नाही.

  • एशियाटिक रिसर्चस पु. १.

बजेसचे मू. सि. भाषांतर पृ.५७.