पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/368

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

द्धांतांत भुजज्यो काढतांना त्रिज्या ३४३८ मानली आहे. बागुताने ३२७० मानली आहे. सिद्धांततत्वविवेककार कमलाकर याने ६० विज्या मानून प्रत्येक अंशाची भुजज्या दिली आहे. करण ग्रंथांत बहुधा त्रिज्या १२० मानिली असते. मुंजालाने ८ अंश ८ कला मानिली आहे आणि चांद्रमानकार गंगाधर (पृ. ३१६) याने १९१ मानिली आहे असें सुधाकर लिहितात. यंत्रराज ग्रंथांत त्रिज्या ३६०० मानून प्रत्येक अंशाची भुजज्या दिली आहे. केरोपंत नाना ह्मणतात की हिंदु ज्योतिषी त्रिज्या ३४३८ मानतात, ही आडनीड आहे, यामुळे गुणाकार भागाकार उगाच वाढतो. हे काही अंशी खरे आहे. परंतु गुणाकार भागाकार न वाढण्याच्या युक्ति आमच्या ज्योतिष्यांनी जागोजाग योजलेल्या आहेत. आणि ती त्रिज्या धरण्याचा हेतु स्वाभाविक आहे. तो असा की वर्तुलपरिधीच्या कला २१६०० होतात. आणि त्यांवरून व्यासा, ३४३८ येते. व्यास आणि परिधि यांचे विशेष सूक्ष्म गुणोत्तर १:३.१४१५९२७ हे धरून २१६०० परिधीचें व्यासार्ध ३४३७९ येते. यांतील अपूर्णांक सोडून आमच्या ग्रंथकारांनी ते ३४३८ धरले आहे. यावरून आमच्या ज्योतिष्यांची त्रिज्या पुष्कळ सूक्ष्म आहे, हे दिसून येईल. व्यास आणि परिधि यांचे गुणोत्तर आमच्या ग्रंथकारांनी निरनिराळे मानिलेलें खाली दिले आहे. सूर्यसिद्धांत, ब्रह्मगुप्त, १:/१० ह्मणजे १:३.१६२३ द्वितीयार्यभट. प्रथमायभट २०००० ६१८३२ मणजे १:३.१४१६ द्वितीयार्यभट, भास्कराचार्य ७:२२ ह्मणजे १:३.१४२८. भास्कराचार्य १२५०: ३९२७ ह्मणजे १:३१४१६ ३४३८ त्रिज्येवरून १:३.१४१३६ सांप्रतचे युरोपियन सूक्ष्ममान १:३.१४१५९२७ यावरून व्यास आणि परिधि यांचे गुणोत्तर आमच्या लोकांस सूक्ष्मतः माहीत होतें. कोठे त्यांनी स्थूल घेतले आहे ते केवळ व्यवहारसौकर्यार्थ होय. ब्रह्मगुप्ताने व्यासार्ध ३२७० मानले आहे, याचे कारण तो असे सांगतो भगणकलाव्यासाधं भवति कलाभिर्यतो न सकलाभिः ज्यार्धानि न स्फुटानि ततः कृतं व्यासदलमन्यत् ॥ १६ ॥ गोलाध्याय. सूक्ष्मगुणोत्तराने २१६० कलांच्या परिधीचें व्यासार्ध पूर्ण ३४३८ होत नाहीं, ब

  • ग्र. सा. को. पृ. ३१४ पहा.

युरोपियन गणक १० चा दशघात किंवा दुसरा कोणता तरी घात त्रिज्या मानतात. त्यासंबंध तरी कोष्टकें आयती तयार असतात, त्यांत प्रत्येक कलेची भुजज्यादि गुणोत्तर असा म्हणून गणित सोपे होते; आणि त्रिज्या फार मोठी यामुळे सूक्ष्मता फार साधते. +दितीयार्यभट आणि भास्कराचार्य यांचरों हें गुणोत्तर दोन दोन प्रकारांनी सांगितले