पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/366

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

रविफल ठरविले असे दिसून येते. टालमीचा रविफलसंस्कार २ अं. २३ क. आहे. अर्थात् त्याचा आमच्या ग्रंथांशी काही संबंध नाही. टालमीने रविफल २।२३ दिलें आहे. परंतु वस्तुतः त्याच्या काली ( सुमारे शके ७०) ते २ अंश होते. तेव्हां तें टालमीने स्वतः काढले नाही, असे सहज दिसते. पूर्वीच्या कोणा ग्रंथकाराचें घेतले असावें. आणि त्याच्यापूर्वी रविस्पष्टीकरणाचें ज्ञान हिपार्कसखेरीज दुसरे कोणास झाले नव्हते. यावरून आणि टालमी व हिपार्कस यांचे वर्षमान एकच* (३६५।१४।४८) आहे यावरून टालमीनें रविफलसंस्कार हिपार्कसचा घेतला असावा असें अनुमान होते. व हिपार्कसच्या आधारेंरचलेल्या रोमकसिद्धांतांत रविपरमफल २।२३।२३ आहे, यावरून ते अनुमान दृढ होतें. टालमीनंतरच्या एखाद्या ग्रंथावरून हिंदूंनी ज्योतिषगणित घेतले असे कोणाचें ह्मणणें नाहींच. टालमीनंतर तीनचारशे वर्षांत तसा ज्योतिषी कोणी झालाच नाही. मूळ रोमकसिद्धांतांतला रविफलसंस्कार आमच्या कोणत्याही इतर सिद्धांतांत नाही. या सर्व गोष्टींवरून कोणत्याही पाश्चात्य ग्रंथावरून आमच्या लोकांनी रविफलसंस्कार घेतला नाही, त्यांनींच शकापूर्वीच तो स्वतः काढिला हे निर्विवाद सिद्ध होते, असें निष्पक्षपाती मनुष्यास कबूल केले पाहिजे. आधुनिक परममंदफलमाने वर दिली आहेत (पृ. ३६२), त्यांत चंद्रफल ६ अं. १७ क. आहे. परंतु मध्यमचंद्र आणि स्पष्टचंद्र यांत फरक पाडणारी मंदफलाखेरीज आणखीही कारणे आहेत. यामुळे मध्यमचंद्र आणि स्पष्टचंद्र यांत कधी कधी सुमारे आठ साडेआठ अंश फरक पडतो. हा काढण्याकरितां मध्यमचंद्रास सुमारे ४० संस्कार करावे लागतात. त्यांपैकी मंदफलसंस्कार वर दिलेला फारच मोठा आहे आणि दुसरे चार बरेच मोठे आहेत. त्यांपैकी व्हेरिएशन (पाक्षिक अथवा तैथिक ) ह्मणून संस्कार आहे त्याचे उपकरण (चंद्र-स्पष्ट रवि) असें आहे. अर्थात् पूर्णिमा आणि अमावास्या यांच्या अंती हे उपकरण ६ राशि आणि ० होतें. आणि त्यावेळी हा संस्कार शून्य । होतो. तसेंच चोहोंपैकी दुसरा इव्हेक्शन (च्युति ) ह्मणून संस्कार आहे त्याचे उपकरण " २ (संस्कृत चंद्र-स्पष्टरवि )-चंद्रकेंद्र ? असे आहे. यांतील पहिले पद पूर्णिमा आणि अमावास्या यांच्या अंती शून्य होते. झणजे त्यावेळी (०-चंद्रकेंद्र) एवढे उपकरण रहाते. हे उपकरण ३ किंवा ९ राशि असतां संस्कार महत्तम ह्मणजे १ अं. २०.२ क असतो. ह्मणून पूर्णिमा किंवा अमावास्या यांच्या अंती चंद्रकेंद्र३ किंवा ९राशि असेल तर इव्हेक्शन संस्काराचें उपकरण अं.क. ० -३ राशि = ९ राशि .-९ राशि = ३ राशि हे होऊन इव्हेक्शन संस्कार + १२०. - १२०. होतो. आणि त्यावेळी ह्मणजे * Grant's History of the Ph. Astronomy Chap. XVIII. 1 केरोपेती ग्र. सा. को. पृ. ११०. प. सा. को. पृ. १०६.