पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/365

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मंदफलाची आधुनिक माने वर दिली आहेत; परंतु ती सर्वकाळ सारखी नसतात. कालांतराने त्यांत फरक पडतो. रवीच्या मंदफलांत कालांतराने पडणारा फरक खालील * कोष्टकावरून दिसून येईल. शकारंभापूर्वीची वर्षे. परमफल. शकारंभानंतर वर्षे. परमफल. क. | ० . ० ० ० ० ० ० ० ० ० ७००० ० ० ० ...... ० ० ४००० ० ० ० ० ० . WWCAMG ०० ०० ० ६००० ७००० .. ० ० ० १००० ० ० ० ० ० ० यावरून दिसते की, रविफलसंस्कार दिवसेंदिवस कमी होत चालला आहे. आमच्या ग्रंथांत हा संस्कार २।१७४१ पासून २।८।५५ पर्यंत आहे. त्यांत प्राचीन ग्रंथांत तो जास्त आहे आणि अर्वाचीनांत कमी आहे, हे वरील (पृ. ३६२) कोष्टकांत दिसतेच आहे. यावरून प्रत्यक्ष वेधावरून निरनिराळ्या काळीं तो काढिलेला आहे असें सहज दिसते. आमच्या लोकांनी रविचंद्रसंस्कार ग्रहणांच्या वेधावरून ह्मणजे पर्वान्तींच्या त्यांच्या स्थितीवरून ठरविले आहेत. मध्यमचंद्रास स्पष्ट करण्यास हल्लीच्या युरोपियन सूक्ष्म गणितांत मोठमोठे ५ संस्कार आहेत. त्यांपैकी पर्वान्तींचे ४ संस्कार एकत्र होऊन जितका संस्कार उत्पन्न होतो तितकें चंद्राचे परमफल आमच्या लोकांनी ठरविले आहे, असें पुढे दाखविले आहे. पांचव्या संस्काराचें परम मान ११ कला आहे. (केरोपंती ग्र.सा.को. पृ.१०५). त्याचे उपकरण रविकेंद्र असल्यामुळे रविफलाप्रमाणेच तो संस्कार आहे असे वाटून तो रवीलाच कल्पिला. आणि चंद्रास जेथे तो धनर्ण आहे तेथे रवीस ऋणधन कल्पिला आहे यामुळे ग्रहणसंबंधी परिणामांत कांहीं चूक झाली नाही. आमच्या प्राचीन ग्रंथांतलें रविपरमफल २ अं. १४ क. यांत ११ कला वजा केल्या ह्मणजे वस्ततः रविफल २ अं. ३ क. आमच्या ग्रंथांत आहे. आणि इतके शकापूर्वी ५०० वर्षे याकाली होते.अर्थात् त्याकाली किंवा निदान शकापूर्वी दोनतीन शतकें तरी आमच्या लोकांनी

  • केरोपंती म. सा. को. वरून हे कोष्टक घेतले आहे.