पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/364

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

( ३६५) टालमीची मंदफलमाने वर दिली आहेत ती आमच्या कोणत्याही सिद्धांताशी मुळीच मिळत नाहीत, हे आमच्या कोणत्याही सिद्धांताशीं टालमीचा काही संबंध नाहीं या गोष्टीच्या अनेक प्रमाणांपैकी एक प्रमाण होय. मंदशीघ्र परिधींसंबंधे आणखी काही गोष्टी सांगण्यासारख्या आहेत त्या सांगतो. कांहीं सिंद्धांतांच्या मतें परिधिमानें ओजपदांती आणि युग्मपदांती भिन्न आहेत. पथमार्यभटाच्या या दोन मानांत पुष्कळ अंतर आहे. सूर्यसिद्धांताच्या दोहोंमध्ये तितकें अंतर नाही. ब्रह्मगुप्ताने शुक्राची मात्र परिधिमानें ओजयुग्मपदान्ती भिन्न मानली आहेत. सांप्रतचे रोमश, सोम, शाकल्योक्त ब्रह्म, वसिष्ट, हे सिद्धांत सांप्रतच्या सूर्यासद्धांताशी बहुतांशी सारखे आहेत, तरी रोमश आणि सोम यांत परिधिमानें सर्वत्र सारखींच मानली आहेत. आणि ती सूर्यासद्धांतांतल्या युग्मांतपरिधींशी मिळतात. सोमसिद्धांतांत बुधाचा मंदपरिधि ३४ आहे तो मात्र मिळत नाही. वसिष्ठसिद्धांतांत मंदपरिधि दिलेचा नाहीत. शीघ्रपरिधि दिले आहेत, ते सूर्यसिद्धांतांतल्यांशी मिळत नाहीत ह्मणून ते येथे देतों:मंगळ २३४ बुध १३३ गुरु ७१ शुक्र २६१ शनि ३९ हे उभयपदी एकच आहेत. आणि हे सूर्यसिद्धांताशी मिळत नाहीत. तरी त्यांतील उभयपदांतींच्या परिधीचे स्थूल रीतीने मध्यममान काढून हे दिले आहेत असें सहज दिसून येते. मजजवळ असलेल्या शाकल्योक्त ब्रह्मसिद्धांताच्या पुस्तकांत परिधि मुळीच नाहीत. परंतु ते जेथे असावे असे दिसते, तेथे माझ्या पुस्तकांत खंड आहे असें निःसंशय दिसते. मूळ पुस्तकांत ते असलेच पाहिजेत. लल्ल हा प्रथमार्यभटाचा अनुयायी असल्यामुळे दोघांची परिधिमाने सर्वांशी सारखी आहेत. भास्कराचार्य हा ब्रह्मगुप्ताचा अनुयायी होय, यामुळे दोघांची मानें सारखीच आहेत. परंतु भास्कराचार्याने शनीचा मंदपरिधि ५० अंश आणि शीघ्रपरिधि ४० अंश दिला आहे. ज्ञानराजरूत सुंदरसिद्धांतांत परिधिमानें वर्तमानसूर्यसिद्धांतानुसारी आहेत. सिद्धांतसार्वभौमकार मुनश्विर याचे मत ओजयुग्मपदांती परिधि भिन्न मानणे अयुक्त असें आहे. वर्तमानसूर्यसिद्धांतातल्या ओजयुग्मपदान्तींच्या मानांची मध्यममाने काढून ती त्याने दिली आहेत. निरनिराळ्या करणग्रंथांत परिधिमानांत थोडाबहुत फरक केलेला आढळतो. परंतु तो त्यांत सूक्ष्मतेकडे कमी लक्ष दिले असल्यामुळेच आहे असे दिसून येते. त्यासंबंधे विशेष सांगण्यासारखें नाहीं.

  • पंचसिद्धांतिकोक्त रोमक सिद्धांतांत चंद्राचे परममंदफल ४ अं. ५७ क. आहे. (पं. सि. ८.६ पहा). हे टालमीच्याशी मिळत नाही. पंचसिद्धांतिकोक्त रोमकसिद्धांत टालमीचा नव्हे याचे हैं एक प्रमाण होय.

काशी एथे छापलेली प्रत आणि डे. कालेज संग्रहांतील प्रत या दोहोंतही नाहींत. पहिल्या अध्यायाचे १११ श्लोक झाल्यावर “ मौाचतुष्के" एवढाच अर्धवट श्लोक असून पुढे दुसरा अध्याय आहे; त्याच्या आरंभी निराळंच मकरण आहे. मध्ये परािधि असावे असे दिसते. ग्वाल्हेर आणि आटें येथील प्रतींत आणि पुणे आनंदाश्रमांतील (४३४१ च्या) प्रतीत त्याच स्थळी हा खंड आहे, हे आश्चर्य होय.