पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/363

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(३६४) माने वर दिली आहेत त्यांची तुलना करितां येईलच. परंतु ती करण्यास सोपें पडावें ह्मणून आमच्या सिद्धांतांपैकी प्रथमार्यभटाची ओजपदांतीची परममंदफलें पुनः खाली दिली आहेत. परममंदफलें. प्रथमायसिद्धांत. टालमी. क | अं आधुनिक. राव चंद्र मंगळ vo - ० ० बुध ५३ शुक्र शनि २३ | ३२ । ६ बुधशुक्रांची आधुनिक माने आणि आमच्या ग्रंथांतली त्यांची माने यांची तुलना करण्यासारखी नाही. कारण आधुनिकांची ती मानें केवळ सूर्यबिंबस्थ द्रष्टयाच्या संबंधाने आहेत; आणि आमच्या ग्रंथांत तीच मानें भूस्थद्रष्टयास जितकी दिसतील तितकी दिली आहेत. इतर ग्रहांच्या दोन्ही ग्रंथांतील मानांची तुलना करण्यास हरकत नाही. ती केली असता दिसून येते, की आमच्या ग्रंथांतलीं मानें आधुनिकांशी पुष्कळ अंशी मिळतात. आधुनिक सिद्धांताप्रमाणे चंद्रकक्षा आणि ग्रहांच्या कक्षा दीर्घवर्तुल आहेत. त्यांची कक्षाकेंद्रच्युति ज्या मानाने कमजास्त असेल त्या मानाने त्यांचे मंदफल कमजास्त असते. आणि ही मंदफलें आमच्या ग्रंथांतील आधुनिकांशी मिळतात. तसेंच पूर्वी आमच्या ग्रंथांतील ग्रहगतीचे स्वरूप परिच्छेदप्रकाराने दाखविले आहे त्यावरून दिसून येते की, आमच्या ग्रंथकारांनी ग्रहकक्षा दीर्घवर्तुल मानिल्या नाहीत, तरी कक्षामध्यापासून ग्रह सर्वकाळ सारख्या अंतरावर नसतात, असे त्यांनी मानले आहे; आणि त्या कक्षांत उच्च नीच स्थाने मानून तदनुसार फलांत भेद होतो असे मानले आहे. यावरून ग्रहाची मध्यमगति आणि स्पष्ट गति यांत भेद पडण्याचे एक मुख्य कारण जें ग्रहाचें (किंवा चंद्राचे) दीर्घवर्तुलांत फिरणे हे पर्यायाने आमच्या ग्रंथकारांस माहीत होते असे दिसून येते. मंदस्पष्टग्रह आपल्या कक्षांत पृथ्वीपासून कमजास्त अंतरावर असतील त्या मानाने त्यांस शीघ्रफलसंस्कार उत्पन्न होतो. तो शीघ्रफलसंस्कार आमच्या ग्रंथांतला वरील कोष्टकांत (पृ० ३६३) दिला आहे. आणि त्यावरून ग्रहांचे मंदकर्ण काढलेले आधुनिकांशी मिळतात, असें पूर्वी (पृ० ३१९) दाखविले आहे. त्यावरून व वरील एकंदर विवेचनावरून दिसते की, पृथ्वी सूर्याभोवती फिरते यामुळे ग्रहांचें सूर्यसंबंधाने में मंदस्पष्टस्थान त्यांत पृथ्वीवरील पाहणारासंबंधे अधिकच भेद पडतो, हे जे ग्रहांची मध्यमगति आणि स्पष्ट गति यांत भेद पडण्याचे दुसरे कारण त्याचे ज्ञान आमच्या ज्योतिष्यांस पर्यायाने होतें.