पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/359

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अहः पूर्वगत्या प्रतिमंडलेनैव भ्रमति । यदेतत्रीचीच्चवृत्तं तत् प्राजर्गणकैः फलार्थ कल्पितं ॥ गोलाध्याय, छेद्यकाधिकार. अर्थ-ग्रह वस्तुतः पूर्वगतीने प्रतिवृत्तांतच फिरतो. नीचोच्चवृत्त हे केवळ कल्पक गणकांनी फलार्थ कल्पिलें आहे. वरील आकृतीत प्रतिवृत्ताचा उ हा बिंदु इतर सर्व बिंदूंपेक्षां भूमध्यापासून अति दूर आहे. त्यास उच्च ह्मणतात. आणि नी हा अति समीप आहे. त्यास नीच ह्मणतात. मंदप्रतिवृत्ताच्या उच्चास मंदोच ह्मणतात, आणि शीघ्रप्रतिवृत्तांतल्या उच्चास शीघ्रोच्च ह्मणतात. ग्रहांच्या मंदोच्चांचे भोग आणि त्यांची गति ह्यांविषयी पूर्वी (पृ. २०६)प्रथमार्यभटविवेचनांत बरेंच विवेचन केले आहे. मंदोच्चांची गति* अत्यल्प आहे. भौमादि बहिर्वर्ती ग्रहांचे शीघ्रोच्च सूर्य हेच मानितात आणि आधुनिक सिद्धांताप्रमाणे बुधशुक्राची आपापल्या कक्षावृत्तामध्ये जी गति तीच आमच्या ग्रंथांत त्यांच्या शीघ्रोच्चांची मानिली आहे. वरील आकृतीवरून दिसून येते की, उच्चनीच स्थानी जेव्हां ग्रह असतो तेव्हां कक्षावृत्तामध्ये मध्यमग्रह आणि स्पष्टग्रह एकाच स्थानी दिसतात. ह्मणजे त्यांचा फलसंस्कार त्या वेळी शून्य असतो. उच्चापासून पुढे तीन राशींपर्यंत जसजसा ग्रह जातो तसतसा फलसंस्कार वाढत जा. तो. पुढें नीचापर्यंत कमी होत जातो. पुढे तीन राशींपर्यंत वाढत जातो आणि पुढे उच्चापर्यंत कमी होत जातो. सारांश ग्रहाच्या मध्यमगतींत भेद पडतो तो उच्च संबंध पडतो. दोन्ही उच्चांस हीच गोष्ट लागू आहे. या उच्चांसंबंधे सूर्यसिद्धांतांत असें मटले आहे: अदृश्यरूयाः कालस्य मूर्तयो भगणाश्रिताः । शीप्रमंदोच्चपाताख्या ग्रहाणां गतिहेतवः ॥२॥ तद्वातरश्मिभिर्बद्धास्तैः सव्येतरपाणिभिः । प्राक्पश्चादपकृष्यंते यथासनं स्वदिङ्मुखं ॥२॥ स्पष्टाधिकार. अर्थ-भगणाचा आश्रय करून असलेल्या शीघ्रोच्च, मंदोच्च, पात या नांवांच्या काळाच्या अदृश्यरूप मर्ति ग्रहगतीस कारणीभूत आहेत. त्यांच्या हातांत असलेल्या ] वायुरूप रश्मींनी बद्ध झालेल्या ग्रहांस त्या कालमूर्ति उजव्याडाव्या हातांनी पुढे मागे आपल्याकडे ओढतात.

  • रविमंदोच्च गतिमान् आहे ही गोष्ट प्रथम आरव ज्योतिषी अलबटानी (इ. स. ८८०) याने शोधून काढिली असें ग्रांट ह्मणतो (History of Phi. Astro. p. 97). अर्थात् ती व इतर मंदोच्चे गतिमान आहेत ही गोष्ट हिपार्कस व टालमी यांस माहित नव्हती. परंतु आमच्या ब्रह्म गुप्ताने (इ. स. ६२८) मंदोच्चगति सांगितली आहे. शिवाय सांप्रतच्या सूर्यसिद्धांतांतही ती आहे. आमच्या ग्रंथांत मंदोचगति फार थोडी आहे म्हणून प्रो. व्हिटने याने त्याबद्दल केवल उपहास केला आहे. परंतु त्याचे कारण एवढेच की टालमीस उचगति माहीत नसतां हिंदूंस ती माहीत आहे हैं कबल करून पाश्चात्यांस हीनत्व आणणे ही गोष्ट त्याच्या पक्षपाती स्वभावास सहन झा ली नाही. परंतु आमच्या ग्रंथांतील उच्चगति व्हिटने यास जितकी अल्प वाटते तितकी ती अल्प नाहीं असें मी प्रथमार्यभटविवेचनांत सिद्ध केले आहे.

+ एथे गति झणजे स्पष्टगति समजावयाची. + पुढे मागें झणजे मध्यम ग्रहाची जी स्थिति येईल तिच्या पुढेमागें. (रंगनाथाने एथे किंचित् भिन्न अर्थ केला आहे. ) पातांच्या योगाने दक्षिणोत्तर स्थिति बदलते.