पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/358

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(३५९) मंदांत्यफलाइतक्या अंतरावर केंद्र करून वृत्त काढावें. ह्यास मंदप्रतिवृत्त ह्मणतात. शनि, गुरु, मंगळ हे मंदप्रतिमंडलांत गमन करीत असतां मंदकक्षावृत्तामध्ये जेथे दिसतात तेथे त्यांचे मंदस्पष्ट सांगितले आहेत. (तें मंदस्पष्ट शनिगुरुभौमांचे स्थान होय ). तसेच ते शीघ्रप्रतिवृत्तामध्ये समजावे. ते पुनः शीघ्रकक्षावृत्तामध्ये जेथे दिसतात तेथे ते स्फुटग्रह असतात. (ते त्यांचे स्पष्ट स्थान समजावें ). पृथ्वी आहे मध्य ज्याचा असें वृत्त हे बुधशुक्रांचें मंदकक्षावृत्त असते. त्याच्या केंद्रापासून मंदांत्यफलाइतक्या अंतरावर मंदप्रतिमंडळाचा मध्य असतो. त्यांत जेथे रवि असेल तेथे शीघ्रप्रतिमंडळाचा मध्य समजावा. त्याचें ( शीघ्रप्रतिवृत्ताचें ) मान शीघ्रस्व वृत्ताइतकें सांगितले आहे. त्या वृत्तांत बुधशुक्र सदा फिरत असतात. फलसंस्काराची उपपत्ति दुसऱ्या एका प्रकाराने झणजे नीचोच्चवृत्त ह्मणून एक वृत्त कल्पून त्याच्या योगाने करीत असतात. भास्कराचार्य याविषयी असें ह्मणतो. कक्षास्थमध्यग्रहचिन्हतोथ वृत्तं लिखेदंत्यफलज्यया तत् ।। नीचोच्चसं रचयेच्च रेखां कुमाध्यतो मध्यखगोपरिस्थां ॥ २४ ॥ कुमध्यतो दूरतरे प्रदेशे रेखायुते तुंगमिह प्रकल्प्यं ।। नीचं तथासन्नतरेऽथ तिर्यङ् नीचोच्चमध्ये रचयेच्चरेखां ॥ २५ ॥ नीचोच्चवृत्ते भगणांकितेस्मिन् मांदे विलोमं निजकेंद्रगत्या ।।। शैप्रयेऽनुलोमं भ्रमति स्वतुंगादारभ्य मध्ययुचरो हि यस्मात् ॥ २६ ॥ अतो यथोकं मृदुशीकेंद्र देयं निजोचायुचरस्तदने । छेद्यकाधिकार. अर्थ-कक्षेत असणान्या मध्यग्रहापासून अंत्यफलज्येनें वर्तुल काटावें. तें नीचोच्चवृत्त होय. भूमध्यापासून मध्यग्रहावरून जाणारी रेखा काढावी. ती रेखा पृथ्वीमध्यापासून अति दूर अंतरावर जेथे ( नीचाच्चवृत्त परिधीस ) मिळते तें उच्च होय; आणि जवळ मिळते तें नीच होय. नीचोच्चांमध्ये आडवी एक रेषा काढावी. नीचोच्च वृत्ताच्या परिधीवर राश्यंशांच्या खुणा कराव्या. आपापल्या उ चापासून मांद नीचाच्चवृत्तांत अनु. लोमगतीने आणि शैघ्र नीचोच्चवृत्तांत प्रतिलोमगतीने आपल्या केंद्रगतीने (मंदकेंद्र किंवा शीघ्रकेंद्र यांच्या गतीने ) मध्यम ग्रह फिरतो. ह्मणून त्याप्रमाणे आपापल्या (मंदशीघ्र) उच्चांपासून मंदशीघ्र केंद्र घ्यावें. त्याच्या अग्रभागी ग्रह दिसतो. ( मंदाग्री मंद स्पष्ट आणि शीघ्रामी शीघ्र स्पष्ट.) वर काढिलेल्या आकृतींत भू ज्याचा मध्य आहे तें कक्षावृत्त होय. म हैं मांदकर्मात मध्यम ग्रहाचे आणि शीघ्रकर्मात मंदस्पष्ट ग्रहाचे स्थान होय. आणि तोच मांद अथवा शघ्र नीचोच्चवृत्ताचा मध्य होय. त्यापासून परमफलज्येनें नीचोच्चवृत्त काढिलेलें आहे. त्यांत ग्र हा ग्रह होय. आणि त्यापासून भू ह्यामध्यास सांधणारी रेषा कक्षावृत्तास जेथे छोदितें तें स्प हे स्पष्टग्रहाचे ( मंदस्पटाचे किंवा शीघ्रस्पष्टाचे) स्थान होय. या उपपत्तीविषयी पुनः भास्कराचार्य ह्मणतो की: wwww