पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/360

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(३६१) उच्चे हे जीव आहेत अशी कल्पना करून त्यांस जसे महत्व सूर्यसिद्धांतांत दिलेले आहे तसे इतर कोणत्याही सिद्धांतांत दिलेले नाही. ब्रह्मगुप्त एवढेच ह्मणतो की प्रतिपादनार्थमुच्चा : प्रकल्पिता *ग्रहगतेस्तथा पाताः ॥ २९ ॥ गोलाध्याय. अर्थ-ग्रहगतीच्या प्रतिपादनार्थ उच्च आणि पात कल्पिले आहेत. सूर्यसिद्धांतांत ग्रह प्रतिवृत्तांत फिरतात असे स्पष्ट कोठे सांगितलें नाहीं; यामुळे त्यांत उच्चांच्या ठिकाणी मूर्तिकल्पना केली असे दिसते. परंतु ग्रह प्रतिवृत्तांत फिरतात असे मानले झणजे त्यांच्या मध्यमस्थितींत भेद साहजिक उत्पन्न होतो. तो भेद उच्चापासून ग्रहाचें जें अंतर त्याप्रमाणे कमजास्त असतो, एवढेच काय तें. कक्षावृत्ताच्या मध्यापासून परम मांद अथवा शैघ्य फलाच्या भुजज्येइतक्या अंतरावर प्रतिवृत्त कल्पितात, असें वर सांगितले. हे प्रत्येक ग्रहाचे मंदफल आणि शीघ्रफल आमच्या ग्रंथांत सांगितलेले असते. आणि तें, परमफलज्यातुल्यव्यासार्धवृत्तपरिधिरूपाने झणजे परमफलाइतक्या त्रिज्येनें वर्तुल काढिले असता त्याचा परिधि अमुक अंश असतो अशा रूपाने सांगण्याचा परिपाठ आहे. आणि त्यास सामान्यतः परिधि असेंच ह्मणतात. मंदफलसंबंधे परिधि ते मंदपरिधि, आणि शीप्रफलसंबंधे परिधि ते शीघ्रपरिधि. ही फलें परिधिरूपाने सांगण्याचे कारण वर सांगितलेला नीचोच्चवृत्तप्रकार होय, असे दिसते. स्वतंत्रपणे पाहिले असतां नीचोच्चवृत्तपरिधीचे ३६० अंश आहेतच. परंतु फल मोजावयाचें तें कक्षावृत्ताच्या अंशांनी मोजावयाचे ह्मणून नीचोच्चवृत्तपरिधीची परिमितिही त्याच अंशांनी सांगितलेली असते. निरनिराळ्या ग्रंथांत सांगितलेले मंदशीघ्रपरिधि पुढील कोष्टकांत दिले आहेत. तसेच त्यांच्या विज्याही काढून दिल्या आहेत. ह्या त्रिज्या हींच परमफलाचीं मानें होत.' त्रिज्या काढण्यास परिधि आणि त्रिज्या यांचे गुणोत्तर प्रथमार्यभट, भास्कराचार्य, यांनी सांगितलेले झणजे ६२८३२:१०००० हे धरले आहे. केंद्राच्या तीन तीन राशींचें एक पद होतें. ओज म्हणजे पहिले तिसरें, आणि युग्म म्हणजे दुसरे चवथे. कांहीं सिद्धांतांच्या मते काही ग्रहांचें परिधिमान ओजपदांतींच्याहून युग्मपदांती भिन्न असते, आणि मध्ये ते त्या प्रमाणानें कमजास्त होते. खालील कोष्टकांत पंचसिद्धांतिकेंतील कांहीं ग्रहांचे परिधि दिले नाहीत, ते पंचसिद्धांतिका पुस्तकावरून निःसंशय समजत नाहीत म्हणून दिले नाहीत. बाकी सिद्धांतांप्रमाणे युग्मान्तपरिधि जेथे दिले नाहीत तेथे ते ओजपदान्तींच्या इतके समजावयाचे.

  • गति झणजे येथे स्पष्टगति समजावयाची.

४६