पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/357

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

( ३५८ ) दुसरे कक्षावृत्त काढितात. ह्या शीघ्रकर्मातल्या कक्षावृत्ताच्या मध्यस्थानी पृथ्वीच मानितात. मंदस्पष्टग्रह आपल्या गतीनं शीघ्रप्रतिवृत्तामध्ये फिरत असलेला ह्या शीघ्रकक्षावृत्तामध्ये जेथे दिसेल ते त्याचे शीघ्रस्पष्टस्थान होय. पृथ्वीवरून पाहणारास ह्या स्थानी ग्रह दिसतो. कोणी मंदकक्षावृत्त तेच शीघ्र कक्षावृत्त समजून त्याच्या मध्यापासून शीघ्रांत्यफलज्यातुल्य अंतरावर कक्षावृत्ताएवढेच शीघ्रप्रतिवृत्त काढितात, आणि मंदकक्षावृत्तांत प्रथम कृतीने आलेला मंदस्पष्टग्रह शीघ्रप्रतिवृत्तांत नेऊन तो कक्षावृत्तांत जेथे दिसेल तें त्याचे स्पष्ट स्थान मानितात. दोहों प्रकारांचा परिणाम एकच येतो. वरील आकृतीवरून दिसून येईल की प्रतिवृत्तांत फिरणा-या ग्रहाचे भू बिंदूपासून अंतर सर्वत्र सारखें नसते. ग्रह उ बिंदूंत ह्मणजे उच्ची असतां अंतर महत्तम असते आणि नी बिंदूंत ह्मणजे नीची असतां लघुतम असते. ह्मणजे ग्रहाचा फि. रण्याचा मार्ग दीर्घवर्तुलारुति मानल्यासारखा झाला. भू हे या दीर्घवर्तुलाचे एक केंद्र होय. मंदशीघ्रफलसंबंधे परिले खप्रकार (आकति काढण्याचा प्रकार ) प्रथमार्यभटाचा टीकाकार परमेश्वर याने सुबोध रीतीने सांगितला आहे. तसा इतर कोणत्याही ग्रंथांत मला आढळला नाही. ह्मणून तो एथे देतो. त्रिज्याकृतं कुमध्यं कक्षावृत्तं भवेत् तु तच्छे घ्यं ॥ शीघ्रदिशि तस्य केंद्रात् शीग्रांत्यफलांतरे पुनः केंद्रं ॥ २ ॥ कृत्वा विलिखेत् वृत्तं शीघ्रप्रतिमंडलायमुदितमिदं ॥ इदमेव भवेन्मांदे कक्षावृत्तं पुनस्तु तत्केंद्रात् ॥ ३ ॥ केंद्रं कृत्वा मंदांत्यफलांतरे वृत्तमपि च मंददिशि ।। कुर्यात्प्रतिमंडलमिदमुदितं मांदं शनीड्यभपुत्राः ॥४॥ मांदप्रतिमंडलगास्तत्कक्षायां तु यत्र लक्ष्यते ।। तत्र हि तेषां मंदस्फुटाः प्रदिष्टास्तथैव शैने ते ॥ ५ ॥ प्रतिमंडले स्थिताः स्युस्ते लक्ष्यंते पुनस्तु शैवाख्ये॥ कक्षावृने यस्मिन् भागे तत्र स्फुटग्रहास्ते स्युः ॥ ६ ॥ मांदं कक्षावृत्तं प्रथमं बुधशुक्रायोः कुमध्यं स्यात् ॥ तत्केंद्रान्मंददिशि मंदांत्यफलांतरे तु मध्यं स्यात् ॥ ९ ॥ मांदप्रतिमंडलस्य तस्मिन् यत्र स्थितो रविस्तत्र ।। प्रतिमंडलस्य मध्यं शैवस्य तस्य मानमपि च गदितं ॥ १० ॥ शीघ्रस्ववृचतुल्यं तम्मिश्चरतः सदा ज्ञशुक्रौच ।। अर्थ-पृथ्वी आहे मध्य ज्याचा असें *त्रिज्यातुल्य व्यासार्धाने काढलेलें जें कक्षावृत्त तेंच शघ्र (शीघ्रकर्मसंबंधी कक्षावृत्त) होय. याच्या केंद्रापासून शीघ्र दिशेस शीघ्रांत्यफलाइतक्या अंतरावर पुनः केंद्र करून वृत्त काढावें. ह्यास शीघ्रप्रतिमंडल ह्मणतात. हेच मंदकर्मामध्ये कक्षावृत्त होते. पुनः त्याच्या केंद्रापासून मंददिशेकडे

  • त्रिज्या हा शब्द सांप्रत व्यासार्ध या अर्थी पारिभाषिक झाला आहे. परंतु त्याचा मूळचा अर्थ त्रिभ म्हणजे ३ राशि (९० अंश) यांची ज्या असा आहे. आणि आमच्या ज्योतिषग्रंथांत तो बहुधा त्याच अर्थी योजिला असतो. वर्तुल परिघाचे ३६० अंश (२१६०० कला) मानिले असतां व्यासार्थ ३४३८ कला होते. आणि ९० अंशांची भुजज्या व्यासार्धाएवढी असते. झणून त्रिज्या झणजे ३४३८ कला लांबीची रेषा असा अर्थ आमच्या ग्रंथांत सामान्यतः समजतात.