पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/356

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(३५७) दोन मुख्य कारणे पर्यायाने आमच्या ज्योतिष्यांस माहीत आहेत असें वर सांगितले ते पुढील विवेचनावरून दिसून येईल. मध्यम ग्रहावरून स्पष्ट ग्रह काढण्याची जी रीति आमच्या ग्रंथांत आहे, तिची उपपत्ति परिलेखद्वारा झणजे आकति काढून त्यांच्या साह्याने आमच्या ग्रंथांत दिलेली असते. ती उपपत्ति एथे सांगितली असतां तिजवरून ग्रहाचें मध्यम स्थान आणि स्पष्ट स्थान यांत फरक पडण्याची कारणे कोणती आहेत, याविषयी आमच्या ज्योतिष्यांच्या काय कल्पना आहेत ते समजून येईल, ह्मणून ती उपपत्ति सांगतों. पृथ्वीचा मध्य हा ज्याचा मध्य आहे असें ग्रह कक्षावृत्त काढतात. तसेच त्याच वृत्ताएवढे परंतु ज्याचा मध्य भूमध्याबाहर आहे असें एक दुसरें वृत्त कल्पितात; त्यास प्रतिवृत्त ह्मणतात. आणि मध्यम ग्रह त्या प्रतिवृत्तांत फिरतो असे मानतात. तो कक्षावृत्तांत ज्या स्थानी दिसेल ते त्याचे स्पष्ट स्थान होय. बाजूस काढलेल्या आकृतीत ज्याचा मध्य भू आहे तें कक्षावृत्त होय. तसेंचम मध्या. भोंवती काढलेले प्रतिवृत्त होय. 'त्यांत म. ग्र. हा मध्यम ग्रह होय. आणि तदनुसार कक्षावृत्तामध्येही म हे मध्यम ग्रहाचें स्थान होय. प्रतिवृत्तांतील म. प्र. आणि भू यांस सांधणान्या रेषेत भूमीवरील पाहणारास ग्रह दिसतो. त्या रेषेस कर्ण ह्मणतात. तो कर्ण कक्षावृत्तास रूप स्थानी छेदितो. तेथे कक्षावृत्तांत स्पष्ट ग्रह दिसतो. मध्यम आणि स्पष्ट यांचे अंतर मस्प यास फलसंस्कार ह्मणतात. ह्या फलाचें जें अति मोठे मान अनुभवास येते त्यास परम फल किंवा अंत्य फल ह्मणतात. आणि प्रतिवृत्त काढितात त्याचा मध्य कक्षावृत्ताच्या मध्यापासून अंत्यफलाच्या भुजज्येइतका अंतरावर काढितात. हे जे फल सांगितले त्यास मंदफल ह्मणतात. हा मंदफलसंस्कार मध्यम ग्रहास करून (ह्मणजे हे फल धनर्ण असेल त्याप्रमाणे मध्यम प्रहांत मिळवून किंवा वजा करून) आलेल्या स्पष्टग्रहास मंदस्पष्टग्रह ह्मणतात. सूर्य आणि चंद्र यांस हा एकच फलसंस्कार केला ह्मणजे ते स्पष्ट होतात. परंतु इतर पांच ग्रहांची मंदस्पष्ट स्थिति येते तीप्रमाणे ते पृथ्वीवरील पाहणारास दिसत नाहीत. (ह्मणजे आधुनिक सिद्धांताप्रमाणे असें ह्मणावयाचें की सूर्यावरून पाहणारास त्यांची ती स्थिति दिसेल.) त्यांस दुसरा एक संस्कार करावा लागतो, त्यास शीघ्रफलसंस्कार म्हणतात. तो मंदस्पष्टग्रहास देऊन जी स्थिति येते तीप्रमाणे पृथ्वीवरील पाहणारास ते दिसतात. तो संस्कार काढण्याकरितां शीघ्रप्रतिवृत्त कल्पितात. आणि मंदस्पष्टग्रह हा मध्यम मानून त्यावरून शीघ्रफल काढितात. मंदफल काढणे ह्यास मंदकर्म आणि शीघ्रफल काढणे ह्यास शीघ्रकर्म ह्मणतात. शीघ्रकर्माचें स्वरूप असें:-मंदकर्मामध्ये जे कक्षावृत्त काढितात तेंच शीघ्रकर्मांत शीघ्रप्रतिवृत्त मानितात. आणि त्याच्या मध्यापासून परमशीघ्रफलज्यातुल्य अंतरावर मध्य कल्पून