पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/355

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(३५६) (२) स्पष्टाधिकार. प्रकरण १. ग्रहांची स्पष्ट गतिस्थिति. ग्रहास भमंडळांतून एक प्रदक्षिणा करण्यास जो काळ लागतो त्या मानाने त्याची जी एका दिवसाची मध्यम गति येते तितकीच प्रत्यही प्रत्यक्ष आकाशांत अनुभवास येत नाही, तीहून कमजास्त होते. आणि त्यामुळे कोणत्या एका इष्ट दिवशी मध्यम गतीने त्याची स्थिति गणितानें जेथे येते तेथे तो प्रत्यक्ष दिसत नाही. आकाशांत प्रत्यक्ष दिसणारी जी ग्रहाची गतिस्थिति तिला स्पष्ट गतिस्थिति ह्मणतात. गणिताने आलेली जी मध्यम गतिस्थिति तिजवरून ग्रहाची स्पष्ट गतिस्थिति काढणे हा स्पष्टाधिकाराचा विषय होय. ( ग्रहाची स्पष्टस्थिति असें ह्मणण्याच्या ऐवजी स्पष्ट ग्रह असेच बहुधा ह्मणण्याचा आमच्या ग्रंथांत प्रचार आहे. म्हणून पुढील विवेचनांत तसेंही कोठे कोठे म्हटले आहे.) कोपर्निकसाने काढिलेले आणि केलर, न्यूटन इत्यादिकांनी दृढ स्थापित केलेले ग्रहगतीचे सांप्रत बहुधा सर्वमान्य असलेले जे वास्तव सिद्धांत त्यांप्रमाणे सूर्यचंद्रांच्या मध्यमगतीहून स्पष्टगति भिन्न असावयाचें मुख्य कारण एक आहे. ते हे की, पृथ्वी सूर्याभोंवतीं व चंद्र पृथ्वीभोंवतीं दर्षि वर्तुलांत फिरतो. आणि इतर ग्रहांच्या मध्यमगतीहून त्यांची स्पष्टगति भिन्न असण्याची मुख्य दोन कारणे आहेत. ती ही की, बुधादि पंचग्रह सूर्याभोंवतीं दीर्घ वर्तुलांत फिरतात. यामुळे त्यांच्या कक्षावृत्तांत मध्यम स्थितीहून त्यांची स्पष्टस्थिति भिन्न होते. आणि दुसरे कारण असे की, मूर्यसंबंधे जी ही भिन्नस्थिति ती, पृथ्वी सूर्याभोवती फिरते यामुळे तिचं स्थान आकाशांत नेहमी बदलून आपणा पृथ्वीवरून पाहणारांस अधिकच भिन्न दिसते. वर लिहिलेली पंचग्रहांसंबंधे दोन कारणे आणि सूर्यचंद्रांसंबंधे एक कारण ही आमच्या प्राचीन ज्योतिष्यांस त्यांच्या वास्तवरूपाने जरी ज्ञात झाली नाहीत तरी ग्रहांची स्पष्टस्थिति काढण्यास तीच कारणे पर्यायाने त्यांनी मूलभूत धरिली आहेत. आणि ती वास्तवस्वरूपान ज्ञात झाल्यावर ग्रहस्पष्टस्थिति काढण्याच्या पाश्चात्यांनी ठरविलेल्या ज्या रीती त्यांवरून जी स्पष्टस्थिति येते, तिच्याशी सर्वांशीं नाहीं तरी बहुतांशी मिळणारी ग्रहस्पष्टस्थिति आमच्या ग्रंथांवरून येते. झणजे ग्रहाची मध्यम स्थिति दोहोंची सारखी असतां पाश्चात्यांच्या रीतीवरून तो आकाशांत अमुक स्थळी दिसेल असें गणिताने निघालें तर आमच्या ग्रंथांवरूनही तो कधी त्याच स्थानी आणि कधी त्याच्या बराच जवळ येतो. फरक पडतो तो गणितांत घेतलेल्या आमच्या उपकरणांतील किंचित् दोष किंवा त्यांची स्थूलता आणि वर सांगितलेल्या दोन मुख्य कारणांखेरीज काही उपकरणांचा सांप्रत शोध लागलेला आहे, ती आमच्या लोकांस माहीत नव्हती, यामुळे पडतो.