पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/354

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

( ३५५) वरन पांचांपैकी चार वेधशाळा इ० स०१७९९ च्या सुमारास पाहन त्यांचे वर सांगितलेल्या एशिआटिक रिसर्चेसमध्ये केले आहे. विस्तरभयास्तव सब देत नाही. शेरिंगचे काशीक्षेत्रवर्णन (इ. स. १८६८) या इंग्रजी पुस्तकाशी येथील वेधशाळेचे वर्णन पंडित बापुदेव यांच्या मानमंदिरस्थयंत्रवर्णन लखावरून केलें आहे तें एथे* देतो. (इतर वेधशालांची रचना याच प्रकारची ही वेधशाला मानमंदिर । घांटावर गंगेच्या कांठी आहे. तिला मानमंमणतात. सांप्रत ही इमारत आणि तो सर्व मोहोला जयपूरच्या राजाच्या मा चा आहे. वेधशाळेची इमारत चांगली मजबूत आहे. बाहेरच्या पायऱ्या चढून पावर एक अंगण लागते. यांतून जाऊन एका जिन्याने चढून गेल्यावर वेधशाकचा मुख्य भाग लागतो. वेधशाळेतील कांही यंत्रे फार मोठालीं आहेत. त्यांचे साधकाम हजारों वर्षे सहज टिकण्यासारखे आहे. असे असून ते इतकें नाजूक आहे का, त्याने ती यंत्रे करणाराच्या मूळ हेतूप्रमाणे सूक्ष्म काम व्हावें. याजवर देखरेखीकारता एक ब्राह्मण आहे; परंतु त्याजकडून नीट दुरुस्ती राहत नाही. ऊनपाऊस याच्या योगाने यंत्रांची खराबी होत आहे. व त्यांचे भाग प्रभाग झिजून दिसतनासे होत चालले आहेत. वेधशाळेत गेल्यावर प्रथम भित्तियंत्र दृष्टीस पडते. ती एक ११ फूट उंच आणि ९ फूट 11 इंच रुंद अशी याम्योत्तर दिशेत बांधलेली भिंत आहे. याच्या योगाने मध्यान्हीं सूर्याचे उन्नतांश आणि नतांश, तसेंच सूर्याची परमकांति, आणि स्थलाचे अक्षांश काढितां येतील. जवळच एक दगडाचें व एक चुन्याचें अशी दोन मोठी वर्तुळे आहेत. व एक दगडाचे चौरस आहे. शंकुछाया व दिगंश काढण्याकडे यांचा उपयोग होत असावा. परंतु हल्ली त्यांवरील सर्व खुणा पुसून गेल्या आहेत. यंत्रसम्राट् ह्मणून मोठे यंत्र आहे. ही याम्योत्तर वृत्तांत बांधलेली ३६ फूट लांब व ४॥ फूट रुंद अशी भिंत आहे. भिंतीचें एक शेवट ६ फूट ४ इंच उंच व दुसरें २२ फूट ३।। इंच उंच आहे. व ही भिंत थोडथोडी उत्तरेस उंच होत गेली आहे; अशी की तीवरून ध्रुव दिसावा. या यंत्राच्या योगानें खस्थाचें याम्योत्तरेपासून अंतर, क्रांति, विषुवांश ही काटितां येतील. एथेच एक दुहेरी भित्तियंत्र आहे. याच्या पूर्वेस दगडाचें नाडीवलय आहे. तसेच दुसरा एक अंमळ लहान यंत्रसम्राट आहे. जवळच दोन भिंतींमध्ये चक्रयंत्र आहे. तारांची कांति पाहण्याकडे त्याचा उपयोग करीत असत; परंतु तें हल्ली दुरुस्त नाही. त्याजवळ एक भव्य दिगंशयंत्र आहे. तारांचे दिगंश काढण्याकडे त्याचा उपयोग करीत असत. तो एक ४ फूट २ इंच उंच आणि ३ फूट ७॥ इंच जाड असा खांब आहे. त्याच्याभोंवतीं ७ फूट ३। इंच अंतरावर दुप्पट उंचीची दुसरी भिंत आहे. दोन्ही भिंतींच्या शिखरपृष्टांचे ३६० अंश पाडलेले आहेत; व त्यांवर दिशा लिहिल्या आहेत. ह्याच्या दक्षिणेस दुसरें एक नाडीवलय आहे; परंतु त्यावरील खुणा पुसल्या आहेत.

  • बापुदेव यांचे मूळपुस्तक मोठ्या प्रयत्नानेही मला मिळाले नाही.

अहगत्यादिकांची माने काढण्याचे मंदिर ह्मणून मानमंदिर असें नांव पडले असावे असे मला बाटते.