पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/352

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(३५३) वर सिद्धांतशिरोमणींतली यंत्रे आणि दुसरी स्वतंत्र यंत्रे सांगितली ती हल्ली प्रत्यक्ष केलेली फार क्वचित् आढळतात. शंकयंत्र आणि तुरीय यंत्र ही काही ठिकाणी आढळतात. दिवस किती घटिका आला हे पाहण्याचे एकादें यंत्र बरेच ठिकाणी आढळते.* वेधशाला-आवां वेधशालांविषयी विचार करू. ज्योतिषसंबंधे वेध घेण्याची यंत्रे कायमची बसविलेली असतील तर त्यांपासून वेधास जास्त उपयोग होईल, हें उघड आहे. मुद्दाम एक घर या कामाकरितां करून त्यांत यंत्रे कायम केलेली असतात; आणि वेध घेण्याचे काम चालते. अशा स्थानास वेधशाला ह्मणतात. राजाश्रयाने तयार केलेली वेध घेण्याची अशी स्थाने आपल्या देशांत प्राचीनकालीं असतील असा संभव दिसतो. परंतु त्यांचे कोठे वर्णन आढळत नाही. ज्यांवर दिशासाधन केलेले आहे असे पाषाण केलेले कोठे कोठे आढळतात. सातारा एथे चितामणि दीक्षित यांच्या घरी असें दिशासाधन केलेले आहे असें पूर्वी सांगितले आहे. (पृ. २९७). इ. स. १८८४ मध्ये सायनपंचांगाच्या वादाकरितां मी इंदूर एथे गेलो होतो, तेव्हां, तेथे सरकारवाड्यांत मुद्दाम वेधाकरितां दिशासाधन वगैरे सोय करून एक जागा केलेली आहे, आणि तुकोजीमहाराजांच्या पदरचे ज्योतिषी तेथे कधी कधी वेध घेत असत असे समजले. बीड येथील एक ज्योतिषी मला भेटले होते. (पृ. २३७ पहा ). त्यांनी सांगितले की, थोड्या वर्षांपूर्वी हैदराबाद एथील मोगल सरकाराकडून कांहीं ज्योतिष्यांकडून सतत वेध घेण्याचे काम चालविण्याचा विचार होऊन काही यंत्रे वगैरे तयार झाली होती; परंतु ते काम पुढे बंद पडले. कधी कधी नलिकाबंध करून वेध घेणारे कांहीं ज्योतिषी मी पाहिले आहेत. अशा प्रकारचे लहान लहान प्रयत्न सर्वकाल होत आले असले पाहिजेत. परंतु अशा एखाद्या मोठ्या प्रयत्नाची माहिती सांप्रत एकाची मात्र उपलब्ध आहे. ती अशीः जयसिंह (पृ. २९२) याने पांच वेधशाळा बांधल्या आहेत. त्याने केलेल्या झीजमहमद

  • हे प्रकरण छापत असतां (शक १८१८ वैशाख ज्येष्ठ मासी) रा रा नरसो गणेश भान रहाणार मिरज यांणीं कांहीं यंत्रांच्या प्रती कागदावर करून घेतलेल्या मजकडे पाठविल्या होत्या. भान हे जोशी नाहीत, हल्ली मिरज संस्थानांतले पेनशनर गृहस्थ आहेत, तरी त्यांस ह्या विषयाचा पुष्कळ नाद आहे. त्यांणी काढिलेल्या नकलांची मूळ यंत्र कोल्हापुराजवळ कोडोली एथे राहणारे सखाराम जोशी यांणी शक १७१२ पासून १७१८ या काली केलेली आहेत. त्यांतली कांहीं पितळेच्या ओतीव पत्र्याची असावी असें भान यांच्या लिहिण्यावरून दिसते. त्यांत यंत्रराज यंत्राच्या कांहीं प्रती आहेत व तुर्य यंत्र, फलकयंत्र, ध्रुवभ्रमणयंत्र इत्यादि यंत्रे आहेत. एक यंत्रराज शक २७१२ मध्ये सप्तर्षि ( सातारा) एथे केलेला आहे. त्यांत साताऱ्याचे अक्षांश २७१४२ लिहिले आहेत आणि २७ नक्षत्रांच्या योगतारांचे व काही इतर तारांचे सातारा एथले मध्यान्हींचे उन्नतांश दिशांसह लिहिले आहेत. उदाहरणार्थ मघातारचे अंश दक्षिण ८३।५७ आहेत. दुसरा एक यंत्रराज करवीर (अथवा कोडोली) करितां शक १७१८ मध्ये केलेला आहे. त्यावर करवीरचे ( अथवा कोडोलीचे ) अक्षांश १७२१ आणि मघातारेचे उन्नतांश द. ८४।१५ आहेत. हल्लीच्या शोधाअन्वये साताऱ्याचे अक्षांश १७१४१ व कोल्हापुरचे १६४१ आहेत. आणि शक १७१८ मध्ये मघायोगतारेची उत्तर क्रांति सुमारे १२ अंश होती. तेव्हा तिचे मध्यान्होन्नतांश सातारा एथे ८४।१९ आणि कोल्हापुर एथे ८५/१९ होते. असो. सखाराम जोशी हे फार उद्योगी होते असे दिसते. हली वरील यत्रे त्यांचे पणतु सखारामशास्त्री यांजकडे बेळगांवानजीक कडेगुदी तालुके शहापुर एथे आहेत. त्यांचे दुसरे पणतु मोरशास्त्री मिरज एथे असतात त्यांजकडे काही यंत्रे आहेत.