पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/351

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(३५९) तारा आहेत. त्यांत पहिली ध्रुवाच्या एका बाजूस तीन अंशांवर आणि दुसरी दु. सऱ्या बाजूस १३ अंशांवर आहे. 7 असें ग्रंथकारानें ध्रुवमत्स्याचे वर्णन केले आहे.* आणि मुखपुच्छस्थ तारांच्या वेधाने रात्रीस कालज्ञान होईल अशी यंत्ररचना सांगितली आहे. इतर नक्षत्रांच्या आणि दिवसास सूर्याच्या वेधावरूनही कालमाधन करण्याची रीति सांगितली आहे. तसेच या यंत्राने इटकाल चे लग्नही निचते. ते अर्थातच सायन येते. नक्षत्रांचा वेध घेण्याकरितां २८ नक्षत्र योगतारचि २४ अक्षांशांवरील मध्योन्नतांश सांगितले आहेत. यावरून हा ग्रंथकार २४ अक्षांशांच्या स्थळी राहणारा असावा. यंत्रचितामाणि-वामनात्मज चक्रधर नामक गणकाने हा यंत्रग्रंथ केला आहे. याजवर त्याची स्वतःचीच टीका आहे. शिवाय गोदावरीतीर, पार्थपुर येथील राहणारा मधुसूदनात्मज राम याची याजवर टीका आहे. ग्रंथकाराने आपला काल दिला नाही. तरी त्याने आपल्या टीकेत भास्कराचार्याच्या सिद्धांतशिरोमणीतील वाक्ये घेतली आहेत. आणि टीकाकार राम याने टीकाकाल शके १५४७ दिला आहे. यावरून शके ११०० पासून १५०० पर्यंत केव्हां तरी हा ग्रंथ झाला. 'क्षितिपालमौलिविलसद्रत्न ग्रहज्ञाग्रणीश्चक्रधरः' असें याने मटले आहे. यावरून तो कोणा राजाच्या पदरी होता असे दिसते. ग्रंथांत ४ प्रकरणे आहेत. सर्व मिळून २६ श्लोक आहेत. या ग्रंथावर शांडिल्यगोत्रोत्पन्न अनंतात्मज दिनकर याने शक १७६७ मध्ये उदाहरणरूप टीका केली आहे. यंत्रचितामणि हे एक प्रकारचे तुरीययंत्र आहे. यावरून वेधानें रविचंद्रांचे भोग, तसेच पंचग्रहांचे भोगशर, इष्टकाल, त्या कालचे लग्न, इत्यादि समजतात. ग्रह आणि लग्न ही सायन येतात. प्रतोदयंत्र-हा यंत्रग्रंथ ग्रहलाघवकार गणेश दैवज्ञ याने केला आहे. याचे १३ श्लोक आहेत. घोड्यावरून जातां जातां देखील या प्रतोदयंत्राच्या योगाने वेधानें कालज्ञान, तसेंच तत्कालीन शंकुछायादिज्ञान होते असें ग्रंथकाराने म्हटले आहे. विस्तरभयास्तव त्याची रचना एथे सांगत नाही. या ग्रंथावर सखाराम आणि गोपिनाथ यांच्या टीका आहेत. गोलानंद-हे यंत्र चिंतामाणि दीक्षित (पृ. २९७) याण कल्पिलें.त्यासंबंधी गोलानंद नांवाचा त्याचा ग्रंथ आहे. त्याची १२४ पये आहेत. त्यांत यंत्ररचना, मध्यमाधिकार, स्पष्टाधिकार, त्रिप्रश्न, ग्रहण, छायोदयास्त, वेध, युति, असे अधिकार आहेत. गोलानंद यंत्राने वेध घेऊन ग्रहांचे फलसंस्कार, शीघ्रकर्ण, स्पष्टगति, क्रांति, चर, लग्न, दिशा, अग्रा, नतांश, वलने, लंबन, नति, शर, दृकर्मसंस्कार, इष्टकाल ह्या गोष्टी समजतात. या ग्रंथावर यज्ञेश्वरकत गोलानंदानुभाविका नांवाची टीका आहे. याप्रमाणेच आणखी कितीक ग्रंथ यंत्रांवर असतील. यंत्रचिंतामणिटीकाकार राम हा म्हणतो: विलोकितानि यंत्राणि कृतानि बहुधा बुधैः । मतः शिरोमणिस्तेषां यंत्रचितामाणिर्मम || यावरून अनेक यंत्र प्रचारांत असतील असे दिसते. * श्लोक ११ टीका.