पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/350

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(३५) त्यापूर्वी ज्योतिषगणितग्रंथ आमच्यात होते, असे प्राचीनसिद्धांतपंचकविचारांत सिद्ध केलेच आहे. (पृ. १५० इ.) आतां आमचे यंत्रविषयक स्वतंत्र ग्रंथ आणि वेधशाला यांचे वर्णन करूं. सर्वतोभद्रयंत्र--या नांवाचा एक यंत्रग्रंथ भास्कराचार्याने केला होता, असे त्यांतले दोन श्लोक त्याने सिद्धांतशिरोमणीत यंत्राध्यायांत दिले आहेत त्यांवरून समजते. परंतु तो ग्रंथ उपलब्ध नाही यावरून सर्वतोभद्र यंत्र कसे होते हे सांगतां येत नाही. यंत्रराज-भृगुपुरामध्ये मदनमरिनामक ज्योतिषी होता. त्याचा शिष्य महेंद्रसूरियाने शके १२९२ मध्ये हा ग्रंथ केला आहे. ग्रंथारंभी सर्वज्ञाचें वंदन आहे. यावरून हा ग्रंथकार जैन असावा. गणित, यंत्रघटन, यंत्ररचना, यंत्रसाधन, यंत्रविचारणा असे ५ अध्याय ग्रंथाचे आहेत. त्यांत १८२ पये आहेत. त्यावर मलयेदुसूरि याची टीका आहे. तींत तो ह्मणतो की महेंद्रमूरि हा फेरोजशाह बादशाहाच्या पदरीं मुख्य ज्योतिषी होता. टीकेंत उदाहरणांत संवत् १४३५ (शके १३००) पुष्कळदा घेतला आहे. एकदां १४२७ व एकदां १४४७ घेतला आहे. व टीकाकार महेंद्रास गुरु ह्मणतो. यावरून तो त्याचा प्रत्यक्ष शिष्य होता. आणि टीकाकालही सुमारे शके १३०० हा होय. काशी एथे सुधाकर द्विवेदी यांनी हा ग्रंथ छापविला आहे. ग्रंथकार पहिल्याच अध्यायांत ह्मणतो: क्लप्तास्तथा बहुविधा यवनैः स्ववाण्यां यंत्रागमा निजनिजप्रतिभाविशेषात् ।। तान् वारिधीनिव विलोक्य मया सुधावत् तत्सारभूतमखिलं प्रणिगद्यते ऽत्र ।। अध्याय याने त्रिज्या ३६०० आणि परमंक्रांति २३।३५ मानली आहे; प्रत्यंशाची भुजज्या, कांति, आणि युज्या यांच्या सारण्या दिल्या आहेत. आणि सप्तांगुल शंकूची छाया १ पासून ९० पर्यंत प्रत्येक उन्नतांशाची दिली आहे. टीकाकाराने सुमारे ७५ नगरांचे अक्षांश दिले आहेत. ग्रंथकाराने वेधोपयोगी ३२ तारांचे सायन भोगशर दिले आहेत. अयनवर्षगति ५४ विकला सांगितली आहे. या यंत्रराज यंत्राची रचना थोडक्यांत सांगतां यावयाची नाही म्हणून एथे सांगत नाही. याच्या साह्याने सूर्यग्रहतारांचे उन्नतांश, नतांश, भोगशर, दोन खस्थांमधील अंशात्मक अतर, स्थळाचे अक्षांश, तसेंच लग्न, काल, दिनमान, इत्यादिक गोष्टी केवळ वेधाने काढतां येतात. या ग्रंथावर यज्ञेश्वरकत टीका शके १७६४ ची आहे. ध्रवभ्रमयंत्र-नार्मदात्मज पद्मनाभ याने हा ग्रंथ केला आहे. या पद्मनाभाचा काल सुमारे शके १३२० आहे असे मागें (पृ. २५६ ) सांगितलेच आहे. ग्रंथाची ३१ पर्ये आहेत. त्यावर टीका स्वतः ग्रंथकाराचीच आहे. रुंदीच्या दुप्पट लांबी जिची अशी एक फळी घेऊन तींत आडवें एक छिद्र पाडून त्यांतून ध्रुवमत्स्याचा वेध घ्यावयाचा, अशा प्रकारचे हे ध्रुवभ्रम यंत्र कालज्ञानार्थ केलेले आहे. कालज्ञानार्थ यंत्राची जी रचना सांगितली आहे ती सर्व ऐथे सांगत नाही. "उत्तरध्रुवाभोंवतीं एक १२ तारांचा नक्षत्रपुंज आहे. त्यास ध्रुवमत्स्य ह्मणतात. त्यांत मुखस्थानी एक आणि पुच्छस्थानीं एक अशा दोन ठळक