पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/349

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(३५०) अलेक्झाडिया एथे एक भव्य वेधशाळा बांधण्यात आली. तीत वर्तुळाकार यंत्रांचा उपयोग करू लागले; आणि सतत वेधाचे काम चालण्यास पुष्कळ साह्य देण्यांत आले. एथील वेध घेणान्यांत अति प्राचीन मटले झणजे टायमोकेरीस आणि आरिस्टिलस हे होत. यांचा काल इ. स. पूर्वी ३०० हा आहे. दालमीनें (इ० स० १५० ) त्यांचे वेध आपल्या ग्रंथांत घेतले आहेत, त्यांवरून दिसते की, त्यांनी कांहीं तारांची क्रांति मात्र काढिली, आणि ग्रहणांचे वेध केले. तारांचे विषुवांश काढण्याची रीति त्यांस माहीत नव्हती असे दिसते. अलेक्झाडियाच्या ज्योतिषांत इराटोस्थेनीस (इ. स. पूर्वी. सुमारे २७५) याने कांतिवृत्ताच्या तिर्यक् - त्वाचा वध केला. ते त्यास २३१५७।१९ दिसून आले. हे वेध यंत्रांशिवाय झाले नसतील हे उघड आहे. टालमीनें मूर्याचे मध्योन्नतांश काढण्याचे एक यंत्र लिहिले आहे. एकांत एक फिरणारी दोन समकेंद्र चक्रे याम्योत्तर वृत्तांत उभी करावयाची, असे ते यंत्र आहे. त्यांत व्यासावर समोरासमोर लावलेल्या दोन खिळ्यांपैकी एकाची छाया दुसन्यावर पडे. त्यावरून उन्नतांश समजत. अशाच काही यंत्राने सूर्योन्नतांश दोन्ही अयनकालीं मोजून त्यावरून इराटोस्थेनीस यानें क्रांतिवृताचे तिर्यकत्व काढले असावें. टालमीनें हिपाकसचें एक वाक्य घेतले आहे, त्यांत विषुववृत्तपातळीत धरलेल्या एका वलयाच्या वरल्या भागाची छाया खालच्या अर्धावर पडे त्यावरून सूर्याचा विषुवागमनकाल काढीत, असें एक यंत्र अलेक्झांड्रिया एथे वापरीत, असे लिहिले आहे. तेथील ज्योतिष्यांनी तारांची क्रांति कशी काढिली तें समजत नाही. असो. अलेक्झांड्रियाच्या ज्योतिष्यांस त्यांच्या बेधपद्धतीबद्दल मान दिला पाहिजे. तथापि वेधावरून काढलेल्या ग्रहस्थितीवरून ज्योतिःशास्त्राच्या गणितस्कंधाची स्थापना करण्याचा मान हिपार्कस यास दिला पाहिजे. त्याने वर्षाचें मान ३६५ दि. १४ घ. ४८ प. ठरविले. त्याच्यापूर्वी ते ३६५ दि. १५ घटि होते. त्यानें आस्ट्रोलेव यंत्र प्रथम काढले. त्याने तो खस्थांचे भोगशर काढीत असे. सूर्याच्या स्पष्टगतीचें ज्ञान याच्यापूर्वी कोणास नव्हते. आणि सूर्याच्या स्पष्ट स्थितीचे गणित करण्याची कोष्ट के प्रथम याने रचली; याच्यापूर्वी कोणास माहीत नव्हती. चंद्राचे वेध त्याने केले. आणि चंद्रपष्टस्थितिसाधनार्थ कोष्टके याने रचिलों असे दिसते. त्याने ग्रहांचेही वेष केले. चंद्राचा इहेकशन संस्कार काढण्यास आणि ग्रहगतिनियम काढण्यास टालमीला हिपार्कसच्या वेधांचा उपयोग झाला. हिपाकसने तारांचे शरभोग काढले हे मागें सांगितलेच आहे. टाल मी हा वेधाच्या कामांत कुशल नव्हता. त्याने तुर्ययंत्र काढले. हे सर्व ज्योतिषी कालसाधन कसे करीत हे स्पष्ट कोठे सांगितलेले नाही. छायायंत्र, घटीयंत्र, यांच्या योगानें काल मोजीत असे दिसते. कधी कधी वेधकाली याम्योचरीं कांतिवृत्ताचा भाग कोणता आहे हे लिहीत. आरबलोकांनी वेधयंत्रांत विशेष सुधारणा केली नाही; तरी त्यांची यंत्रे ग्रीकांहून मोठी आणि चांगली असत. त्यांचा आस्ट्रोलेव जास्त भानगडीचा होता. वरील इतिहासावरून दिसून येते की, यांतील कोणतेही वर्षमान आमच्या सिद्धांतांतील मानांशी जुळत नाही. मूलरोमकसिद्धांत हिपार्कसच्या ग्रंथाच्या आधाराने रचला असावा, आणि रोमकसिद्धांत हा आमचा ज्योतिषाचा आद्यग्रंथ नव्हे,