पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/348

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३४९) एक महत्वाची गोष्ट अशी दिघुन येते की आमची सर्व यंत्रे स्वतंत्रपणे आमच्या ज्योतिष्यांनी काढली आहेत; आणि तुरीययंत्र में पुढें प्रचारांत आले तेही स्वतंत्रपणेच आले. चक्र आणि चाप यांवरून ते सहज सुचणारे आहे. आणि त्याप्रमाणे बमगुप्ताच्या ग्रंथांत में प्रथम आढळते, यावरून त्यानेच तें कल्पिलें.* द्वितीयायसिद्धांत आणि सांप्रतचे रोमश, शाकल्य, ब्रह्म, सोम, यांचे सिद्धांत यांत यंत्राध्याय मुळीच नाही. पाश्चात्यांच्या प्राचीन वेधांविषयी थोडेसें ऐथे सांगणे अप्रासंगिक होणार ना ही. खाल्डिअन लोकांत ज्योति शास्त्र मूळ उत्पन्न झाले अस पाश्चात्यांचे प्राचीन वेध. युरोपिअन विद्वान समजतात. ते लोक वेधांत प्रवीण होते असें दिसत नाही. त्यांचे ग्रहणांचे वेध टालमीने लिहिले आहेत, ते फारच स्थूल आहेत. त्यांनी ग्रहणकाल नुस्त्या तासांनी सांगितला आहे, आणि ग्रास हा बिंबाच्या अर्धा, चतुर्थांश, असा सांगितले आहे. हिराडोटस लिहितो की, ग्रीक लोकांस पोल आणि शंकु ही यंत्रे आणि दिवसाचे १२ तास ही पद्धति बाबिलोनच्या लोकांपासून मिळाली. पोल हे एक छायायंत्र होते. ते अंतर्गोल अर्धवर्तुल असून त्याच्या मध्यभागी एक काठी असे. याच्या योगाने दिवसाचे १२ विभाग समजत असे दिसते. शंकूच्या योगानें खाल्डिअन लोकांनी वर्षाचें मान मात्र बरेच जवळ जवळ काढले; परंतु त्याहून त्याचा जास्त उपयोग त्यांनी केला, किंवा जीवरून ग्रहगतीचे नियम बसवितां येतील अशी सामुग्री वेधांनी तयार करून ठेविली, असें दिसत नाही. त्यांनी ग्रहणे इत्यादि चमत्कार मात्र लिहून ठेविले; आणि त्यांवरून अगदी थोडे स्थूल सामान्य नियम त्यांनी काढिले. त्यांच्या ग्रहणांवरून कांहीं ग्रीक गणितज्ञांनी चंद्राच्या मध्यमगतीचें मापन बरेंच सूक्ष्म केलें. अलेक्झांडिया येथील ज्योतिषिवर्ग उत्पन्न होण्याच्या पूर्वीचा ग्रीकांचा प्राचीन वेध झटला ह्मणजे इ. स. पूर्वी ४३० या वर्षी मेटन याने उदगयन कधी झाले ते पाहिले, हा होय. ते त्याने हेलिओमिटर नांवाच्या यंत्राने पाहिले. हे यंत्र शंकूचाच एक प्रकार असावा. हा उदगयनदिवस मेटनच्या १९ वर्षांच्या चकाचा आरंभदिवस ठरविला. अलेक्झांड्रिया एथील टालमी राजांच्या उत्तेजनापासून ज्योतिःशास्त्राच्या इतिहासांत नवीन काल सुरू झाला.

  • सांप्रतच्या सूर्य सिद्धांतांत तुरीययंत्र नाही, हे, तो ब्रह्मगुप्ताच्या पूर्वीचा असें ह्मणण्यास एक प्रमाण आहे.

+ तथापि यावरून ते सूर्यसिद्धांतादिकांडून प्राचीन ठरत नाहीत. ह्या कलमांतील मजकूर Grant's History of Ph. Astronomy, Ch. XVIII याच्या आधाराने लिहिला आहे. ६ यांतील अति प्राचीन वेध म्हटले झणजे इ० स० पू० ७१९ व ७२० ह्या वर्षीची तीन ग्रहणे होत, असें रेहटसेक ह्मणतो. ( Jour B. B. R. A. S. Vol XI.) मेटनने १९ सौर वर्षांचे ६९४ ० दिवस ठरविले ( कनिंघमकृत Indian Eras पृ. ४३). झणजे वर्षाचं मान ३६५ दि. १५ घ. ४७ ३६८ पं. होते. कालिपस याने इ. स. पूर्वी ३३० या वर्षी मेटनच्या चक्रांत सुधारणा करून ७६ वर्षांचं चक्र ठरविले. त्यांत वर्षांचे मान बरोबर ३६५ दि. २५ घ. ठरविलें. ( Indian Eras पृ. १३) आमच्या कोणत्याच ज्योतिषग्रंथांत ही चक्रे किंवा वर्षमाने नाहीत, हे लक्षात ठेवण्यासारखे आहे.