पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/347

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

माहीत आहे असे सिद्ध होते. पंचसिद्धांतिकेंत यंत्राध्याय आहे. तो चांगला समजत नाही, तरी ब्रह्मगुप्तादिकांनी सांगितल्यापैकी बरीच यंत्रे त्या वेळी प्रचारांत होती असें दिसते. प्रथमार्यभटाने यंत्रे मुळीच सांगितली नाहीत, तरी वरील प्रकारचा गोल सांगितला आहे. शिवाय काल साधनार्थ एक गोल करून पारा, तेल, किंवा जल, यांच्या योगानें तो फिरेल असें करावे असे सांगितले आहे. एक चक्र करावे. त्यास किंचित् तिरप्या अशा पोकळ अरा लावून त्या अर्ध्या पायाने भरून त्यांची तोंडे बंद करावी. ह्मणजे ते चक्र आपोआप फिरते. असें एक स्वयंवह यंत्र ब्रह्मगुप्त, भास्कराचार्य, यांनी सांगितले आहे. अशा प्रकारची व दुसऱ्या प्रकारची स्वयंवह चमत्कारिक यंत्रे वराहमिहिराच्या वेळी होती असे पंचसिद्धांतिकेंत यंत्रानें आपोआप होणारे कांहीं चमत्कार सांगितले आहेत त्यांवरून आणि आर्यभटाच्या वरील गोलयंत्रावरून दिसते. वराहमिहिर आणि आर्यभट यांनी त्यांची कति सांगितली नाही. ब्रह्मगुप्तानेही वरील यंत्राखेरीज आपोआप घडणारे दुसरे चमत्कार सांगितले आहेत; परंतु त्यांची कति सांगितली नाही.भास्कराचायाने सांगितलेली सर्व यंत्रे त्यांच्याच किंवा कांहीं कमजास्त प्रकाराने ब्रह्मगुप्त आणि लल्ल यांच्या ग्रंथांत आली आहेत. शिवाय कर्तरी, कपाल, पीठ, ही जास्त कालसाधनयंत्रे त्या दोघांनी सांगितली आहेत. सांप्रतच्या सूर्यसिद्धांतांत यंत्रांचे सविस्तर वर्णन नाही. तरी स्वयंवह, गोल, शंकु, यष्टि, धनु, चक्र, कपाल, यांची नांवें त्यांत आली आहेत. यांत एक चमत्कार आढळला की पंचसिद्धांतिका, आर्यभटीय, सांप्रतचा मूर्यसिद्धांत, लल्लतंत्र यांत तुरीययंत्र कोठे आले नाही. पाश्चात्य ज्योतिष्यांत तुरीययंत्र प्रथम टालमीनें शोधून काढले. त्याच्यापूर्वी वेधाकडे संपूर्ण चक्राचा उपयोग करीत असत. परंतु पुढे पाश्चात्य ज्योतिष्यांत सर्वत्र तुरीययंत्राचा प्रचार झाला. सांप्रत मात्र युरोपांत तुरीययंत्र अगदीं जाऊन संपूर्ण चक्र प्रचारांत आली आहेत. टालमीने तुरीययंत्र प्रचारांत आणले हा सुधारणाक्रमाचा व्यत्यास केला असा हल्लीचे विद्वान त्यास दोष देतात.॥ एथे हे सांगण्याचे कारण इतकेच की टालमीच्या सिद्धांतांत तुरीययंत्र आहे, आणि तुरीययंत्र सुमारे शक ५०० पर्यंत आम्हांस माहीत नव्हेत, यावरून रोमक सिद्धांत हा टालमीच्या ग्रंथाचे भाषांतर नव्हे किंवा तो त्याच्या आधारें रचिलेला नव्हे; आणि निदान शक ५०० पर्यंत टालमीचा ग्रंथ आम्हांस माहीत नव्हता असें सिद्ध होते. पूर्वी रोमकसिद्धाताचा विचार केला आहे त्यावरूनही असेंच दिसते. (पृ. १५८ पहा ). आणखी * अथर्वज्योतिष विचार पहा. (पृ० ९८.) आर्यभटीय, गोलपाद आर्या २२. फलकयंत्र भास्कराचार्याने नवीन कल्पिलें आहे; परंतु त्याचें बीज चक्रायंत्रांत आहेच, बाकी आठांपैकी गोल आणि नाडीवलय ही ब्रह्मगुप्ताने निराळी सांगितली नाहीत, तरी गोलबंध सांगितला आहे, त्यांत ती येतात. लल्लाने आठांपैकी नाडीवलय सांगितले नाही तरी गोलांत ते यतेच. लल्लानें तुर्य यंत्र मात्र सांगितले नाही, हे मात्र आश्चर्य आहे. ही गोष्ट लक्षात आल्यावर तुरीय शब्दाकरितांच या ग्रंथांतील प्रत्येक शब्दाकडे लक्ष देउन हे सर्व ग्रंथ वाचण्यास अवकाश झाला नाही. तथापि जेथे तरीय यंत्र येण्याचा संभव आहे ती सर्व स्थाने पाहिली त्यांत ते नाही. | Grant's History of the Ph. Astronomy p. 440