पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/346

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

छाया पृथ्वीगोलावर पडेल. तशी पडली असतां विषुववृत्तावरील खूण आणि नाडीवलय यांच्यामध्ये जितक्या घटिका असतील तितक्या घटिका सूर्योदयापासून गेल्या अस समजावें. त्या वेळी क्षितिजांत क्रांतिवृत्ताचा जो बिंदु असेल त्यावरून लग्न समजेल. ५. नाडीवलय-एक चक्र करून त्याच्या नेमीवर ६० घटकांच्या खुणा कराव्या. त्याच्या मध्यबिंदूंतून त्यावर लंब अशी एक शलाका घालावी. ती ध्रुवाभिमुख धरिली असतां तिची छाया परिधीवर पडेल. तीवरून नतोन्नतकाल समजतील. हेच चक गोलांत ध्रुवयष्टींत, पृथ्वी याच्या मध्ये येईल असें, ओंविलें असतां, आणि त्यावर घटिका, स्वदेशीय उदय आणि षड्वर्ग (लम, होरा, द्रेष्काण, नवांश, द्वादशांश, त्रिंशांश ) आंखिले असतां यष्टिछायेवरून दिन गतकाल आणि पइवर्ग समजतील. ६. घटिका-ही प्रसिद्धच आहे. ७.शंकु-हस्तिदंताचा किंवा तशा घन पदार्थाचा १२ अंगुळे लांब, वाटोळा, आणि ज्याचें तल आणि मस्तक सपाट आणि सारखे आहे, असा तुकडा, यास शंकु ह्मणतात. याच्या छायेवरून कालादि काढण्याच्या रीति त्रिप्रश्नाधिकारांत असतात. ८. फलकयंत्र-चक्राच्याच तत्त्वावर रचलेलें असें हें एक कालसाधनयंत्र भास्कराचार्याने कल्पिलें आहे. याची रचना यंत्राध्यायांत पहावी. विस्तरभयास्तव एथे देत नाही. ९. यष्टियंत्र-समभूमीवर त्रिज्यामित कर्कटकानें (कंपासाने ) एक वर्तुळ काढून त्यावर दिशांच्या खुणा कराव्या. आणि पूर्वपश्चिमभागीं ज्यार्धाप्रमाणे अग्रा काढावी. त्याच वर्तुलाच्या मध्यापासून युज्यामित कर्कटकाने दुसरें लहान वर्तुळ काढावें. त्यावर ६० घटकांच्या खुणा कराव्या. मोठ्या वर्तुलाच्या विज्येइतकी एक यष्टि (काडी) घेऊन तिचें एक टोंक वर्तुळमध्यावर धरून तिची छाया मुळींच पडणार नाही अशी ती मूर्याभिमुख धरावी. तिचे दुसरे टोक आणि पूर्वायेचें अग्र यांत जें अंतर तितकी एक शलाका युज्यावृत्तांत ज्येप्रमाणे ठेवावी. झणजे तिच्या दोन टोकांमध्ये जितक्या घटिका सांपडतील तितक्या दिनगत समजाव्या. सूर्य पश्चिमेकडे असल्यास पश्चिमाग्रेच्या टोकापर्यंत जें अंतर त्यावरून दिनशेष घटिका समजतील. या यष्टियंत्रावरून पलभा इत्यादि दुसन्या पुष्कळ गोष्टी काढण्याच्या रीति दिल्या आहेत. अशाच प्रकारच्या परंतु किंचित् भिन्न अशा यष्टियंत्राने रविचंद्रांचे अंतर आणि त्यावरून तिथि आणण्याची रीति ब्रह्मगुप्त आणि लल्ल यांनी सांगितली आहे. या यंत्रांखेरीज कालसाधनार्थ दोन स्वयंवह यंत्रे भास्कराचार्याने सांगितली आहेत. अथर्वज्योतिषांत द्वादशांगुलशंकुछायाविचार आला आहे. आणि यावरून पाश्चात्यांच्या व आमच्या ज्योतिषज्ञानाचा संबंध होण्यापूर्वीच शंकुयंत्र आह्मांस