पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/345

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

इत्यादि द्विगोलजातं क्षेत्रांची समजूत पडण्याकरिता हा गोल करावा, या एकंदर रचनेस गोल ह्मणतात. ( कोठे कोठे आमचे ज्योतिषी रेषांसही क्षेत्रे ह्मणतात ). ह्या गोलांत पाहिजे तर ग्रहांच्या कक्षा त्यांच्या नीचोच्च वृत्तांसह सर्व निरनिराळ्या करण्यास सांगितल्या आहेत. ब्रह्मांडगोलाची रचना दाखविण्याकरितांच ह्या गोलाचे हे वर्णन केले आहे. वस्तुतः इतकी सर्व वृत्ते एकत्र बांधणे कठिण, आणि त्यांच्या साह्याने वेध घेणे त्याहून कठिण. उदाहरणार्थ, खगोलाच्या आंत भगोल बसविणे तर वेधवलय बसवितां यावयाचे नाही. अशा अडचणी भास्कराचार्यादिकांस समजल्या नसतील असें नाहीं. वेध घेणे तर कामापुरती वृत्ते ठेवून घेतला पाहिजे हे उघड आहे व तसा तो घेता येईल. हिपार्कसने आस्ट्रोलेव ह्मणून यंत्र कल्पिलें तसे आमच्यांत एखादें यंत्र नाही. परंतु यावरून आमच्या ग्रंथांची स्वतंत्रताच दिसून येते. आस्ट्रोलेबचें काम वरील गोलानें करितां येईल. ब्रह्मगुप्त, लल्ल, दोन्ही आर्यभट यांणी साधारणतः अशाच प्रकारचा गोलबंध सांगितला आहे. प्रथमार्यभटाचा गोल यापेक्षा कमी भानगडीचा आहे. भास्कराचार्याने यंत्राध्यायांत मुख्यतः नऊ यंत्रं सांगितली आहेत. त्यांचा मुख्य उदेश कालसाधन हाच सांगितला आहे. परंतु त्यांत तीन यंत्रांचा उपयोग मुख्यतः खस्थांच्या वेधाकडेच आहे. त्या सर्वांचे थोडक्यांत वर्णन करितों. १. चक्रयंत्र-धातुमय अथवा काष्ठमय चक्र* करावे. त्याच्या मध्यबिंदूत बारीक छिद्र करावें. चक्राच्या नेमीवर शंखलादिक आधार यंत्र धरण्यास करावा. आधारापासून मध्य बिंदूंतून जाणारी एक रेषा लंबरूप काढावी आणि तिजवर लब अशी मधोमध आडवी एक रेषा काढावी. चक्रपरिधीवर अंशांच्या खुणा कराव्या. मध्यबिंदुस्थ छिद्रांतून चकावर लंब अशी एक शलाका घालावी. ती अक्ष होय. आधाराने चक्र अगदी सूर्याभिमुखनोमिक असें (लोंबतें ) धरावें. मणजे अक्षाचा छाया परिधींतील ज्या बिंदूवर पडेल तेथपासून त्या बाजूच्या तिर्यकरेखाग्रापयत जे अंश ते रवीचे उन्नतांश, आणि छायेपासून चक्राधोबिंदूपर्यंत जे अंश ते नतार होत. (यांवरून काल काढितां येईल.) हेच चकयंत्र असें धरावें की त्याच्या नेमीवर पुष्य, मघा, शतभिषक, रेवती या शुन्यशरतारांपैकी दोन येतील. (तण करून तें कांतिवृत्ताच्या पातळीत येईल.) मग दृष्टि मागेपुढे नेऊन ग्रह पहावा, तो प्रायः अक्षगत दिसतो. या रीतीने ग्रहांचे भोगशर समजतील. हे यंत्र गोला' तील दृमंडलासारखेच होय. २. चाप-चक्राचे अर्ध केलें ह्मणजे चाप होते. ३. तुर्यगोल (तुरीययंत्र)-चापाचे अर्ध तें तुर्य होय. ह्या तीन यंत्रांचा उपयोग मुख्यतः वेधाकडे आहे. ४. गोलयंत्र-पूर्वी सांगितल्याप्रमाणे खगोलांत भगोल करून त्यांत क्रांतिवृत्तावर इष्ट दिवशींच्या रविस्थानाची खूण करावी. नंतर भगोल फिरवून ती खूण क्षितिजा आणावी. भगोलांतील विषुववृत्त क्षितिजाच्या ज्या बिंदूच्या संनिध समोर आले सेल, त्या बिंदूवर खूण करावी. नंतर भगोल पुनः असा फिरवावा की रविचिन्हाचा * याच्या वर्णनावरून हे गोलांतील वलयासारखे नव्हे, तर पत्ररूप होय हे स्पष्ट आहे.