पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/344

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(३ ) एक वलय * करावे. तें ध्रुवयष्टीस दोन बिंदूंत असे बांधावे की त्या वलयाचे त्या विदूत सारखे दोन भाग होतील. तसेच तेवढेच दुसरे एक वलय त्याच दोन बिंदूंत यष्टीस छेदील, पहिल्या वलयावर लंब होईल, आणि त्याच दोन बिंदूंत स्वतः त्याचे दोन समान भाग होतील, असें यष्टीस बांधावें. ह्या दोन वलयरूप वर्तुळांस आधारवृत्तं ह्मणतात. तिसरें एक तेवढेच वलय आधारवलयांस चार बिदूत असें बांधावें कीं तें प्रत्येक आधारवृत्तावर लंब होईल. अर्थात् ध्रुवयष्टि त्याचा अक्ष होईल. ह्या वृत्तास नाडीवलय किंवा विषुववृत्त ह्मणावें. याचे सारखे ६० भाग पाडावे; ह्मणजे ते नाडी ( घटका) दाखवितील. विषुववृत्तास दोन विद्रूत छेदील, आणि तेथे त्यांमध्ये २४ अंशांचा कोन होईल, असे विषुववृत्ताएवढेंच क्रांतिवृत्त विषुववृत्तास बांधावें. त्यांतून सूर्य फिरतो. याचे राशिदर्शक १२ भाग पाडावे. भगोल हाच मर्यंतरग्रहगोल कल्पिला तर क्षेपांशांइतका कोन करणारी क्षेपवृत्तें क्रांतिवृत्तास बांधावी. यांवरही राशिभागांच्या खुणा कराव्या. क्रांतिवृत्तावर अहोरात्र वृत्तें बांधावीं. वृत्ते बांधतांना ध्रुवयष्टीची दोन्हीं टोंकें थोडथोडी बाहेर मोकळी ठेवावी. आणि ती टोंकें दोन नळ्यांत घालावी. भगोलाच्या बाहेर बसवावयाचा खगोल पुढे सांगितलेला आहे त्यांत त्या नळ्या बसवावयाच्या असतात. ध्रुवयष्टीची दोन अडे दोन ध्रवांच्या समोर असावी. ह्मणजे भगोलाबाहेरील खगोलांत क्षितिजवृत्त असते त्याच्या उत्तर बिंदूच्या वर स्थळाच्या अक्षांशांइतक्या अंतरावर ध्रुवयष्टीचें उत्तर टोंक असावें. आणि ध्रुवयष्टया नळ्यांत अशी बसवावीं की, खगोल स्थिर राहून भगोल फिरवितां येईल. भगोलाबाहेर खगोल बसवावा. त्याची रचना अशी:---यांतील वृत्ते अर्थात् भगोलवृत्तांहून कांहीं मोठी असली पाहिजेत. खस्वस्तिक, अधःस्वस्तिक आणि पूर्वापर बिंदु यांतून जाणारे समवृत्त, तसेंच याम्योत्तरवृत्त आणि उपदिशांची दोन वृत्ते, अशी चार वृत्तें सारख्या परिधीची करावी. ही खालवर जाणारी अशी परस्परांस बांधावी. यांच्या अर्धावर आडवें क्षितिजवृत्त बांधावें. स्थलाच्या अक्षांशांइतका उत्तरध्रुव क्षितिजाच्या वर आणि दक्षिणध्रुव खालीं असावा. पूर्वापर बिंदु आणि दोन्ही ध्रुवबिंदु भगोलांतील ध्रुवयष्टीसमोरील याम्योत्तरवृत्तांतील बिंदु ) यांतून जाणारें उन्मंडल करावें. आणि भगोलांतील विषुववृत्ताच्याच पातळीत असणारे, मात्र त्याहून अर्थात् मोठे, असें नाडीवलय (विषुववृत्त) करावें. यावर घटिकांच्या खुणा कराव्या. नंतर खस्वस्तिक आणि अधःस्वस्तिक या बिंदूंत दोन खिळे बसवून त्यांत अडकविलेले, परंतु भोवती फिरणारे असें दृमंडल करावं. यासच वेधवलय ह्मणतात. हे खगोलाच्या आंत फिरावयाचें ह्मणून त्याहून किंचित् लहान असावें. ग्रह आकाशांत ज्या भागी असेल त्याप्रमाणे हे वृत्त फिरवून त्यावरून ग्रहाचा वेध करावा. भगोलाच्या बाहेर हा खगोल असा करावा की यास आंतून बसविलेल्या दोन नळ्यांत भगोलाच्या ध्रुवयष्टीची टोंकें बसवितां येतील. ह्या खगोलाच्या बाहेर दोन नळ्या बांधून त्यांत दृग्गोल बसवावा. खगोल आणि भगोल या दोहोंमधील वृत्ते पुन्हा या एका दृग्गोलांतच सर्व करावी. अग्रा, कुज्या

  • हीं वलये सरळ, लवचिक, मऊ, अशा वेळच्या काड्यांची करण्यास सांगितली आहेत. धातूध्या तारेची केली तरी चालतील. ही वलये हेच वृत्तपरिधि समजावे.