पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/343

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१७९५ या वर्षी निवर्तला. तेव्हां त्याचे वय सुमारे २२ वर्षांचे होते. तो विलक्षण बुद्धिमान् होता. असे अनेक पुरुष सांप्रत विद्यमान असतील. ह्या एथे सांगितले. ल्या गोष्टी कोणास क्षुल्लक वाटतील; परंतु आरंभी ज्योति:शास्त्राचे ज्ञान अशाच पुरुषांच्या प्रयत्नाने झाले असले पाहिजे. आणि तो स्वभाव अयापिही आमच्या लोकांत आहे, हे दाखविण्याकरितां ह्या गोष्टी एथे सांगितल्या. सौरार्यबाह्मादि सिद्धांतांत भगणादि माने दिली आहेत ती कशावरून काढली याबद्दल कोठे सांगितलेलें नाहीं,आणि एकादी वेधाची माहिती त्यांत नाही, या गोष्टीचे युरोपियनांस मोठे आश्चर्य वाटते. परंतु ते प्राचीन स्थितीचा व आमच्या लोकांच्या समजुतींचा विचार करीत नाहीत. ज्या काली छापखाने तर राहूंच या, परंतु लिपिप्रचार आणि लिपिसाधनें फारशी नसतील, किंबहुना लिपीचे अस्तित्वच नसेल,अशा काली सर्व ज्ञान गुरुशिष्यपरंपरया तोंडाने व्हावयाचे. तर त्या काली शोधावरून जे सिद्धांत निघाले ते मात्र राहून त्यांची साधनें नष्ट झाली हे साहजिकच आहे. आणखी असें की ग्रहण अमुक वेळी लागेल असें आतां कोणी सांगितले तर त्याचा आम्हास काहीच चमत्कार वाटत नाही. परंतु प्राचीनकालीं अशी भविष्य सांगणारा पुरुष अलौकिक आहे अशी समजत होणे साहजिक आहे. त्याने एकादा ग्रंथ केला तर त्यांत तो जे सिद्धांत सांगेल ते परिणामरूपानेच सांगेल त्यांच्या पूर्वरूपांसह व साधनांसह सांगणार नाही हे उघड आहे. आणि कालांतराने त्या ग्रंथाच्या कर्त्याचें नांव नष्ट होऊन तो ग्रंथ अपौरुष मानला जाण्याचा संभव आहे. आणि अशीच पद्धति एकदां पडल्यामुळे पुढील पौरुष ग्रंथकारांनीही आपल्या अनुमानांची पूर्वीगें सांगितली नाहीत. असो; तर टालमीच्या ग्रंथांत त्याच्या स्वतःच्या व हिपार्कसच्या वेधांची हकीगत आहे, तसेच त्याच्या नंतरच्या पाश्चात्य ज्योतिष्यांचे वेध लिहिले आहेत, तसे आमच्या ग्रंथांत नाहीत, याचे कारण वर सांगितले हेच असावे असे दिसते. तथापि वेधसंबंधे व्यक्तिविषयक प्रयत्नांची काही माहिती मागे आली आहे व पुढे येईल. आतां ग्रहस्थितिमापक आणि कालमापक अशा यंत्रांचे वर्णन करूं. भास्करा चार्याचे ग्रंथ पुष्कळ प्रसिद्ध आहेत. ह्मणून त्याने जी यंत्रे यंत्रवर्णन. सांगितली आहेत त्यांचे वर्णन प्रथम * करून मग इतर ग्रं थांतील माहिती थोडक्यात सांगणे बरें. गोलयंत्र-सरळ, सारख्या जाडीची आणि वाटोळी अशी एक काठी करावी. तिला ध्रुवयष्टि ह्मणावें. तीत लहानसा पृथ्वीगोल करून मागे पुढे सरकवितां येईल असा मध्ये बसवावा. त्याच्या बाहेर भगोल करावा. तो सूर्यादिग्रह पृथ्वीभोंवतीं फिरतात त्यांचा गोल कल्पावा. भगोलाची रचना अशी:-बरोबर वर्तुळाकार असें

  • सिद्धांतशिरोमणीमधील गोल बंधाधिकार आणि यंत्राध्याय यांवरून हे वर्णन दिले आहे. यांत नाडीवलय इत्यादि जे शब्द येतील त्यांच्या लक्षणासह सविस्तर वर्णन केले तर फार विस्तार होईल, आणि तितकें केलें तरी यंत्रे प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय त्यांचं उत्कृष्ट ज्ञान कोणाही मनुष्यास होईल असें वर्णन करता येणे कठीण. ह्मणून वर्णन संक्षिप्तष केले आहे. तथापि ह्याच्या साद्याने भास्कराचार्याचे गोलबंधाधिकार आणि यंत्राध्याय सामान्य मनुष्यासही चांगले समजतील असे मला वाटते. छत्रेस्मारकांत ही सर्व यंत्रे करविली तर थोरक्या खर्चात फार उपयोग होईल.