पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/342

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(३४) वर्षे सुभिक्ष* होते. विभावसुजरश्मिकेतु शंभर वर्षे प्रवास करून, आवर्तकेतूच्या मागाहून कृत्तिकानक्षत्री उदय पावतो. तो धूमशिख आहे. अशी बऱ्याच केतूंची वर्णने आहेत. उद्दालक, कश्यप, इत्यादि नांवें त्या त्या ऋषींनी त्या त्या केतूचा विशेष शोध केला म्हणून पडली असावी. सांप्रत एनकीचा धूमकेतु, हालेचा धूमकेतु अशी नांवें युरोपिअन ज्योतिष्यांच्या नांवावरून पडली आहेत, तसाच हा प्रकार होय. आणि या वर्णनावरून दिसून येते की कित्येक शतकें परंपरेने चाललेल्या शोधांवरून ही वर्णने दिली आहेत. ग्रहणावरून सूर्यचंद्रास्थति साधल्या असे आर्यभट आणि ब्रह्मगुप्त यांचे लेख पूर्वी दिलेच आहेत. वेधार्चे काम पुष्कळ वर्षे सतत चाललें तर त्यापासून फार उपयोग होतो. आणि हैं काम राजाश्रयावांचून चालणे कठिण. वराहमिहिराने ज्योतिष्यांचें पूज्यत्व फार वर्णिले आहे. राजाने आपल्या पदरी ज्योतिषी बाळगावे, आकाशाचे अवलोकन नित्य करण्याकडे कांहीं ज्योतिषी लावावे, त्यांनी निरनिराळे आकाशाचे भाग वांटून घेऊन त्यांचे अवलोकन करावें, असेंही लिहिले आहे. यावरून, आणि भोजराजाचा राजमगांककरणग्रंथ आणि वलभवंशांतील दशबलराजाचा करणकमलमार्तड ग्रंथ यांविषयी पूर्वी सांगितलेच आहे, तसेच अनेक ज्योतिष ग्रंथकारांस राजाश्रय होता असें त्यांच्या वर्णनावरून दिसते. यावरून राजाश्रयाने वेधाचे काम चालत असे असें दिसून येते. निरनिराळ्या ज्योतिष्यांनी मध्यमग्रहांस बीजसंस्कार कल्पिलेले मागे जागोजाग सांगितले आहेत. ते काही तरी वेधावांचून कल्पिले नसतील हें उघड आहे. केशवाने तर आपण केलेल्या वेधांचे वर्णन दिले आहे (पृ. २५० ). सिद्धांततत्वविवेककार कमलाकर याने ध्रुवतारेस चलन आहे ही गोष्ट सांगितली आहे. सांप्रतच्या कालींही अवलोकनाची हौस ज्यांस आहे असे पुरुष दृष्टीस पडतात. ज्यांचें ज्योतिषाचे अध्ययन नसून जे बरीच नक्षत्रे वया: दाखवू शकतात असे पुष्कळ लोक आढळतात. इंग्रजी व संस्कृत भाषा व ज्योतिष यांचा ज्यांस गंधही नाही अशा दोन गृहस्थांनी ध्रुवनक्षत्र स्थिर नाही ही गोष्ट साहजिक मला सांगितली. त्यांपैकीच एकास नक्षत्रे, ग्रहाचे उदयास्त, युति इत्यादि पाहण्याचा मोठा नाद होता, आणि त्यापासून मला बरेच साह्य झालें. आगाशी एथे राहणारा पाध्ये नांवाचा एक वैदिक सहज मला पुण्यास शक १८८९ मध्ये भेटला होता त्याने कोणत्याच ज्योतिषाचें अध्ययन रेकलेले नाही. तरी आकाशांतील बहुतेक तारा रोज पूर्वेकडून पश्चिमेकडे जातात, परंतु काही (झणजे उत्तर ध्रुवाजवळच्या) त्याच्या उलट ह्मणजे पश्चिमेकडून पूर्वेत काही वेळ जातात असें सहज त्याच्या बोलण्यांत आले; वही गोष्ट त्याला नारायण जनार्दन पाध्ये नांवाच्या त्याच्या भावाकडून समजली, असे त्याने सांगितले. तो भाऊ शक

  • पहिल्या भागांत भारत भीष्म प. अ. ३ यांतील ग्रहास्थति दिली आहे (पृ. ११७ ) तीत ब्रह्मराशि शब्द आला आहे. त्या व ह्या उल्लेखावरून आणि ब्रह्मा ही अभिजिन्नक्षत्रदेवता आहे यावरून अभिजित् नक्षत्राच्या आसपासच्या तारापुंजास ब्रह्मराारी संज्ञा होती असे दिसते. व धूमकेतूचे स्थान सांगितले आहे ते खगोलावर पाहिले असतां बरोबर जळतें. त्यांत असंभवनीय काही नाही. विशेषतः अर्ध प्रदक्षिणाकार शिखा सांगितली आहे ती तारासंबंधं सांगितलेल्या स्थितीशी उत्कृष्ट जुळते.