पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/341

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

तिकडे कलच नाही असें तर अगदीच झणतां येणार नाही. पहिल्या भागांत सोगितलेल्या अनेक गोष्टींवरून ही गोष्ट सिद्ध होते. २७ नक्षत्रे तर आमांस फार प्राचीन कालीं ह्मणजे ऋग्वेदकालींच माहीत झाली. ऋग्वेदांत सप्तर्षितारांचा आणि ग्रहांचा उल्लेख आहे. यजुर्वेदांत तर २७ नक्षत्रांचे वर्णन फारच आहे. शिवाय दोन दिव्य श्वान, दिव्यनौका, नक्षत्रिय प्रजापति, या तारकापुंजांविषयी पूर्वी सांगितलेंच आहे. नक्षत्रतारांमध्ये चंद्राची रोहिणीवर अतिशय प्रीति याविषयीं तैत्तिरीय संहितेत एक मोठी कथा आहे. आणि चंद्ररोहिणीची निकटयुति किंवा चंद्राच्या योगाने १९ वर्षांत ६ वर्षे नेहमी होणारें रोहिणीचे आच्छादन हेच या कथेचे मूलबीज होय. आश्वलायन सूत्रांत ध्रुव आणि अरुंधती यांचा उल्लेख आहे. शनिकत रोहिणीशकटभेदाचें ज्ञान तर आझांस ७ हजार वर्षांपूर्वी झाले होते. महाभारतांत ग्रह, धूमकेतु, तारा यांचे जागोजाग वर्णन आहे, तें पूर्वी सांगितलेच आहे. वाल्मीकिरामायणांतही बरेच ठिकाणी नक्षत्रग्रहांचा संबंध आला आहे. याज्ञवल्क्यस्मृतीत नक्षत्रवीथि आल्या आहेत. केवळ ज्योतिःशास्त्रविषयक नव्हत अशा या ग्रंथांतील अनेक उल्लेखांवरूनच अवलोकनाविषयी आमची हौस व्यक्त होते. गर्गादिसंहितांपैकी काही संहिता तरी ज्योतिषगणितपद्धति आमच्या देशांत निश्चित होण्यापूर्वीच्या आहेत, यांत संशय नाही. त्यांत ग्रह चार झणजे नक्षत्रांतून ग्रहांचं गमन हा तर एक मुख्य विषय असतो. वराहमिहिराने बृहत्संहितेंत केतुचार नामक एका मोठ्या अध्यायांत अनेक धूमकेतूंचे वर्णन केले आहे. अध्यायाच्या आरंभी गार्गीयं शिखिचारं पाराशरमसितदेवलकृतं च ॥ अन्यांश्च बहून् दृष्ट्वा क्रियतेयमनाकुलश्चारः यांत गर्ग, पराशर, असित, देवल आणि बहुत अन्यऋषि यांच्या वर्णनाच्या आधारें मी हें केतुवर्णन करितों असें तो ह्मणतो. भटोत्पलाने यावरील टीकेंत पराशरादिकांची पुष्कळ वाक्ये दिली आहेत. त्यांतून कांही देतो. पैतामहश्चलकेतुः पंचवर्षशतं प्रोष्य उदितः ॥ ... अथोदालकः श्वेतकेतुर्दशोत्तरं वर्षशतं प्रोष्य... दृश्यः ॥ ... शूलाग्राकारां शिखां दर्शयन् ब्राह्मनक्षत्रमुपसृत्य मनाक् ध्रुवं ब्रह्मराशिं सप्तर्षीन संस्पृश्य.. काश्यपः श्वेतकेतुः पंचदशं वर्षशतं प्रोष्यॆद्यां पद्मकेतोश्वारांते ... नभसखिभागमाकम्यापसव्यं निवृत्यार्थप्रदक्षिणजटाकारशिखः स यावंतो मासान् दृश्यते तावदषांणि सभिक्ष. मावहति ॥...अथ रश्मिकेतुर्विभावसुजः प्रोष्य शतमावर्तकेतोरुदितचारांते कृत्तिकास धमाशखः।। पराशर. तात्पर्यार्थ-पैतामहकेतु पांचशे वर्षे प्रवास करून (एकदां दिसल्यावर पाचशें वर्षे दिसेनासा होऊन मग ) उदय पावतो. उद्दालकश्वेतकेतु ११० वर्षे प्रवास करून उदय पावतो. शूलाग्रासारखी शिखाधारण करणारा काश्यपश्वेतकेतु १५०० वर्षे प्रवास करून पद्मकेतु नामक धूमकेतु येऊन गेल्यावर त्यान्यामागाहून पूर्व दिशेस उड्य पावन ब्राह्म (अभिजित् ) नक्षत्रास स्पर्श करून आणि धव, ब्रह्मराशि, आणि सप्तर्षि यांस स्पर्श करून आकाशाच्या तिसन्या भागाचे आक्रमण करून अपसव्य मार्गे जाऊन, अर्धप्रदक्षिणाकार जटा आहे ज्याची असा जितके मास दिसतो तितकीं