पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/340

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सांगितला आहे. बाकी कोठेही त्याचा उल्लेख नाही. तसेंच मानाधिकारांत मकर. कर्कसंक्रमणासच अयन म्हटले आहे. त्रिप्रश्नाधिकारांत जेथे ते श्लोक आहेत तेथून ते काढले तर काहीं असंगतता येत नाही. यावरून पूर्वोक्त श्लोक प्रक्षिप्त झाले हे अनुमान दृढ होतें. तथापि सूर्यसिद्धांतांत अयनचलन सांगितले आहे ते ब्रह्मगुप्ताच्या पूर्वीच सांगितले आहे, असें भास्कराचार्य मानतो असे दिसून येते. (पृ. ३२९). ब्रह्मगुप्तानंतर ५०० वर्षांनी भास्कराचार्य झाला त्या अर्थी बम्हगुप्तानंतर १२०० वर्षांनी झालेल्या सांप्रतच्या लोकांच्या अनुमानापेक्षा यासंबंधै भास्कराचार्याचे म्हणणे अधिक प्रमाण होय. यावरून ब्रह्मगुप्ताच्या पूर्वीच्या वर्तमान मूर्यसिद्धांतांत अयनगतिविचार असावा असें ह्मणतां येते. ब्रह्मगुप्तापूर्वीच्या शक ५०० च्या सुमाराच्या विष्णुचंद्राच्या ग्रंथांत तर तो होता असें निःसंशय दिसते. (पृ. ३२९ पहा). सायनरवीचे संक्रमण तेंच संक्रमण, अर्थात् सायन मिथनान्त तो दक्षिणायनारंभ, असें ब्रह्मगुप्ताचे मत होते (हे त्याच्या वर्णनांत दाखविलेंच आहे, यामुळे त्याने अयनगति मुळीच हिशेबांत घेतली नाही असे दिसते. लल्लाच्या ग्रंथांत अयनगतीविषयीं कांहींच नाही. तरी दक्षिणायनारंभ आणि मिथुनान्त ही एकच अशी त्याची समजूत, किंवा गणितागत रवि आणि सायनरवि यांत त्याच्यावेळी फार फरक नव्हता ही गोष्ट, यामुळेच असे झाले असावे. सारांश शक ५०० च्या सुमारास अयनगतीचा विचार होऊ लागला, आणि शक ८०० च्या पूर्वी तिचे सूक्ष्म ज्ञान झाले होतें. प्रकरण ४. वेधप्रकरण. वध हा शब्द व्यध् धातूपासून उत्पन्न झाला आहे. एकादी शलाका किंवा यष्टि यावर्ग किंवा दुसरा काही पदार्थ मध्ये धरून त्यावरून सूर्यादि खस्थ प दार्थ पाहणे याचें नांव वेध. त्या शलाका इत्यादिकांनी त्या ख.. स्थाचे बिंब विद्ध होतं, ह्मणून या कत्यास वेध ही संज्ञा प्राप्त झाली. नुसत्या दृष्टीने खस्य पदार्थ पहाणे हे अवलोकन होय. परंतु यासही वेध ह्मणण्यास हरकत नाहीं वर्णनाच्या सोईसाठी यास दृष्टिवेध ह्मणूं. यष्टि इत्यादि जी वेधसाधनें, ज्यांश सामान्यतः यंत्रे ह्मणतात, त्यांनी जो वेध तो यंत्रवेध होय. आमच्या लोकांस वेधाचें ज्ञान नाही आणि आमच्या देशांत वेधपरंपरा चालक आलेली नाही आणि वेधयंत्रे नाहीत असें युरोपियनांचें आमच्या देशांत आहे. आणि हिंदनी ग्रीकांपासून ज्योतिःशास्त्र घेतले, ह्या गोष्टी वेधपरंपरा आहे. च्या सिद्धतेस ते हे एक मुख्य कारण लावितात. आप लोकांस सृष्ट-चमत्कारांच्या अवलोकनाची हौस नाही किंवा त्य