पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/339

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

त्याचा वेध घेण्याची रीति विशेष प्रचारांत होती असे दिसून येते. आमच्या ज्योतिष्यांनी अयनगतीचा संबंध रेवतीतारेशी ठविला असता तर, झणजे तिचें सं. पातापासून चलन एका वर्षांत सुमारे ५०२ विकला होते, तितकी वार्षिक अयनगति मानली असती आणि इष्टकाली संपातापासून तिचें जें अंतर तितके अयनांश मानिले असते तर, परिणाम कसा चुकीचा झाला असता याचे एक उदाहरण दाखवितो. शके १८०९ मध्ये आश्विन शुक्ल ७ शुक्रवारी तारीख २३ सप्टेंबर १८८७ रोजी प्रातः स्पष्ट रवि ग्रहलाघवावरून ५ रा० ७ अं० ५क० ३७ विक० येतो. यावर्षी अयनांश २२।४५ आहेत. ते त्यांत मिळविले ह्मणजे सायनरवि ५।२९।५०।३७ झाला. ह्मणजे सूर्योदयानंतर सुमारे ९ घटिकांनी सायन तुला राशीचा झाला. आणि त्यामुळे त्याच दिवशी विषुवदिन झालें; आणि त्याच दिवशी ३० घटिका दिनमान ग्रहलाघवी पंचांगांत आहे.केरोपंती पंचांग, सायनपंचांग, यांत या दिवशीच ३० घटि दिनमान आहे. यावरून ब्रहलाघवी पंचांगांतलें दिनमान बरोबर आहे हे उघड आहे. केरोपंती (पटवर्धनी) पंचांगांत या सुमारास अयनांश १८11८1१३ आहेत. आणि हे रेवती तारेचे संपातापासून जे अंतर तितके आहेत हे अयनांश वरील ग्रहलाघवागत रवींत मिळविले, तर सायन रवि ५।२५।२३।५० होईल. ह्मणजे आश्विन शु. ७ नंतर सुमारे ४५ दिवसांनी ३० घटिका दिनमान होईल. परंतु ते चुकीचे होय. तेव्हां छायादिकांवरून काढलेला गवि आणि ग्रंथागत रवि यांचे में अंतर ते अयनांश आणि तदनुसार अयनगति आमच्या ज्योतिष्यांनी मानली तेंच योग्य केलें असें सिद्ध होते. वर्षमान बदलले तर अयन गति बदलणे योग्य होईल. अयनगतिमान आमच्या ज्योतिष्यांनी कधी निश्चित केले हे सांगणे सध्या कअयनगतिमान कधी ठिण आहे. लघुमानसकरण ग्रंथ शक ८५४ मधील आहे. निश्चित केलं. त्यांत तत्कालीन अयनांश दिले आहेत, आणि अयनगति ६० विकला मानली आहे. आणि ती दोन्हीं फार सूक्ष्म आहेत. यावरून सुमारे शक ८०० च्या पूर्वी अयनगतीचे पूर्ण ज्ञान झाले होते याविषयी काही संशय नाहीं मूलसूर्यसिद्धांत, प्रथमार्यसिद्धांत, आणि पंचसिद्धांतिका, यांत झणजे शक ४२७ च्या पूर्वीच्या ग्रंथांत अयनगतीविषषीं कांहीं नाहीं. यावरून शक ४२७ पर्यंत अयनगति विचार झाला होता असे दिसत नाही. सांप्रतच्या सूर्यसिद्धांतांत अयनगति आहे, तिजविषयी विचार वर केलाच आहे (पृ. ३२६). ब्रह्मगुप्त आणि लल्ल यांच्या ग्रंथांत अयनगतिसंस्कार कोठेच सांगितला नसून यांच्या पूर्वीच्या सांप्रतच्या सूर्यसिद्धांतांत तो आहे यावरून त्यांतले अयनचलनासंबंधे श्लोक मागाहून प्रक्षिप्त झाले असतील असें सहज मनांत येतें.ते श्लोक त्रिप्रश्नाधिकारांत आहेत. वस्तुतः अयनभगण इतर भगणांबरोबर मध्यमाधिकारांत दिले पाहिजे होते तसे दिले नाहीत. स्पष्टाधिकारांत, त्यांतही विशेषतः कांति, चर इत्यादिकांच्या साधनांत तर अयनसंस्कार अवश्य सांगितला पाहिजे होता; परंतु तो सांगितला नाही. विप्रश्नाधिकाराखेरीज इतरत्र एकदां पाताधिकारांत मात्र (श्लोक ६) अनयसंस्कार

  • पुढे वेधमकरण व त्रिप्रभाधिकार नलिकाबंधरीति पहा.