पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/338

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(झिटापिशियम) हे आरंभस्थान धरिलें तर ती तारा शक ४९६ मध्ये संपाती होती ह्मणून ते वर्ष शून्यायनांशाचे मानले पाहिजे होतें, व पुढे रेवती योगतारेचे संपातापासून जें अंतर ते अयनांश मानले पाहिजे होते. परंतु आमचें वर्षमान वर सांगितल्या इतकें नाही. यामुळे तें नाक्षत्र सौर आहे असे अगदी खात्रीने झणवत नाहीं. तसेंच रेवतीयोगतारा हे आरंभस्थान ह्मणावें तर सूर्यसिद्धांतांत आणि लल्लाच्या ग्रंथांत तिचा भोग शुन्य नाही. आर्यभट आणि वराहमिहिर यांनी योगतारांचे भोग दिलेच नाहीत. ब्रह्मगुप्त आणि त्यापुढील लल्लाखेरीज बहुतेक ज्योतिषी रेवतीभोग शून्य मानितात; परंतु त्यांचे आरंभस्थान रेवतीयोगतारेशी कधीच नव्हतें व असणार नाही. सांप्रतच्या सूर्यसिद्धांताचे स्पष्टमेषसंक्रमण होण्याच्या वेळी प्रत्यक्ष सूर्य रेवतीयोगतारेशी (झिटापिशियमशी) कधी होता हे काढून पाहतां असें वर्ष शक १७७ येते. आणि तेव्हापासून दर वर्षास सूर्यसिद्धांताचें आरंभस्थान रेवतीयोगतारेच्या पूर्वेस ८.५१ * विकला जात आहे. ब्रह्मसिद्धांताखेरीज इतरांचे आरंभस्थान रेवतीशी असण्याचे वर्ष आणि ते प्रतिवर्षी पुढे जाण्याचे मान सूर्यसिद्धांताशी अगदी जवळ आहे. ब्रह्मसिद्धांताच्या स्पष्टमेषसंक्रमणकाळी रवि रेवतीयोगतारेशी असण्याचे वर्ष शक ५९८ निवते. आणि त्या सिद्धांतांतले आरंभस्थान वर्षास रेवतीच्या पुढे ७.३८ विकला जात आहे. सारांश आमच्या ज्योतिष ग्रंथांचे वर्ष नाक्षत्र सौर आहे असे मानले आणि आरंभस्थान रेवती योगतारा आहे असे मानले तर रेवतीयोगतारा संपाती ज्या वर्षी येईल तें शून्यायनांशाचे वर्ष आणि पुढे तिचे संपातापासून जें अंतर ते अयनांश होत, हे उपपत्तिहट्या खरे आहे; तरी वस्तुतः फलितार्थ तसा नाही. ह्मणजे आमच्या ग्रंथांतील वर्षमान निराळे असल्यामुळे परिणाम तसा होत नाही. आणखी असें की झिटापिशियम असें नांव युरोपिअन ज्योतिषी जिला देतात, व जी रेवतीयोगतारा असें कोलबूक इत्यादि युरोपियन विद्वानांनी ठरविले आहे, ती तारा फार बारीक आहे. तारांचें महत्व आणि तेजस्विता यांवरून त्यांच्या प्रती ठरविल्या आहेत. चित्रा, स्वाती, रोहिणी, ह्या फार ठळक तारा पहिल्या प्रतीच्या आहेत. उत्तरा, अनुराधा, इत्यादि कांहीं दुसऱ्या प्रतीच्या. रुचिका इत्यादि कांहीं तिस-या प्रतीच्या. आणि पुण्य इत्यादि कांहीं चवथ्या प्रतीच्या आहेत. रेवती तारा ४ थी आणि ५ वी प्रत यांच्यामधील आहे. कोणी ती सहाव्या प्रतीची देखील मानितात. हिच्या बरोबरीच्या किंवा हिच्याहून लहान तारा २७ मध्ये दोनतीनच आहेत. सांप्रत ती आकाशांत दाखविणारे जुने जोशी क्वचित् सांपडतील. सारांश ती इतकी लहान आहे की वेधाच्या कामी तिचा उपयोग होण्याचा संभव फार थोडा. अयनांश काढण्याकरितां तर तिचा उपयोग करीत नाहीत हे वर (पृ. ३३८) दिलेल्या भास्कराचार्योक्तीवरून व सूर्यसिद्धांतांतील वाक्यांवरून स्पष्ट आहे. आणि आमच्या ग्रंथांत इतरत्रही वेध घेण्याच्या ज्या रीति सांगितल्या आहेत त्यांत वेधाचा संबंध स्थिर तारांशी फारच थोडा आहे. बहुधा ग्रह सायन करून संपाताच्या किंवा सायन रवीच्या संबंधेंच

  • सूर्यसिद्धांताचें वर्षमान आणि सांप्रतच्या शोधाप्रमाणे सूक्ष्म वर्षमान यांच्या अंतराच्या का. लांत मध्यम रवीची गति इतकी होते. Diary