पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/337

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

आमच्या ज्योतिष्यांनी काढलेली अयनगति आणि शून्यायनाशवर्ष ही कित पत सूक्ष्म आहेत हे सांप्रतच्या सूक्ष्म शोधांनी ठरलेली अयनअयनगति आणि गति आणि त्याप्रमाणे युरोपियन ग्रंथांवरून येणारा सायन शन्यायनांश काल क. सा काढिला. रवि यांवरून पाहिले. परंतु आमच्या लोकांनी ह्या गोष्टी कशा निश्चित केल्या हे पाहिले पाहिजे. भास्कराचार्य ह्मणतो.यस्मिन् दिने सम्यक् प्राच्यां रविरुदितो दृष्टस्तद्विष्वदिनं । तस्मिन् दिने गणितेन स्फुटो रविः कार्यः ॥ तस्य रवेमेषादन यदंतरं तेऽयनांशा ज्ञेयाः। एवमुत्तरगमने सति । दक्षिणेतु तस्यार्कस्य तुलादेशांतरमयनांशाः। पाताधिकार, श्लोक २ टीका.. मेषविषुवकाली अथवा तुलाविषुवकाली ग्रंथावरून येणारा रवि आणि मेपादि अथवा तुलादि यांचें जें अंतर ते अयनांश असें वरील भास्करोक्तीचे तात्पर्य आहे. त्याप्रमाणे प्रत्यक्ष उदद्दाक्षिणायनकाली ग्रंथागत रवि आणि ३ राशि अथवा ९ राशि यांचें जें अंतर ते अयनांश होते असेंही भास्कराचार्याने पुढे सांगितलें आहे. अर्थात सायन रवि आणि ग्रंथागत रवि यांचें जें अंतर ते अयनांश होत. सूर्यसिद्धांतांत म्हटले आहे. स्फुटं दृकतुल्यतां गच्छेदयने विषुववये ॥ प्राक् चक्रं चलितं हीने छायार्कात् करणागते ॥ ११॥ अंतरांशैरथावृत्य पाच्छषैस्तथाधिके ॥ * त्रिप्रश्नाधिकार. छायेवरून सूर्याचे भोग काढण्याची रीति सूर्यसिद्धांतांत त्रिप्रश्नाधिकारांत १७ पासून १९ पर्यंत श्लोकांत दिलेली आहे. आणि तो रवि सायन होय हे निर्विवाद आहे. यावरून सायन रवि आणि ग्रंथावरुन आलेला रवि यांचें जें अंतर ते अयनांश असें अयनांशाचे लक्षण आमच्या ग्रंथांत आहे. आणि याप्रमाणे शक ४४५ नंतर केव्हां तरी छायेवरून रवि बरेच वेळा काढून प्रथम तत्कालीन अयनांश, मग अयनगति, आणि त्यावरून शून्यायनाशाचें वर्ष, ह्या गोष्टी आमच्या लोकांनी निश्चित केल्या असे सिद्ध होते. याकरिता वेध बरेच वर्षे करावे लागले असतील. जितके अधिक वर्षांचे वेध असतील तितक्या ह्या गोष्टी अधिक सूक्ष्म समजणार हे उघड आहे. वरील विवेचनावरूनच आणखी असे दिसून येईल की रेव तीयोगतारेशी अयनांशाचा किंवा अयनगतीचा काही संबंध रिचा नाही. याविषयी थोडासा जास्त विचार करूं. सांप्रतच्या अयनांशांशी संबंध. सूक्ष्म शोधावरून नाक्षत्रसौर वर्षाचें मान ३६५ दि.१५ घ. २२ प ५३ विप.१३ प्रतिविपळे आहे. इतकें जर आमच्या ग्रंथांतलें वर्षमान असते तर रेवतीयोगतारेचा किंवा दुसरी एकादी तारा आरंभस्थानी धरिली असती तर तिचा अयनगतीशी संबंध असता. ह्मणजे रेवतीयोगतारा

  • या श्लोकाचा अर्थ पूर्वी दिलेला आहे. (पृ. ३२७) † Le Verrior's Tables,