पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/336

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

यांत ब्रह्मसिद्धांतांची संक्रांति आणि सायन संक्रांति यांस शक ४५० मध्ये पुकळ म्हणजे सुमारे ५४ घटिकांचे अंतर आहे. त्या सिद्धांताप्रमाणे शक ५०९ मध्ये दोनहीं संक्रांति एककाली येतात. परंतु ब्रह्मगुप्ताचें वर्षमान इतरांहून भित्र असल्यामुळे असे होते. या वर्षमानाविषयी सविस्तर विचार पूर्वी ब्रह्मगुप्तवर्णनांत केला आहे. त्यावरून व वरील सायनमेषसंक्रमणकालांवरून दिसून येते की, शुन्य अयनांशाचें वर्ष जेव्हां ठरविण्यांत आले असेल तेव्हां ब्रह्मसिद्धांताचें वर्षमान घेऊन त्यावरून ते ठरविलें नाहीं. बाकीच्या ग्रंथांवरून त्यांचे स्पष्ट मेषसंक्रमण आणि सायन मेषसंक्रमण ही एका काली येण्याचे म्हणजे शून्य अयनांश मानण्याचे वर्ष खाली लिहिल्याप्रमाणे येते:---- सांप्रतचे सूर्यादि पांच सिद्धांत यांतील वर्ष घेऊन, शक ४५० मुळ सूर्यसिद्धांत, प्रथमार्यसिद्धांत, द्वितीयार्यसिद्धांत, राजमृगांकादि, ४४९ यावरून दिसते की निरनिराळ्या ग्रंथांत मानलेलीशन्यायनांशाची वर्षे वर (पृ. ३३५) दिली आहेत, त्यांत मुंजाल आणि भास्वतीकरण यांची वर्षे फार सूक्ष्म आहेत. शक ४४४ किंवा ४४५ हे वर्ष सांप्रत प्रचारांत आहे. तेंही* पुष्कळ सूक्ष्म आहे. सूर्यसिद्धांताप्रमाणे शक ४२१ हे वर्ष आहे. याचे कारण मला इतकेंच दिसते की त्या सिद्धांताप्रमाणे ७२०० वर्षांत एक अयनांदोलन होते; ह्मणजे ३६०० वर्षांत संपात एका दिशेस जाऊन पुन्हा पूर्वस्थानी येतो; कलियुगारंभी तो मूलस्थानी होता; आणि तेव्हापासून ३६०० वर्षे शके १२१ मध्ये येतात. आणि त्या वर्षी सूर्यसिद्धांताचें मेषसंक्रमण सायन मेषसंक्रमणापूर्वी थोडाच वेळ ह्मणजे सुमारे २९ घटिका झालें होते; यामुळे ४२१ हे वर्ष शून्यायनांशाचे मानले. करणोत्तमाचे वर्ष ४३८ आहे. तो ग्रंथ मी प्रत्यक्ष पाहिला नाही. यामुळे त्याविषयी जास्त लिहितां येत नाही. तरी तें वर्ष पुष्कळ जवळ आहे. द्वितीयार्यसिद्धांतांत दिलेल्या रीतीने शन्यायनांशवर्ष शके ५२७ येते. त्यांत अयनांश काढण्याची रीति क्रांतीच्या रीतीप्रमाणे असल्यामुळे अनयगति सर्वदा सारखी येत नाहीं हें वर सांगितलेच आहे. शक ५२७ नंतर केव्हां तरी द्वितीयार्यसिद्धांत झाला, आणि तेव्हां इतर ग्रंथांवरून येणारे अयनांश, द्वितीयासिद्धांतावरून त्यांत दिलेल्या रीतीने येणारे अयनांश, आणि छायेवरून वेधाने येणारे अयनांश, हे तिन्ही जवळ जवळ होते. आणि तदनुसार त्यांत अयनग्रहभगण कल्पिले. आणि त्यामुळे त्याचे शन्यायनांश वर्ष शक ५२७ यते, असें माझें अनुमान आहे. द्वितीयासिद्धांतांतील पराशरमतास हीच गोष्ट लागू आहे. असो तर आमच्या ग्रंथांत शन्यायनांशाचा काल मानिला आहे तो पुष्कळ सूक्ष्म आहे हे निर्विवाद आहे. सांप्रतच्या सूक्ष्म युरोपियन गणिताप्रमाणे रेवतीयोगतारा शक ४९६ मध्ये संपाती होती, ह्मणून शून्यायनांश वर्ष ४९६ पाहिजे, असें कोणाकोणाचे मत आहे; परंतु ते योग्य नाही याविषयी विचार पुढे केला आहे.

  • वर सायन रवीचे गणित केले आहे, ते अत्यंत सूक्ष्म असेल असे नाही. त्यांत एका कलेचा फरक असेल तर शून्यायनांशकाल एक वर्ष मागे पुढे येईल.

ही गोष्ट गृहीत मानून द्वितीयार्यसिद्धांतरचनाकाल सुमारे नाके ९०० येतो.