पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/334

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

( ३३५) १७५० मध्ये ५० २११२९ विकला ठरविली आहे.* सन १९०० मध्ये संपातगति ३६५४ दिवसांत ५०२६३८ आहे. इ. स. च्या ११ व्या शतकांतील अझाएल नामक स्पेन देशांतील ज्योतिषी याचें मत संपातगति ७२ वर्षांत एक अंश झणजे वर्षास ५० विकला आहे, आणि दहा अंश पूर्वपश्चिम संपाताचें आंदोलन होते, असें होतें. १३ व्या शतकांतल्या थिबिथ बिन खोरा नामक ज्योतिष्याचे मत २२ अंश आंदोलन होते असे होते. आणि ९ व्या शतकांतल्या एका ज्योतिष्याचे मत ४१८४५ त्रिज्येच्या वृत्तांत संपात फिरतो असें होतें. आरब लोकांतील अल बटानि (इ. स. ८८०) नामक प्रख्यात ज्योतिष्याचे मत संपातास आंदोलन आहे, आणि त्याची गति ६६ वर्षांत एक अंश ह्मणजे वर्षास सुमारे ५५५ विकला आहे असे होते. त्यापूर्वी कांहीं आरव ज्योतिषी ८० अथवा ८४ वर्षांत एक अंश (वर्षास ४५ किंवा ४३ विकला ) गति आणि ८ अंश पूर्वपश्चिम आंदोलन मानणारे होते. अलबटानीची गति सूर्यसिद्धांताशी जुळते. शुन्य अयनांश अमुक वर्षी होते असे आमच्या लोकांनी ठरविलेलें कितपत शून्यायनांश वर्षाचें । सूक्ष्म आहे हे पाहूं. निरनिराळ्या ग्रंथांचा शून्य अयनांसूक्ष्मत्व. शाचा काळ प्रथम देतो. शक. सांप्रतचे सूर्यादि पांच सिद्धांत, सिद्धांततत्त्वविवेक. ४२१ मंजाल. ४४९ राजमृगांक, करणप्रकाश, करणकुतूहल, इत्यादि. ४४५ करणकमलमार्तड, ग्रहलाघव, इत्यादि. ४४४ भास्वतीकरण. ४५० करणोत्तम. ४३८ द्वितीयार्यसिद्धांत. ५२७ द्वितीयार्यसिद्धांतोक्त पराशरमत. ५३२ दामोदरीय भटतुल्य. ३४२ यांतील शेवटला ग्रंथ भटतुल्य यांत दिलेल्या कालाची स्वतंत्र योग्यता काहींच नाही. याचे कारण असें. त्यांत शक ३४२ मध्ये अयनांश शून्य असें कंठरवाने सांगितले नाही, तरी त्यांतील अयनांश काढण्याच्या रीतीवरून ३४२ हे आरंभवर्षे निघते. आणि त्या ग्रंथांत तें आरंभवर्ष मानण्याचे कारण असे की तो ग्रंथ शक १३३९ मधला आहे व त्यांत वर्षगति सूर्यसिद्धांतांतली ह्मणजे ५४ विकला घेतली आहे. आणि ३४२ हे आरंभवर्ष मानल्याने शक १३३९ मध्ये अयनांश

  • ह्या कलमांतील एथपर्यंत मजकूर Grant's History of Physical Astronomy (pp. 318-20 ) वरून घेतला आहे.

ह्या कलमांतील मजकूर कोलकच्या निबंधाच्या आधारे लिहिला आहे ( एशिआटिक रिसर्चेस पु०१२ पृ०२०९ इ० पहा.) । अलबटानीचें मत ७० वर्षांत १ अंश संपात गति ( वर्षास ५२४ विकला) असे होते असे रेहटसेक म्हणतो. (Journal of the Bombay B. R. A.S. Vol. XI.No. XXXII art. VIII. पहा.) दोहोंतून खरे कोणतें मानावें?