पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/333

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(३३४) आरोप तो खोटा ठरविण्यास पुरेशी आहे.* हिंदुलोकांनी काढिलेली अयनगति टालमीहून सूक्ष्म आहे असें कोलब्रूक ह्मणतो. युरोपखंडांत संपातगतीचा शोध प्रथम हिपार्कस याणे इ. स. पूर्वी१२५च्या सुमा रास लाविला. त्याने आपले वेध व आपल्या पूर्वी सुमारे संपात गतीविषयी इतर राष्ट्रांचा चा १७० वर्षे टिमोकेरिस याणे केलेले वेध यांवरून हा शोध लाशोध. विला. त्याच्या मागाहून सुमारे तीनशे (३००) वषानीं टालमीने संपातास गति आहे ही गोष्ट निश्चयाने स्थापली. त्याचा ग्रंथ सिंटाक्स याच्या ७ व्या भागांत ह्या गोष्टीचे विवेचन आहे. तो म्हणतो की हिपार्कसच्या वेळेपासून आजपर्यंत २६७ वर्षांत तारांचे भोग २ अंश ४० कला वाढले आहेत. आणि यावरून १०० वर्षांत एक अंश म्हणजे वर्षास ३६ विकला गति त्याने ठरविली. हिपार्कसने इतकीच ठरविली होती असें टालमी म्हणतो. ही फारच कमी आहे. २६७ वर्षांत सुमारे ३ अंश ३७ कला भोग वाढले पाहिजेत; आणि टालमी लिहितो की २।४० वाढले; म्हणजे यांत सुमारे एक अंशाची चुकी आहे. वेध स्थूल असले तरी इतकी चुकी येणें संभवत नाही.आणि यावरून पुष्कळ नामांकित ज्योतिष्यांनी अनमान केलें आहे की टालमीनें वेध मुळीच केले नाहीत; तर हिपार्कसच्या नक्षत्रभोगांत २।४०वाढवून आपला इ. स.१३७ मधील तारकांचा नकाशा तयार केला. टालमीवरचा हा आरोप खरा आहे असे सिद्ध होण्यास बळकट आधार आहेत.डिलांबर याणे टालमीच्या व लामस्टेडच्या तारकादर्शातील ३१२ तारांच्या भोगांची तुलना करून व दोघां ज्योतिष्यांच्या कालांचे अंतर १५५३ वर्षे घेऊन वार्षिक संपातगति काढली ती ५२.४ आली. ही वास्तवगतीपक्षां दोन विकला जास्त आहे; मणजे बरीच जास्त आहे. तसेच त्याणे टालमीच्या नकाशांतील नक्षत्रभोगांत २।४० वजा करून ते हिपार्कसचे भोग समजून ते व लामस्टेडचे ह्यांची तुलना करून व त्या दोघांच्या कालांचें अंतर १८२० वर्षे धरून संपातगति काढली ती ५०.१२ आली. ही आधुनिक शोधांशी फारच मिळते.(यावरून टालमीनें स्वतः वेध केले नव्हते या म्हणण्यास बळकटी येते). यरोपांतल्या अर्वाचीन ज्योतिष्यांनी संपातगति ठरविण्याचे प्रयत्न सतत केले आहेत. टाय. कोब्राहे याणे संपाताची वार्षिकगति ५१ विकला ठरविली. क्लामस्टेड याने ५० विकला ठरविली. लालांडी याणे हिपार्कसने दिलेला चित्रा तारेचा भोग व आपण इ० स० १७५० मध्ये काढलेला भोग यावरून ५०.५ ठरविली. डिलांबर यांणे ब्राडले, मेयर, लासिले यांचे वेध व स्वतःचे वेध यांवरून ५०१ ठरविली. बेसेल याणे संपातगतीच्या पूर्णस्वरूपाचे विवेचन केले. त्याणे संपातगति इ० स०

  • प्रो० व्हिटने याणे सूर्यसिद्धांताच्या भाषांतराच्या टिपांत वेधाच्या संबंध हिंदु लोकांची जागोजाग थट्टाच केली आहे. + Essays, Vol. II, P. 411. * लामस्टेड एक इंग्लिश ज्योतिषी, जन्म इ० स० १६४६ मृत्यु १७१९ ब्राडले

१६९३ " १७६२ मेयर जर्मन १७२३ , २७६२ लालांडी एक फ्रेंच ज्योतिषी २७३२, १८०७ डिलांबर " १७४९ , १८२२ बेसेल जर्मन १०८४ १८४६