पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/332

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

( ३३३ ) -आमच्या ज्यातिष्यांनी मानलेली अयनवर्षगति आणि शून्य अयनांशाचें वर्ष ही कितपत सूक्ष्म आहेत हे पाहूं. सूर्य एकदां संपाती आल्यापाअयनगतिसूक्ष्मत्व. न सून, वर्षाचें जें मान मानले असेल तितक्या कालांत तो पुनः संपाती येऊन जितका संपाताच्या पुढे जाईल तितकी एका वर्षांत अयनगति मानली पाहिजे हे उघड आहे. निरनिराळ्या सिद्धांतांतली वर्षमाने पूर्वी पंचसिद्धांतिकोक्त रोमकसिद्धांताच्या विचारांत दिली आहेत, (पृ. १५९ ). त्यांतील वेदांगज्योतिष, पितामह, पुलिश यांची वर्षमानें शक ४२७ च्या (पंचसिद्धांतिकेच्या) अगोदर प्रचारांतून गेली होती. रोमकाचें वर्षमान आमच्या देशांत कधीच प्रचारांत नव्हते असें तेथेच दाखविले आहे. बाकीच्यांपैकी ब्रह्मगुप्ताचें वर्षमान ३६५ दि०१५ घ० ३० प० २२१ विप० आहे. ते शके ९६४ नंतर कधीं प्रचारांत होते असें दिसत नाही. आणि बाकीची सर्व ३६५।१५।३३।१५ पासन ३६५।१५।३१।३१।२४ पर्यंत आहेत. आणि शके १००० पासून हीच प्रचारांत आहेत. इ. स. १९०० मध्ये सायनवर्षाचें मान ३६५।१४।३१।५३।२५ आहे. ह्मणजे इतक्या काळांत सूर्य संपातापासून निघाल्यापासून पुनः संपातीं येतो. हे मान सूर्यसिद्धांताच्या ३६५।१५।३१।३१।२४ या मानांतून वजा करून बाकीच्या कालांत सायन रवीची गति काढली तर ती ५८.७७७* विकला येते. अथवा किं. चित् स्थूल घेतली तर ५८.८ येते. शके १००० पासून प्रचारांत असणाऱ्या मानांपैकी कमी मान घेतले तर संपातगति सुमारे २६९ विकला कमी येते. ह्मणजे ५८.५०८ येते. ब्रह्मगुप्ताचें वर्षमान घेतले तर ५७५५७ येते. परंतु अयनगति निश्चित करतांना हे वर्ष घेतलें नाहीं असें माझें मत आहे. सायन सौर वर्षाचें मान थोडथोडें कमी होत आहे. शके ७०० च्या सुमाराचें मान घेतले तर वर काढलेल्या प्रत्येक अयनग. तींत सुमारे २४ विकला कमी होतात. एकंदरीत विचार करून सरासरी मान पाहता आमच्या ग्रंथांत जें वर्षमान घेतले आहे त्यास अनुसरून अयनगति वर्षास ५८.४ विकला घेतली झणजे ती अत्यंत सूक्ष्म होईल. आणि सांप्रत ग्रहलाघव आणि मकरंद हे दोन ग्रंथ मिळून सर्व हिंदुस्थानच्या अर्धाहून जास्त भागांत चालत आहेत, आणि त्या दोहोंत वर्षमान सांप्रतच्या सूर्यसिद्धांताचें आहे. तेव्हां त्यासंबंधे पाहिले तर वर्षगति ५८.६ विकला मानणे सूक्ष्म होईल. यावरून मुंजालाची वर्षगति ५९.९ विकला व हल्ली सर्वत्र प्रचारांत असलेली ६० विकला ही पुष्कळ सूक्ष्म आहे असे दिसून येईल . ह्मणजे आमच्या ज्योतिष्यांनी १.४ विकलेच्या फरकानें अयनगति शोधून काढली असें झालें. आणि अयनगतीसंबंधे इतर राष्ट्रांचा थोडा इतिहास पुढे दिला आहे, त्यावरून दिसून येते की ही अयनगति त्यांणी दुसरे कोणापासून घेतली नाही. तेव्हां स्वतंत्रपणे इतकी सूक्ष्म अयनगति आमच्या लोकांनी शोधून काढली हे त्यांस अत्यंत भूषणास्पद आहे. आणि ही एकच गोष्ट हिंदुलोक वेध घेण्याच्या कामी अगदी अडाणी आहेत असा जो युरोपियनांचा

  • केरोपंतांनी ५८.५२१ दिली आहे(ग्र० सा० को० पृ० ३२); परंतु तींत किंचित् कसर सुटली आहे असे दिसते.

कारण पुढें (पृ० ३३६) दिले आहे. * १.४ विकला जास्त धरली आहे, त्या मानाने सांप्रत युरोपियन सायनरवि माण ग्रह . लाघवागत सायनरवि यांत अंतर येते.