पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/331

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(३३२) अयमभगणाच्या पूर्णापूर्णत्वाचा बहुतेक विचार वर झालाच आहे. संपात वि लोमगतीने सर्व नक्षत्रमंडलांत फिरतो असें मुंजालाचे मत आहे. संपाताचे पूर्णभ्रमणका आदालन. तसेंच संपाताची पूर्ण प्रदक्षिणा होते अशा अर्थाचे वसिष्ठसि द्धांतकार विष्णुचंद्र याचे एक वाक्य ब्रह्मसिद्धांतटीकाकार पृथूदक आणि शिरोमणि-टीकाकार नृसिंह यांणी दिले आहे असें कोलबूक म्हणतो. याविषयीं वर सांगितलेच आहे. सूर्यादि पंचसिद्धांतांच्या मते संपाताची पूर्ण प्रदाक्षिणा होत नाहीं; तो रेवती तारेच्या पूर्वेस व पश्चिमेस २७ अंशांपर्यंत जातो. आणि दुसऱ्या आयसिद्धांताच्या मतें तो रेवतीच्या पूर्वपश्चिमेस २४ अंशपर्यंत मात्र जातो. कोणत्याही करणग्रंथांत संपाताची पूर्ण प्रदक्षिणा होते असे स्पष्ट सांगितले नाहीं, तरी त्यांतील अयनांश काढण्याच्या रीतीने अयनांश २४ किंवा २७ यांहून जास्त म्हणजे ३६० पर्यंत होतील. २४ किंवा २७ यांहून जास्त येऊ लागतील तेव्हां ६० विकला गति ऋण मानावी म्हणजे २४ किंवा २७ यांहून कमी कमी मानीत यावे, असे कोणत्याही करणांत बहुधा सांगितले नाही. शक ४४५ च्या सुमारास अयनांश शून्य आणि वर्षगति ६० विकला मानणाऱ्या करणग्रंयांप्रमाणे २४ अयनांश शक १८८५ मध्ये होतील, आणि शक २०६५ मध्ये २७ होतील. सूर्यसिद्धांताप्रमाणे २७ अयनांश शक २२२१ मध्ये होतील, आणि दुसरा आर्यभट आणि पराशर यांच्या मताप्रमाणे शके २४०० च्या सुमारास २४ होतील. तेव्हां यापुढे सुमारे ६७ वर्षांनी किंवा फार तर ६०० वर्षांनी अयनचलन सर्व नक्षत्रमंडलांत होत नाही हा सिद्धांत खरा असला तर त्याचा अनुभव येऊ लागला पाहिजे. संपाताची पूर्ण प्रदक्षिणा होते असा अर्वाचीन युरोपियन ज्योतिप्यांचा सिद्धांत आहे हे प्रसिद्धच आहे. आणि त्याप्रमाणे तो खरा असेल तर कालांतरानें चैत्रवैशाखांत वर्षाऋतु येऊं लागेल हा सांप्रतच्या सायनपंचांगकारांचा घोष खोटा असे कोणाच्याने ह्मणवणार नाही. आणि मधुमाधवांत (चैत्रवैशाखांत ) वसंतऋतु असणे हीच गोष्ट श्रुतिसंमत आहे. तेव्हां मुंजालाचे मत खरे मानले तर श्रुतिवचनास बाध येईल, ह्मणून संपाताची पूर्ण प्रदक्षिणा होते हे मुंजालादिकांचें मत वेदबाह्य असा मरीचिकारादिकांनी त्यांस दोष दिला आहे तो त्यांच्या दृष्टीने ठीकच आहे; परंतु पूर्ण प्रदक्षिणा होणें न होणे हे आपल्या स्वाधीन नाही हे मरीचिकारादिकांच्या लक्षात आले नाही. वेदांगज्योतिषांत धनिष्ठारंभी उदगयनप्रवृत्ति आहे. यावरून तेव्हां भरणीच्या चतुर्थ चरणारंभी म्हणजे आरंभस्थानापासून २३ अंश ४० विकलांवर संपात होता. वेदांत कृत्तिकांपासून नक्षत्रारंभ आहे, त्यावरून रुत्तिकारंभी संपात होता असें मनांत येण्याचा संभव आहे. ह्मणजे आरंभस्थानापासून २६ अंश१० कलांवर संपात आला. पूर्वी संपात अश्विनीच्या पुढे होता, नंतर मागे आला, यामुळे संपाताचें आंदोलन होते असें मनांत आले असावे व संपातचलनाचा अनुभव सुमारे २४ किंवा २७ अंशांचा होता यामुळे किंवा क्रांति २४ अंश होते यामुळे २४ किंवा २७ अंश आंदोलन आमच्या कांहीं सिद्धांतकारांनी कल्पिलें. पुढें अनुभवास कांहीं येवो, पूर्ण प्रदक्षिणा मानावी तर ऋतु श्रुतिसंमत होणार नाहीत असे मानल्यासारखे होते, हा सद्योदोष टाळण्याकरतां संपाताच्या आंदोलनाची कल्पना फार उपयोगी झाली.