पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/330

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(३३१) सुमारे १८७ वर्षांत ६९.४ विकला अयनगति असेल. दुसऱ्या १८७ वर्षांतही सुमारें तितकीच असेल. तिसन्यांत ६३.७ विकला. याप्रमाणे पुढे ५८.१ ५२; ४३.३, ३०.६, २०.४६.१ याप्रमाणे असेल. याप्रमाणे २४ अयनांश झाले झणजे पुढे ह्या मानांच्या उलट मानांच्या गतींनी अयनांश कमी होतील, पुनः वाढतील व कमी होतील. परंतु अनुभव तर असा नाही. अयनगतींत फेर पडतो तो फारच थोडा पडतो. ती नेहमी सारखीच असते असें ह्मणण्यास हरकत नाही. दुसऱ्या आर्यभटानें पराशरमताप्रमाणे कल्पांतील अयनग्रहभगण ५८१७०९ सांगितले आहेत. त्याप्रमाणे शके ५३२ मध्ये अयनांश शून्य येतात. आणि क्रांतीप्रमाणे अयनांश काढावयाचे असल्यामुळे अयनगति नेहमी सारखी येत नाहीं वर सांगितल्याप्रमाणे कमजास्त येते. मध्यम मानाने ४६.५ विकला येते. संपातभगण किती आणि त्याची पूर्ण प्रदक्षिणा होते की १०८ अंशांची प्रदक्षिणा आहे, याविषयी भास्कराचार्याने स्वतःचे मत कांही सांगितलें नाहीं.* सौरोक्तभगणांचा त्याणे अनुवाद केलेला वर दिलाच आहे. आणखी पुढे तो म्हणतो अयनचलनं यदुनं मुंजालायैः स एवायं (क्रांतिपातः)॥ तत्पक्षे तद्भगणाः कल्पे गोंगर्तु नंदगोचंद्राः १९९६६९ ॥ २८॥ गोलबंधाधिकार. आणि या वरील टीकेंत सौरोक्त व मुंजालोक्त अयनभगण देऊन पुढे तो मणतोः अथ च ये वा ते वा भगणा भवंतु यदा येशा निपुणैरुपलभ्यते तदा स एव क्रांतिपातः । यावरून ज्या काली जे अयनांश वेधाने उपलब्ध होतील ते घ्यावे एवढेच तो मणतो हे स्पष्ट आहे. तसेच याच प्रसंगींच्या त्याच्या “सांप्रतोपलब्ध्यनुसारिणी कापि गतिरंगीकर्तव्या " या उद्गारावरून उपलब्ध होणाऱ्या अयनांशानुसार कल्पभगण कल्पावे असें तो ह्मणतो असे दिसून येते. संपाताची पूर्ण प्रदक्षिणा होते, अशी भास्कराचार्याची उक्ति त्याच्या ग्रंथांत मला कोठे आढळली नाही. पूर्ण प्रदक्षिणा होत नाही असेंही तो म्हणत नाही. करणकुतूहल ग्रंथांत भास्कराचार्याने अयनगति वर्षास एक कला मानिली आहे, आणि शक ११०५ मध्ये अयनांश ११ मानले आहेत, ह्मणजे शक ४४५ मध्ये अयनांश शून्य मानले आहेत, असें पूर्वी सांगितलेच आहे. अयनगतीचे भगण आणि वार्षिक अयनगति यांविषयी विचार वर झाला. त्यावरून दिसते की सूर्यादि पंचसिद्धांतांच्या मतें वार्षिक अयनगति ५४ विकला; मुंजालमा ५९.९ विकला आणि दुसरा आर्यभट आणि पराशर यांच्या मते ४६.३ आणि ४६.५ विकला आहे. तथापि शके ८५४ पासून प्रचारांत वर्षगति ६० विकला आहे असें झणण्यास हरकत नाही. कारण तेव्हापासून आजपर्यंत झालेल्या करणयंथांपैकी बहुतेकांत वार्षिक अयनगति इतकीच आहे. भटतुल्य करणांत व मूर्यसिद्धांतानुयायी करणांपैकी एकदोहोंत मात्र ५४ विकला गति मानली आहे.

  • भास्कराचार्याने कल्पांत संपातभगण १९९६६९ सांगितले आहेत, असे प्रो० व्हिटने मणतो (सू०सि० भाषां० पृ० १०४); ती चूक आहे. भास्कराचार्याने ही संख्या मुंजालोक्त म्हणून दिली आहे.