पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/329

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(३३०) कोठे सांगितला नाही हे खरे आहे. तरी वर दिलेली ब्रह्मगुप्ताची आर्या व तिजवरील पृथूदक-टीका यांवरून ब्रह्मगुप्तापूर्वी अयनगतीविषयी विचार निघाला होता हे उघड दिसते. सायनरवीचे संक्रमण तेंच संक्रमण, अर्थात् सायनमिथुनान्त तोच दक्षिणायनारंभ, असें ब्रह्मगुप्ताचे मत होतें ( हे त्याच्या वर्णनांत दाखविलेच आहे ), यामुळे त्याणे अयनगति मुळींच हिशेबांत घेतली नाही. मुंजालाची आर्याबद्ध वचनें पूर्वी दिली आहेत (पृ. ३१३), त्यांत अयनभगणसंख्या कल्पांत १९९६६९ दिली आहे. संपाताची पूर्ण प्रदक्षिणा होते की नाहीं याविषयीं सदहूं आयांत कांहीं नाहीं. तथापि पूर्ण प्रदक्षिणा मानून कलियुगारंभी संपाताचा चक्र शुद्ध भोग ९ रा. २९ अंश ३७ क. ४०.८ विकला येतो, शक ४४९ मध्ये अयनांश शून्य येतात, आणि अयनाची वर्षगति ५९.९००७ विकला येते. या सर्व गोष्टींवरून संपाताची प्रदक्षिणा पूर्ण होते असें मुंजालाचे मत आहे असे मला स्पष्ट दिसते. मुंजालाच्या शक ८५४च्या लघुमानसकरणांत वार्षिक अयनगति एक कला आहे. द्वितीयार्यसिद्धांतांत अयनग्रहाचे भगण सांगितले आहेत आणि त्यांवरून अयनांश काढण्याची रीति अशी दिली आहे: अयनग्रहदोःक्रांतिज्याचापं केंद्रवद्धनणं स्यात् ॥ अयनलवास्तसंस्कृतखेटादयनचरापमलग्नानि ।।१२ ॥ स्पष्टाधिकार. अर्थ-अयनग्रहाचा भुज करून त्यावरून क्रांतिज्याचाप करावें. तें केंद्राप्रमाणें धनर्ण असते. तेच अयनांश होत. (अयनग्रह मेषादि षड्भांत असेल तर अयनांश धन आणि तुलादि षड्भांत असेल तर अयनांश ऋण होत * ) त्यांचा संस्कार ग्रहास करून त्यावरून अयनें, चर, क्रांति, लग्न ही काढावी." क्रांति काढण्याच्या रीतीप्रमाणेच ही रीत आहे. आमच्या सर्व सिद्धांतांच्या आणि द्वितीय आर्यभटाच्याही मतानें परमकांति २४ अंश होते. तेव्हां अर्थातच दुसऱ्या आर्यभटाच्या मताप्रमाणे अयनांश २४ हून जास्त होत नाहीत. ह्मणजे धन अयनांश शून्यपासून २४ पर्यंत वाढत जातात, पुढे कमी होऊं लागून शून्य होतात. पुढे ऋण होऊन शून्यापासून २४ पर्यंत वाढत जातात व पुढे कमी होत शून्यापर्यंत येतात. झणजे संपाताची ९६ अंशांची प्रदक्षिणा धरल्याप्रमाणे होते. द्वितीय आर्यसिद्धांताप्रमाणे कल्पांत अयनग्रहभगण 'मसिहटमुधा ' ह्मणजे ५७८१५९ आहेत. यावरून ९६ अंशांचा भगण धरून अयनवर्षगति ४६.३ विकला येते. परंतु अयनांश काढण्याची रीति क्रांतीच्या रीतीप्रमाणे असल्यामुळे नेहमी सारखीच अयनगति येणार नाही. पूर्वोक्त भगणांनी अयनग्रहाची वर्षगति २ कला ५३.४ विकला येते. तीवरून वर्षांत अयनगति कधी ६९.४ विकला येईल, कधी ६.१ विकला किंवा त्याहूनही कमी येईल. अयनग्रहाच्या एका भगणास सुमारे ७४७२ वर्षे लागतात. याच्या चतुर्थांशाच्या पहिल्या दशांशांत झणजे

  • हा धनर्णसंकेत ग्रहांसंबंधे ह्याच अधिकारांत पूर्वी आला आहे. + पाठभेदादिकांचा पूर्ण विचार करून ही संख्या ठरविली आहे.