पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/328

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

आणि संपात मूलस्थानाच्या पूर्वेस व पश्चिमेस २७ अंशपर्यंत जातो असे मानले आहे, आणि वर्षगति ५४ विकला मानिली आहे, असे दिसून येते. पहिला आर्यभट, लल्ल, यांच्या ग्रंथांत अयनगतीविषयी काही नाही. ब्रह्मगुप्ताने श्रीषेण, विष्णुचंद्र यांस दूषणे देत असतां असें झटले आहे:परमाल्पा मिथुनान्ते युरात्रिनाड्यो ऽर्कगतिवशादृतवः ॥ नायनयुगं......... ॥५४ ।। अध्याय 19. “मिथुनान्ती दिन आणि रात्रि यांच्या घटिका परम आणि अल्प होतात; सूर्याच्या गतीस अनुसरून ऋतु होतात. यावरून अयनयुग नाही." यावरील टीकेंत पृथूदक ह्मणतो:-"कल्पांत त्याचे (अयनाचे) भगण १८९४११ होतात; यास अयनयुग ह्मणतात; हे ब्रह्मा, अर्क इत्यादिकांस मान्य आहे, असें अयनयुगाविषयी विष्णुचंद्राने म्हटले आहे...हल्ली दिनरात्रीचे वृद्धिक्षय मिथुनान्ती होत नाहीत. तसेंच 'आशेषार्धात् । इत्यादि वचनें आहेत, परंतु त्यांवरून गति सिद्ध होते, तरी पुष्कळ भगण झाले असें सिद्ध होत नाही. कल्पांत अयनभगण संख्या १८९४११ धरून वर्तमानकलियुगारंभी संपाताचा चक्रशुद्ध भोग राश्यादि ०।११।१९।५५.२ येतो. याचा इतर ग्रंथांतील शून्यायनांशवर्षाशी ह्मणजे सुमारे शक ४४४ शी कांहींच मेळ नाही. यावरून पूर्वोक्त कल्पभगणसंख्येत थोडीबहुत चूक असावी, किंवा विष्णुचंद्राची युगपद्धति भिन्न असावी. पूर्वोक्त संख्येवरून वार्षिक अयनगति ५६.८२१३३ विकला येते. ही पुष्कळ सूक्ष्म आहे. व या अंकावरून संपाताचे पूर्ण भ्रमण होते असे विष्णुचंद्राचे मत दिसते. १८९४११ वर्षांनी अयनभगण होतो, असाही कदाचित् विष्णुचंद्राच्या लिहिण्याचा अर्थ असेल. तसे असल्यास कल्पभगणसंख्या सुमारे २२८०० येते. ही चुकीची आहे. तरी भास्करोक्त सूर्यसिद्धांतसंख्येशी जवळ आहे. कसेही असो, विष्णुचंद्राचें अयनगतीसंबंधे वचन फार महत्वाचे आहे. शक ५०० च्या सुमारास तो झाला; आणि त्या काली आमच्या लोकांस अयनगतिज्ञान होते असें स्पष्ट होते. अयनगतीसंबंधे ब्रह्मगुप्ताविषयीं भास्कराचार्य ह्मणतो की:तत्कथं ब्रह्मगुप्तादिभिनिपुणैरपि [ क्रांतिपातः ] नोक्त इति चेत् तदा स्वल्पत्वात् तैनोंपलब्धः । इदानीं बहुत्वात् सांप्रतैरुपलब्धः । अतएव तस्य गतिरस्तीत्यवगतं । यद्येवमनुपलब्धोपि सौरसिद्धांतोक्तत्वादागमप्रामाण्येन भगणपारिध्यादिवत् कथं तै!कः ....... यांत ब्रह्मगुप्ताच्या वेळी अयनांश फार थोडे होते ह्मणून त्यास ते वेधाने समजले नाहीत, तरी इतर कांहीं मानें आगमप्रामाण्याने त्याने घेतली आहेत, तसें सूर्यसिद्धांताच्या आधाराने त्याने कांतिपातभगण कां घेतले नाहीत, अशी शंका येईल, असें भास्कराचार्य ह्मणतो. ब्रह्मगुप्तानें अयनभगण दिले नाहीत व अयनसंस्कार Colebrooke's Mis. Ess. II. 465, 380. कोलकच्या पुस्तकांत विष्णुचंद्राचे वचन फार अशुद्ध होते, म्हणून त्यांणे ते दिले नाही. पृथूदकटीकेचा तो भाग मला मिळाला नाही. नृसिंह व दादाभाई यांच्या टीकांत ते वचन आहे असे कोलक ह्मणता; परंतु मला ते आढळत नाहीं. ०२१६ पहा. मूलसूर्यसिद्धांतांत अयनगतीविषयीं कांहीं होते असें पंचसिद्धांतिकेवरून दिसत नाही. आणि विष्णुचंद्राच्या लिहिण्यावरून सूर्यसिद्धांतांत अयनगति होती. यावरून त्याचे मणणे वर्तमान सूर्यसिद्धांतास अनुलक्षन असावें. यावरून वर्तमान सूर्यसिद्धांताच्या काला. विषय- मागे जी अनमाने केली आहेत, त्यांस बळकटी येते. ४२