पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/327

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

( ३२८) मूर्यसिद्धांतांतले श्लोक वर दिले आहेत त्यांतील रीतीवरून अयनांश कधीही २७ हून जास्त होत नाहीत. आणि भचक्र पूर्वेस आणि पश्चिमेस जाते असे म्हटले आहे, यावरून ग्रहादिकांची नक्षत्रमंडलांतून पूर्ण प्रदक्षिणा होते तशी संपाताची होत नाही, तर संपातापासून भचक्र एकदा २७ अंश पूर्वेस जातें, पुनः उलट मूलस्थानी येऊन पश्चिमेस २७ अंश जातें, आणि पुनः मूलस्थानी येते, म्हणजे १०८ अंशांची एकेक अशा प्रदक्षिणा होत असतात, असें सूर्यसिद्धांताचे मत दिसते. सांप्रतच्या सूक्ष्म शोधाअन्वयें संपातगति एका वर्षांत ५०.२ विकला आहे. महायुगांत ३० भगण घेतले आणि १०८ अंशांचा भगण घेतला तर एका वर्षांत २२% विकला गति होते. ही फारच थोडी आहे. ३० भगण घेऊन पूर्ण प्रदक्षिणा मानिली तर वर्षगति ९ विकला होते. ही देखील थोडीच आहे. सांप्रतच्या "त्रिशत्कृत्यः" या पाठाप्रमाणे महायुगांत ६०० भगण घेऊन १०८ अंशांचा भगण मानला ह्मणजे वर्षगति ५४ विकला होते. सांप्रत हाच अर्थ सर्वमान्य आहे. ५४ विकला ही गति पुष्कळ सूक्ष्म आहे. तथापि सांप्रतच्या प्रचारांतल्या सर्व ज्योतिषपुस्तकांत ६० विकला गति मानली आहे; व तीच योग्य आहे असें मी पुढे दाखविले आहे. महायुगांत ६०० भगण आणि ३६० अंशांचा भगण असें मानले तर वर्षगति १८० विकला येते. ही फार जास्त होईल. सांप्रतचा रोमशसिद्धांत, सोमसिद्धांत आणि शाकल्योक्त ब्रह्मसिद्धांत यांत अयनभगण महायुगांत ६०० मानले आहेत. अयनचलनाविषयी त्यांतील वचनें अशी द्यगणः षट्शतनोर्कशद्धोदयहतो ग्रहः ॥ ३१ ॥ आयनविनतद्वाहभागा दिग्भिविभाजिताः ॥ अयनांशास्तदूर्वार्धे धनं पूर्वदले ऋणं ।। ३२ ॥ रोमशसिद्धांत, स्पष्टाधिकार. इत्येतदेतत्प्राक्चलनं युगे तानि च बात।१९६|| युक्तचायनग्रहस्तस्मिन् तलादो प्राक् चलं भवेत्॥ यद्वा तत् शुद्ध चक्र वा मेषादौ प्राक् चलं भवेत्।।१९७॥अयनांशास्तद्भजांशास्त्रिना: संतो दशोवृताः॥ शाकल्यब्रह्मसिद्धांत, अध्या २. युगे षट्शत कृत्वो हि भचक्र प्राग्विलंबते ॥ तद्गणो भूदिनैर्भको युगणोयनखेचरः ॥ ३१॥ तच्छुद्धचक्रदोलिता द्विशत्यातायनांशकाः । संस्कार्या जूकमेषादो केंद्रे स्वर्ण ग्रहे किल ।। ३२ ।। सोमसिद्धांत-स्पष्टाधिकार. सांप्रत उपलब्ध असलेला वसिष्ठसिद्धांत, ज्यास लघुवसिष्ठसिद्धांत असेंही कोणी म्हणतात, त्यांत अयनांश काढण्याची रीति अशी दिली आहे:अब्दाः खखर्तुभि ६००र्भाज्यास्तदोस्त्रिमा दशोद्धताः ॥ अयनांशा ग्रहे युक्ता... ॥ ५५ ॥ स्पष्टाधिकार. " वर्षगणास ६०० नी भागावे, त्याच्या भुजास तिहींनी गुणून दहांनी भागावें, म्हणजे अयनांश होतात." यांत ६०० नी भागून येतें तें काय-राशि, अंश, किंवा भगण, हे स्पष्ट नाही. ६०० वर्षांत एक राशि होतो असें घेऊन महायुगांत ६०० भगण होतात. व तितकेच उद्दिष्ट आहेत असे वाटते. यावरून सांप्रतच्या सूर्यादि पांच सिद्धांतांत परम अयनांश २७ मानले आहेत,