पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/326

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(३२७) स्फुट दृक्तुल्यतां गछेदयने विषुवद्ये ॥ प्राक् चक्र चलितं हीने छायाात् करणांगते ॥१३॥ अंतरांशैरथावृत्य पश्चाच्छेषैस्तथाधिके । त्रिप्रश्नाधिकार. अर्थ-[ महा ] युगांत भचक्र (३० x २० = ) ६०० वेळा पूर्वेस जाते. त्याने (६०० नीं) अहर्गणास गुणून त्यास [ युगांतील ] सावन दिवसांनी भागून जें येते त्याच्या भुजास तिहींनी गुणून दहांनी भागून जे अंश येतात ते अयनसंज्ञक होत. तत्संस्कृत ग्रहावरून क्रांति, छाया, चरार्ध, इत्यादि काढावें. [चक्र चलित झाले आहे की कसे ही गोष्ट ] अयन आणि दोन विषुवें या दिवशी स्पष्ट दृक्प्रत्ययास येईल. छायेवरून काढलेल्या रवीहून करणागत सूर्य जर कमी असला तर त्यांच्या अंतरांशाइतके चक्र पूर्वेस चलित झाले आहे, आणि अधिक असला तर [भचक्र ] परत येऊन पश्चिमेस गेले आहे [ असे समजावें ]. यांत अयनभगण महायुगांत 'त्रिंशत्कत्यः' ह्मणजे ६०० आहेत. ह्मणजे कल्पांत ६००००० होतात. परंतु तद्भगणाः सौरोक्ता ब्यस्ता अयुतत्रयं कल्ले ॥ १७ ॥ गोलबंधाधिकार. यांत कल्पांत तीन अयुतें ह्मणजे ३०००० भगण सूर्यसिद्धांतांत सांगितले आहेत असे भास्कराचार्य म्हणतो. म्हणजे महायुगांत ३० होतात. यावरून सूर्यसिद्धांतांतले श्लोक वर दिले आहेत त्यांतील “त्रिंशत्रूत्यः" एथे “त्रिंशत्कृत्वः " (३० वेळा) असा पाठ भास्कराचार्याच्या वेळी होता असे दिसते भास्कराचार्याच्या वरील वचनांतील "व्यस्ता अयुतत्रयं " याचा अर्थ "विलोम तीन अयुत ॥ यांहून काहीं निराळा करण्याविषयी व तेणेकरून सूर्यसिद्धांतांतला सांप्रतचा पाठ“त्रिंशत्रूत्यः" याशी एकवाक्यता करण्याविषयीं टीकाकार आणि ग्रंथकार यांणी पुष्कळ खटाटोप केला आहे. सिद्धांतशिरोमणीचा टीकाकार मुनीश्वर हा मरीचि टीकेंत म्हणतो की, अयुतत्रय यांतील अयुत याबद्दल नियुत असा पाठ आहे असे कोणी ह्मणतात.* कोणी ह्मणतात, कल्प म्हणजे वास्तविक कल्प नव्हे, तर त्याचा विसावा भाग घ्यावयाचा. म्हणजे तेणेकरून महायुगांत ६०० भगण होतात. स्वतः मुनीश्वर "व्यस्त अयुतत्रय" याचा "वि म्हणजे विंशति यांणी अस्त म्हणजे गणित असें अयुतत्रय म्हणजे ६० अयुतें" असा एक अर्थ करतो.आणखी तोच ह्मणतो की "तद्भगणाः सौरोक्ता व्यस्ता अयुतत्रयं कल्पे" याचा दुसरा असा एक अर्थ होतो की "त्याचे (संपाताचे) भगण मुयसिद्धांतांत सांगितले आहेत. आणि दुस-या एका ग्रंथांत कल्पांत विलोम ३ अयुत सांगितले आहेत. म्हणजे 'अयुतत्रय" याचा संबंध तो सूर्यसिद्धांताशीं मुळीच लावीत नाही. हा सर्व खटाटोप ओढाताणीचा आहे. भास्कराचार्याचें वाक्य वर दिलें आहे त्यावरील टीकेंत स्वतः तोच ह्मणतो की "क्रांतिपातस्य भगणाः कल्पेऽयुतत्रयं तावत्सूर्यसिद्धांतोक्ताः" यावरून "सूर्यसिद्धांतांत कल्पांत३ अयत भगण सांगितले आहेत " असाच भास्कराचार्याच्या लिहिण्याचा अर्थ आहे असे स्पष्ट दिसते. आणि यावरून भास्कराचार्याच्या मते सूर्यसिद्धांतांत महायुगांत संपाताचे ३० भगण सांगितले आहेत.

  • नृसिंहाने वासनावातिकांत तसे म्हटले आहे. कल्पांत तीन नियुते झणजे महायुगांत ३०० होतात.