पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/325

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

( ३२६) यांची मानें परस्परांपासून भिन्न आहेत. आणि यावरून ती स्वतंत्रपणे वेधावरून काढलेली आहेत हे स्पष्ट आहे. तिघांचे अंक भिन्न आहेत ते काही तरी मनःकल्पित आहेत असें ह्मणतां येणार नाही. आमच्या ज्योतिष्यांनी स्वतंत्रपणे वेध करून आपापल्या ग्रंथांतील निरनिराळी मानें स्थापित केली ही गोष्ट सिद्ध करण्यास दुसरी कांहीं प्रमाणे नसली तरी त्यांची बरील कोटकांतील विक्षेपमाने एवढे एकच प्रमाण पुरे आहे. प्रकरण ३. अयनचलन. सूर्यचंद्रांची दक्षिणोत्तर अयनें कातिवृत्ताच्या ज्या विदूंजवळ होतात तेथे कोणा एका काली जे नक्षत्र असतें तेंच सर्वकाल तेथे राहत नाहीं; कालांतराने पुढे पू स जाते. वेदांगज्योतिषकालीं धनिष्ठारंभी उदगयनारंभ होत असे. पुढे कांहीं कालाने श्रवणांवर होऊ लागला. वराहमिहिराच्या वेळी उत्तराषाढांवर होत असे. ह्मणजे अयनबिंदु इतका मागे आला. क्रांतिवृत्ताचा एक बिंदु चळला ह्मणजे सर्व चळावयाचेच. त्याप्रमाणे क्रांतिवृत्त आणि विषुववृत्त यांचा जो संपातबिंदु त्या स्थळी जी तारा असेल तीही कालांतराने पुढे जाते. ह्मणजे वस्तुतः संपातबिंदु मार्गे येतो. याप्रमाणे हे जे चलन तें सूर्याच्या अयनांवरून प्रथम समजून आल्यामुळे आमच्या बहुतेक ग्रंथांत त्यास अयनचलन असें नांव आहे. द्वितीय आर्यभट इत्यादिकांनी अयन हा एक ग्रह मानून त्याचे भगण दिले आहेत. भास्कराचार्याने ह्या चलनास संपातचलन असेही म्हटले आहे. सांप्रत युरोपियन विद्वान् ह्या चलनास विषुवचलन ( Precession of the eqinoxes ) असे म्हणतात. भास्कराचायांच्या सिद्धांताखेरीज इतर सर्व ग्रंथांत ह्या चलनासंबंधे जी गति ती नक्षत्रमंडलाच्या ठिकाणीं कल्पिली आहे. म्हणजे काही एका कालांत नक्षत्रमंडल पुढे जातें असे मानले आहे. परंतु भास्कराचार्य म्हणतो:-- तस्य [ विषुवत्क्रांतिवलयपातस्य ] अपि चलनमास्ति । ये ऽयनचलनभागाः प्रसिद्धास्त एव विलोमगस्य क्रांतिपातस्य भागाः ॥ गोलबंधाधिकार. यावरून तो पाताचीच विलोमगति मानतो असें दिसून येते. सांप्रतचे युरोपियन विद्वानही संपातासच गति आहे असे मानतात. वराहमिहिराच्या पंचसिद्धांतिकेंत अयनचलनाविषयी काही सांगितले नाही. अयनचलनमान. यावरून मूलसूर्यसिद्धांतादिक प्राचीन पांच सिद्धांतांत त्याविषयी कांहीं होतें असें दिसत नाही. सांप्रतच्या सूर्यसिद्धांतांत अयनचलन आहे. त्याविषयी त्यांत असें आहे:त्रिंशत् ३० कृत्यो २० युगे भानां चक्रं प्राक् परिलंबते ॥ तद्गुणाद्भदिनैर्भक्तात् युगणायदवाप्यते ॥ तहोनिमा दशातांशा विज्ञेया अयनाभिधाः ॥ तत्संस्कृताद् ग्रहात् क्रांतिछाया चरदलादिकं ॥ १०॥