पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/324

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(३२५) नाही. दुसऱ्या कारणाने होणारा मात्र विचारांत घेतला आहे. विक्षेपमानांविषयी भास्कराचार्य ह्मणतो: (यदा ) त्रिज्यातुल्यः शीघ्रको भवति तस्मिन् दिने वेधवलये यावान् परमो विक्षेप उपलभ्यते तावान् ग्रहस्य परमो मध्यमविक्षेपः ॥ ग्रहछायाधिकार, श्लोक १ टीका. हे आमच्या ग्रंथांतील विक्षेपमानाचें लक्षणच म्हटले तरी चालेल. शीघ्रकर्ण मध्यम असतो तेव्हां पातापासून ग्रह त्रिभांतरित असतो असा नियम नाही. शीघ्रकर्ण मध्यम असतां पातत्रिभांतरी ग्रह असेल तर त्यावेळी त्याचा जो शर तोच ग्रहाचा परम मध्यम विक्षेप आमच्या ज्योतिष्यांनी मानिला आहे. यांत मंदकर्णाचा विचार आला नाही. बहिर्वर्ती ग्रहांच्या शरांत मंदकीच्या कमजास्त होण्याने फारसा फरक पडत नाही, तरी अंतर्वर्ती ग्रहांच्या शरांत पडतो. यामुळे वरील कोष्टकांत आमच्या ग्रंथांतील विक्षेपमाने दिली आहेत त्यांतील बुध शुक्र खेरीज करून इतरांच्या विक्षेपमानांची आधुनिक मानांशी तुलना करण्यास विशेष हरकत नाही. आणि तशी केली असतां दिसून येतं की, आमच्या ग्रंथांतील मंगळ आणि गुरु यांच्या विक्षेपमानांचें टालमीच्या मानांपेक्षां आधुनिकांशी अधिक साम्य आहे. ब्रह्मसिद्धांतांतली आणि द्वितीय आर्यसिद्धांतांतली मानें तर आधुनिकांशी फारच जवळ आहेत. शनीचें मान कांहीं कलांनी चुकले आहे. बुधशुकांच्या शराविषयी पाहतां असें दिसून आले की सांप्रत बुधाचा मंदस्पष्टशर परम असतां त्याचा मंदकर्ण एकदां -३३८२ आणि एकदां -४११४ असतो, आणि त्यावेळी त्याचा शीघ्रकर्ण मध्यम असेल तर स्पष्टशर अनुक्रमें २ अंश २३ कला आणि २ अंश ५३ कला असतो. या दोहों वेळच्या शराचें मध्यममान २ अं० ३८ क० येते. आणि ते आमच्या ग्रंथांतील मानाशी पुष्कळ जवळ आहे. शुक्राचा मंदस्पष्टशर परम असतां त्याचा मंदकर्ण एकदां -७१९३ आणि एकदां '७२९३ असतो. दोन्ही वेळी त्याचा शीघ्रकर्ण मध्यम असेल तर त्याचा स्पष्टशर सुमारे २ अं० २८ क० असतो. हाही आमच्या ग्रंथांतील मानाशी पुष्कळ जवळ आहे. एथे सांप्रतची म्हणून जी माने मी दिली आहेत ती सन १८८३ पासून सन १८८८ पर्यंत ६ वर्षांच्या इं० नाटिकल आल्मनाकमधील माहितीवरून गणित करून काढली आहेत. बुधाचा मंदस्पष्टशर परम असतां त्याचा शीघकर्ण अगदी मध्यम किंवा त्याच्या जवळ जवळ असें ६ वर्षांत २।३ वेळा मात्र आढळले. शुक्राचे तर मुळीच आढळले नाही. आणि यावरून दिसून येते की पुष्कळ वर्षे वेध केल्यावांचून ही माने अगदीं सूक्ष्म काढतां येणार नाहीत. आणि यावरून आमचे ज्योतिषी पुष्कळ सूक्ष्म माने काढिल्याबद्दल स्तुतीस पात्र आहेत. ग्रहकक्षापातास थोडीशी तरी गति आहे. यामुळे आधुनिक शोधान्वयें ब्रह्मगुप्त आणि आर्यभट यांच्या वेळचे शर काढले असतां ते वर दाखविल्याहूनही वास्तविक मानाशी जास्त जवळ आहेत असेंही कदाचित् दिसून येईल. वरील श्लोकांत दोन्ही आर्यभट आणि ब्रह्मगुप्त * बुध, शबा, हे अंतर्वी ग्रह, बाकीचे बहिर्वती. + बुधाचा मध्यम मंदकर्ण ३८७१ आणि शुक्राचा ·७२३३ आहे. ( Loomis' Practical केवळ आमच्या ग्रंथांतील विक्षेपमाने आणि आधुनिक मार्ने एकत्र दिली झणजे त्यांची वास्तविक तुलना होते असे नाही. मी वर दिलेल्या प्रकारची बुध, शुक्र यांच्या शरमानांची तुलना भाजपर्यंत कोणी केलेली माझ्या पाहण्यांत नाही. Astronomy )