पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/322

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(३९३) भूलोकाख्यो दक्षिणे व्यक्षदेशात् । तस्मात् सौम्योयं भुवः स्वञ्च मेरुः ॥ लभ्य: पुण्यः खे महः स्याज्जनोऽतो ऽनल्यानल्पैः स्वेस्तपः सत्यमंत्यः ॥ ४३ ॥ भुवनकोश. निरक्ष देशाच्या दक्षिणेस भूर्लोक, त्याच्या उत्तरेला आपण राहतो हा भुवर्लोक, मेरु हा स्वर, आणि महर्, जन, तपस्, सत्य हे आकाशांत आहेत; त्यांत सत्य शेवटी आहे; असें यांत सांगितले आहे. महाद्दी, सप्तसमुद्र, भूरादिलोक, यांचे वर्णन पुराणाश्रित असें भास्कराचार्याने झटले आहे. या वर्णनांत सर्व ग्रंथांची सर्वांशी एकवाक्यता नाही. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून १२ योजने भूवायूचे वेष्टन आहे, आणि मेघ, वीज, भूवायु. इत्यादि त्यांत असतात, असें वर्णन केलेले आहे. भास्क राचार्य ह्मणतोःभूमेहिदिश योजनानि । भूवायुरबांबुदवियुदाय ॥ २ ॥ मध्यगतिवासना. दोन्ही आर्यभट, लल्ल, यांणी वातावरणाची उंची इतकीच मानली आहे. १२ योजनें झणजे ६० मैल होतात. सांप्रतच्या शोधाप्रमाणे वातावरणाची उंची सुमारे ४५ पासून १०० पर्यंत मैल आहे. भूवायूमध्येच निर्धात, उल्का, मेघ, इंद्रधनुष्य, वीज, गंधर्वनगर, सूर्यचंद्रास पडणारे खळे यांचे स्थान आहे, असें श्रीपति पुढील श्लोकांत ह्मणतोःनिर्घातोल्काधनसुरधनुविद्युदंतः कुवायोः संदृश्यते खनगरपरीवेषपूर्व ।। भूवायूच्यावर आणखी दुसरे प्रवहादि वायु लल्ल, श्रीपति, भास्कप्रवहादि वायु. राचार्य यांनी कल्पिले आहेत. लल्ल ह्मणतोः-- आवहः प्रवह उद्वहस्तथा संवहः सुपरिपूर्वको वहौ ॥ सप्तमस्तु पवनः परावहः कीर्तितः कुमरुदावहो परैः ॥ १॥ धीवृद्धिदतंत्र, ग्रहभ्रमसंस्था. ग्रहमध्यमगतीच्या कारणाचे विवेचन वर झालेच. कल्पांत किंवा महायुगांत ग्रहांच्या किती प्रदक्षिणा नक्षत्रमंडलांतून होतात त्यांच्या संग्रहभगण. रव्या, ह्मणजे ग्रहभगणसंख्या, निरनिराळ्या सिद्धांतांतल्या पूर्वी दिल्याच आहेत. बुध आणि शुक्र यांच्यासंबंधे एक विशेष सांगण्यासारखे आहे की ते नेहमी सूर्याच्याबरोबर असतात, ह्मणून त्यांच्या नक्षत्रमंडलांतून प्रदक्षिणा सूर्याच्या इतक्या होतात; आणि या कारणाने आमच्या ग्रंथकारांनी त्यांचे भगण आणि मध्यमगति ही सूर्याइतकीच मानिलीं आहेत. परंतु बुधशीघ्र आणि शुकशीघ्र अशी निराळी कल्पून त्यांचे जे भगण दिले आहेत ते कल्पांत किंवा महायुगांत त्यांच्या सूर्याभोवती प्रदक्षिणा होतात त्यांइतके आहेत. आणि ग्रह सूर्याभोवती फिरतात ही कल्पना आमच्या ज्योतिष्यांस नव्हती तरी बुधशुकशीघ्रभगणांसच त्यांणी महत्व दिले आहे हे ध्यानात ठेवण्यासारखे आहे. ग्रह स्वयंप्रकाश नाहीत, सूर्यापासून त्यांस प्रकाश मिळतो, असे आमच्या ज्योग्रहप्रकाश तिःशास्त्राचे मत आहे. प्रथमार्यभट ह्मणतो "बापूदेव यांचे सि. शिरो. पुस्तक पृ. २६७ टीप.