पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/321

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(३१६) रानें ग्रहादिकांची आकाशांत स्थिति आहे असे आमच्या ज्योतिष्यांचे मत आहे असे दिसते. दुसरा आर्यभट ह्मणतो की:निजनिजकर्मविपाकै वैरुपभुज्यते फलं चित्रं । तद्भोगस्थानानि स्वर्गादिकसंज्ञका लोकाः ॥३॥ अनिलाधाराः केचित् केचिल्लोका वसुंधराधाराः । वसुधा नान्याधारा तिष्ठति गगने स्वशत्तयैव ॥४॥ अध्या. १६ यांत काही लोक वायूच्या आधाराने आहेत असें झटले आहे. परंतु ग्रहनक्षत्रे हे लोक आहेत असें यांत नाही. ग्रहनक्षत्रे हे आपल्या भूगोलाप्रमाणे विस्तृत असे जडगोल आहेत ही कल्पना आमच्या ज्योतिष्यांस नव्हती असे दिसते. आकर्षण. भास्कराचार्याने पृथ्वीच्या अंगी आकर्षणशक्ति मानली आहे. तो ह्मणतोः--- आकृष्टिशक्तिश्च महीं तया यत् खस्थं गुरु स्वाभिमुखं स्वशक्त्या ॥ आकृष्यते तत्पततीव भाति ॥६|| गोलाध्याय, भुवनकोश. " पृथ्वीच्या अंगी आकर्षणशाक्त आहे. ती आकाशांतला एखादा जड पदार्थ आपलेकडे स्वशक्तीने आकर्षिते, तो पडतो असे भासतें. " यांत पदार्थाचे पतन आकर्षणाने होते असें मटले आहे. न्यूटननें आकर्षणाचा शोध लावला तेव्हां पृथ्वीची आकर्षणशक्ति त्याच्या मनांत येण्यास पदार्थाच्या पतनावांचून दुसरे काय कारण झालें होतें ? ग्रहमाला आकर्षणशक्तीनेच सूर्याभोवती फिरते असें त्याणे अनुमान करून गणितानें तें सिद्ध करून स्थापित केले, हे पुढले काम मात्र आमच्या देशांत झालें नाहीं. जगत्संस्थेच्या वर्णनांत पृथ्वीवरील सप्तसमुद्र, सप्तमहाद्वी, त्यांतील पर्वत, नया, 1. यांचेही वर्णन सर्व सिद्धांतांत असते. परंतु तो वस्तुतः भूगोला चा विषय आहे; ह्मणून विस्तरभयास्तव एथे सांगत नाही. पृथ्वीवरील निरनिराळ्या स्थलांवरून होणारी आकाशगोलांची दर्शने झणजे विषुव . वृत्तावर ध्रुव क्षितिजांत दिसतो, आणि ग्रहादिक क्षितिजावर आकाशदर्शन लंबरूपाने उगवतात मावळतात; जसजसें उत्तरेस जावें तसा उत्तरध्रव उंच होतो, आणि ग्रहादिकांचा दैनंदिनगतीसंबंधे गमनमार्ग क्षितिजावर तिर्यक होतो अवस्थांनी सूर्यादि क्षितिजाशी समांतर फिरतात; ह्या गोष्टीचे विवेचन सर्व सिद्धांतांतून असते. विस्तरभयास्तव मूळ वचनें एथे देत* नाही. उत्तर गोलाधीत कोणत्या अंशावर राशिचकाचा काही भाग कधीच दिसत नाहीसा होतो, कोणत्या अक्षांशावर कोणते राशि दिसत नाहीत, कोणत्या अक्षांशावर मूर्य ६० घटिका किंवा त्याहून जास्त वेळ दिसत असतो व तसा तो किती दिवसपर्यंत दिसतो, इत्यादि गोष्टींचेही विवेचन बहुतेक सिद्धांतांतून असते. तेही सर्व एथे सविस्तर देण्याचे कारण नाही. ध्रुवस्थानी मेरुपर्वत कल्पिला आहे. भास्कराचार्याने त्यावरच ब्रह्मा, विष्णु, महेश इत्यादि लोकपाल यांची स्थाने कल्पिली आहेत. तसेंच भूरादिमेरु, सप्तलोक. सप्तलोकांविषयीं तो ह्मणतो

  • ज. बा. मोडक यांच्या " भास्कराचार्य आणि तत्कृत ज्योतिष" या पुस्तकांत याविषयों भास्कराचार्याची मूळवचनें भाषांतरासह दिली आहेत.